बुधवार, १८ मार्च, २०२०

संदीप डाकवे ‘डिप्लोमा इन नॅचरोपॅथी’ कोर्स मध्ये उत्तीर्ण


तळमावले/वार्ताहर
पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील संदीप डाकवे हे ‘डिप्लोमा इन नॅचरोपॅथी’ हा कोर्स यशस्वीरीत्या प्रथम श्रेणीत उत्तीर्ण  झाले आहेत. भारतीय प्राकृतिक चिकित्सालय दिल्ली व इंडियन बोर्ड आॅफ नॅचरोपॅथी, नवी दिल्ली मान्यताप्राप्त नेचरक्युअर इन्स्टिटयूट नाशिक मधून त्यांनी हा डिप्लोमा पूर्ण केला आहे.
‘डिप्लोमा इन नॅचरोपॅथी’ हा कोर्स पूर्ण केल्यामुळे ते ‘नॅचरोपॅथी तज्ञ’ म्हणून आपल्या नावासमोर ‘डाॅक्टर’ या पदवी चा उल्लेख करु शकणार आहेत. निसर्गोपचार ही पध्दती आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानीप्रमाणेच शासनमान्य पध्दती आहे.
संदीप डाकवे यांनी यापूर्वी एटीडी, बी.ए.(इंग्रजी), एम.जे., ग्राफीक डिझायनिंग इ.पदव्या प्राप्त केल्या आहेत. दरम्यान, संदीप डाकवे यांनी आतापर्यंत सुमारे 183 विद्याथ्र्यांना मोफत शालेय साहित्य तसेच परिसरातील शाळांना लाखो रुपयांचे शैक्षणिक उठावाचे साहित्य दिले आहे. याशिवाय आपल्या कलेतून अनेक शाळांच्या भिंती बोलक्या केल्या आहेत. अशा विविध माध्यमातून संदीप डाकवे यांनी शैक्षणिक क्षेत्रात योगदान देण्याचा प्रयत्न केला आहे.
संदीप डाकवे यांच्या सामाजिक व इतर क्षेत्रातील कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य शासनाने त्यांना 4 वेळा पुरस्कार देवून गौरवले आहे.
‘डिप्लोमा इन नॅचरोपॅथी’ हा कोर्स पूर्ण केल्याबद्दल नेचरक्युअर इन्स्टिटयूटचे डाॅ.सुभाष भंडारी, शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार अॅड.जनार्दन बोत्रे, जि.प.सदस्य आशीष आचरे, पं.स.सदस्य पंजाबराव देसाई, स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट, शिवछत्रपती प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी संदीप डाकवे यांचे अभिनंदन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे प्रितीसंगमावर स्व. यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे प्रितीसंगमावर स्व. यशवंतराव चव्हाण यांना भावपूर्ण अभिवादन. सातारा | दि. २ : महाराष्ट्राचे शिल्पका...