रविवार, १५ मार्च, २०२०

सातारा:-कोरोना एक संशयित रुग्ण सातारा सिव्हिलमध्ये

सातारा जिल्ह्यात अबुधाबी येथून आलेल्या एका ३० वर्षीय तरुणाला खोकला, ताप आणि छातीत दुखत असल्यामुळे शासकीय रुग्णालयामध्ये  तातडीने विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. या संशयित रुग्णाचे नमुने काढून पुण्यात एन.आय.व्ही. या संस्थेकडे पाठविण्यात आले आहेत, याबाबतची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. तथापि कोणीही घाबरून जावू नये, जिल्हा प्रशासन पूर्णपणे दक्ष असल्याचे आवाहन करण्यात आले आहे.संबंधित रुग्ण भारतात आल्यापासून कोठे-कोठे गेला, गावी कोणा-कोणाला भेटला याची माहिती घेतली आहे.त्यानुसार संबंधीत ठिकाणी लक्ष ठेवले जाणार आहे. रुग्णाचा तपासणी अहवाल पॉझीटीव्ही आला तर, त्या-त्या ठिकाणचा सर्व्हे केला जाणार आहे. जिल्ह्यामध्ये हा पहिलाच संशयीत आढळून आला आहे. अद्याप त्याची तपासणी पॉझीटीव्ह आलेली नाही.

प्राथमिक माहितीनुसार रविवारी या रुग्णाला त्रास होऊ लागल्याने सातारा सिव्हिलमध्ये दाखल करण्यात आले. तो मुंबई विमानतळावर दि. १३ रोजी आलेला होता.भारतात आल्यानंतर त्याला त्रास जाणवू लागला. दरम्यान, हा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी जिल्हा प्रशासानाला मदत करावी. सर्वांनी स्वच्छता ठेवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

*लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण व खाऊ वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न*

कुंभारगाव, दि. २२ जुलै : *महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार व परिपत्रकानुसार महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्र...