बुधवार, १८ मार्च, २०२०

ढेबेवाडी: पाटण तालुक्यात कोरोनाचा रूग्ण नसल्याचा आरोग्य विभागाचा निर्वाळा



ढेबेवाडी : कोरोनाचे काही संशयीत रुग्ण सापडल्याची परिसरात अफवा आहे. असा रुग्ण पूर्ण तालुक्‍यात नाही. अशी माहिती पाटण तालुका आरोग्य अधिकारी आर. बी. पाटील यांनी दिली. कोरोनाचे रुग्ण सापडल्याची अफवा पसरली होती. येथील ग्रामीण रुग्णालयासह परिसरातील विविध आरोग्य केंद्रात लोक मोबाईलवरून संपर्क साधून त्याबद्दल जाणून घेत होते. मात्र ती निव्वळ आफवाच असल्याचे स्पष्ट झाले.

त्याबाबत पाटण तालुका आरोग्य अधिकारी पाटील म्हणाले,'पाटण तालुक्‍यात कोरोनाचा एकही संशयीत रुग्ण आढळलेला नाही. यात्रा किंवा नोकरीनिमित्ताने परदेशी गेलेले तालुक्‍यातील नागरिक घरी परतलेले आहेत, त्यांची विमानतळावर तपासणी झाली आहे. त्यानंतरच त्यांना घरी पाठवले आहे. त्यापैकी कुणालाही सर्दी,खोकला,ताप असा त्रास नाही. नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही'. अफवांवर विश्वास ठेवू नये असेही सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...