गुरुवार, १९ मार्च, २०२०

सातारा : करोनाचे दोन संशयित रुग्ण

सातारा - परदेशातून प्रवास करून आलेल्या दोन तरुणांमध्ये करोनासदृश्य लक्षणे आढळून आली आहेत. यामुळे त्यांना सातारा जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.

माहितीनुसार, २९ वर्षीय तरुण शारजाह (UAE) येथून प्रवास भारतात परतला होता. तर सौदी अरेबिया येथून प्रवास करुन आलेल्या २२ वर्षीय तरुण या दोघांना करोनासदृश्य लक्षणे आढळली होती. यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दोघांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पुण्यात 'एनआयव्ही'कडे पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

तथापि कोणीही घाबरून जावू नये, जिल्हा प्रशासन पूर्णपणे दक्ष आहे.हा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी जिल्हा प्रशासानाला मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...