ढेबेवाडी ता.पाटण : कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी सातारा आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला आहे. या पार्श्वभूमीवर पाटणचे प्रांताधिकारी श्रीरंग तांबे यांच्या सूचनेनुसार कर्नाटक महाराष्ट्रासह देशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या बनपुरी (ता. पाटण, सातारा) येथील प्रसिद्ध देवस्थान श्री नाईकबा मंदिरात भाविकांना दर्शनासाठी प्रवेश बंद करण्यात आला आहे. श्री नाईकबा देवस्थान कमिटीकडून सोमवारी सकाळी मंदिराच्या प्रवेशद्वारास लावण्यात आले होते. मात्र दुपारी टाळे काढून दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले आहे. AD
नाईकबा देवाची यात्रा 29 व 30 मार्च या दिवशी होणार आहे.कोरोना व्हायरसचा प्रभाव रोखण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजना पाहता यावर्षी नाईकबा यात्रा होणार नाही, हे जवळपास निश्चित मानले जात आहे. दरम्यान नाईकबा देवस्थान कमिटी स्थानिक ग्रामस्थ व प्रांताधिकारी यांची उद्या (मंगळवारी)एक बैठक होणार आहे. या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता विश्वसनीय सूत्रांनी वर्तवली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा