गुरुवार, १९ मार्च, २०२०

ऑडिट न करताच बँकांच्या आर्थिक पत्रकावर सह्या केल्यास C.A ठरणार दोषी

दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया अ‍ॅक्टप्रमाणे सीएंनी करायच्या कामकाजावर काही बंधने घातली आहेत. कायद्याच्या परिशिष्ट क्र. 2 मध्ये नमूद केलेली आहेत. ज्यामध्ये विशिष्ट रूपाने चार्टर्ड अकाउंटंट कुठल्या पत्रकावर स्वाक्षर्‍या करू शकतात याबाबतचा खुलासा केला आहे. बर्‍याचदा ऑडिट केलेले नसून सुद्धा बँका आर्थिक पत्रकांवर सीए च्या स्वाक्षरीचा आग्रह करतात.
त्यामुळेprepared on the basis of information received असा शेरा टाकून सीए मंडळींना त्या आर्थिक पत्रकावर सह्या करण्याची विनंती करण्यात येते. वरील नमूद केलेल्या कायद्यानुसार आर्थिक पत्रे लेखा परीक्षण केल्याशिवाय त्या सनदी लेखापाल (सीए) अथवा त्याच्या भागीदाराला प्रमाणित करता येणार नाहीत. म्हणजे जर सीएने ऑडिट केले नसेल, तर त्या Balnce sheet वर स्वाक्षरी करता येणार नाही. तसे केल्यास तो सीए दोषी मानला जाईल. अंदाजे आर्थिक पत्रके वा प्रोेजेक्ट रिपोर्ट बनवण्यासाठी किंवा भविष्यातील व्यवहारावर मिळणारी कमाई दाखवण्यासाठी (estimated / project financial statements) जर सीए अथवा त्याचा भागीदार, ती पत्रके प्रमाणित करत असल्यास, तो सीए दोषी मानला जाईल. काहीफसव्या बुद्धीच्या लोकांचा चार्टर्ड अकाउंटंचे शिक्के आणि खोटी स्वाक्षरी बनविण्याच्या गुन्ह्याचा वाढता कल दिसून येतो. यावर आळा बसवण्यासाठी दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफइंडिया लेखाशास्त्र व्यवसायाच्या नियामकांनी एक सक्रिय पाऊल म्हणून युनिक डॉक्युमेंट आयडेंटिफिकेशन नंबर र्(udin) आणला आहे. यामुळे सर्व प्रमाणित, सत्यापित केलेली पत्रके (udin) पोर्टलवर जावून त्याची खात्री संबंधितांना करता येईल. सर्व चार्टर्ड अकाउंटंट 1 जानेवारी 2019 पासून सर्व प्रमाणपत्र (udin) पोर्टलवर नोंदणीकृत करणे अनिवार्य आहे. सदर नियम व अटींची दखल सर्व संबंधितांनी घ्यावी असे आवाहन सातारा चार्टर्ड अकाउंटंट सभासद यांच्या हिताच्या दृष्टीने सातारा शाखेकडून करण्यात आले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...