सोमवार, १६ मार्च, २०२०

.१७ मार्च मा.मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ( बाबा ) वाढदिवसाच्या निमित्त जीवनप्रवास खास लेख



दि.१७ मार्च मा.मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ( बाबा ) 
वाढदिवसाच्या निमित्त जीवनप्रवास 
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा जन्म  १७ मार्च १९४६ इंदोरमध्ये मराठी कुटुंबात झाला. वडील - स्व. दाजीसाहेब उर्फ आनंदराव चव्हाण, ११ वर्षे केंद्रीय मंत्रिमंडळात. पं. जवाहरलाल नेहरूंचे सहकारी आई - स्व. प्रेमलाकाकी चव्हाण, माजी खासदारत्यांचे आईवडीलही राजकारणात होते. त्यांचे आई - वडील हे दोघेही काँग्रेसचे खंदे कार्यकर्ते होते. त्यामुळे राजकारणाचे बाळकडू पृथ्वीराज बाबांना लहानपणापासूनच मिळालेले. मूळ गाव कुंभारगाव असलेल्या
बाबाचं सातवीपर्यंतच शिक्षण कराडच्या नगरपालिका शाळेत तर त्यापुढील शिक्षण दिल्लीत झालं. पृथ्वीराज चव्हाणांनी बिट्स पिलानी येथून त्यांनी बी.ई. (ऑनर्स) ही पदवी मिळवली आणि त्यानंतर अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातून एम.एस. ही पदवी मिळवली. अमेरिकेत काही काळ काम केल्यानंतर ते भारतात परतले. त्यानंतर एअरोनॉटिकल क्षेत्रात त्यांनी काही काळ नोकरीही केली.
 राजीव गांधींच्या आग्रहाखातर पृथ्वीराज बाबा  यांनी सक्रिय़ राजकारणात प्रवेश केला. त्यांनी पंतप्रधान कार्यालयाचा कार्यभार समर्थपणे सांभाळला. केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री या नात्याने त्यांनी अनेक पदांचा कार्यभार पाहिला आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान, संसदीय व्यवहार आणि पंतप्रधान कार्यालय ही त्यापैकी प्रमुख खाती होती. काही महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय करारांमध्ये त्यांनी याकाळात महत्त्वाची भूमिका बजावली. विविध कार्यक्रम तसंच शिष्टमंडळाचे सदस्य असलेल्या चव्हाण यांनी अमेरिका , फ्रान्स , जपान , जर्मनी , चीन , इटली , नेदरलँण्ड , पोर्तुगाल , स्वित्झर्लंड यासह अनेक देशांचे दौरे केले आहेत.

* राष्ट्रासाठी काम - सैन्यासाठी लढाऊ विमाने,रेडियो टेक्नोलोजी,पाणबुडी संबंधी संशोधन.

* भारतात आयटी आणण्यासाठी राजीव गांधी यांच्याबरोबर काम करून मोलाचे योगदान दिले. 

* संगणकशास्त्रावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे लेख 

* दूरसंचार(Mobile and Telecom) क्रांतीचे जनक सैम पित्रोदा यांच्यासोबत अमेरिका आणि भारतात संशोधन केले.

* राजकीय कारकीर्द - ६ खात्यांचे केंद्रीय मंत्रिपद सांभाळले, माहिती तंत्रज्ञान खात्याचे मुख्य सल्लागार असताना भारताला त्यांनी संगणकयुगात नेले,आय टी उद्योगाची देशात पायाभरणी केली.
राजीव गांधी यांचे मुख्य सल्लागार म्हणून काम पाहिले.

* महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम करताना मेट्रो,मोनोरेल,अर्बन एक्स्प्रेस हायवेज,आयटी आणि ऑटो हब सारखे महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण केले. भ्रष्ट्राचाराला आळा घातला. 

* राज्य सहकारी बँक वर प्रशासक नेमून वार्षिक ४८००० कोटींचा होणारा खर्च आणि घोटाळा रोखला.

* शेवटच्या २ महिन्यात पटापट सह्या करून निर्णय घेतले अशी टीका झाली. त्या फायलींवर काम करण्यासाठी वर्षभर मंत्रालयात ओव्हरटाईम केला. 'पहाटे पर्यंत मंत्रालयात बसून काम करणारा मुख्यमंत्री' म्हणून ख्याती.  

राजकीय कारकीर्द
  • इ.स. १९९१ ते इ.स. १९९६ : सदस्‍य, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाची इलेक्‍ट्रॉनिकी, अणुऊर्जा सल्‍लागार समिती
  • इ.स. १९९२-९३ : सदस्‍य, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि वन समिती.
  • इ.स. १९९४-९५ : सदस्‍य, वित्‍त आणि नियोजन, ग्रामीण आणि नागरी विकास स्‍थायी समिती.
  • इ.स. १९९५-९६ : सदस्‍य, सार्वजनिक उपक्रम समिती, सदस्‍य, दुय्यम विधि-विधान विशेष आमंत्रित कामकाज सल्‍लागार समिती 
  • इ.स. १९९६-९७ : सदस्‍य, ११ व्‍या लोकसभेचे उपमुख्‍य प्रतोद, लोकसभा काँग्रेस संसदीय पक्षाचे सदस्‍य, वित्‍त मंत्रालयाची सल्‍लागार समिती.
  • इ.स. १९९६-९८ : काँग्रेस संसदीय पक्षाचे सचिव,
  • इ.स. १९९८-इ.स. २००० : सदस्‍य, सार्वजनिक लेखा समिती
  • इ.स. २०००-इ.स. २००१ : प्रवक्‍ता, अखिल भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस.
  • एप्रिल इ.स. २००२ : राज्‍यसभेवर निवड.
  • एप्रिल इ.स. २००८ : राज्‍यसभेवर फेरनिवड, राज्‍यमंत्री, कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्‍ती वेतन (अतिरिक्‍त कार्यभार).
  • इ.स. २००४-इ.स. २००९ व मे २००९ ते नोव्‍हेंबर इ.स. २०१० पर्यंत पंतप्रधान कार्यालयाचे राज्‍यमंत्री, विज्ञान आणि तंत्रज्ञान (स्‍वतंत्र कार्यभार), भू-विज्ञान, कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्‍ती वेतन खात्‍यांचे राज्‍यमंत्री. हरियाणा आणि जम्‍मू-काश्‍मीर राज्‍याचे प्रभारी.
  • महाराष्‍ट्राचे २२ वे मुख्‍यमंत्री म्‍हणून दि. ११ नोव्‍हेंबर इ.स. २०१० रोजी शपथविधी.
  • दि. २८ एप्रिल इ.स. २०११ रोजी महाराष्‍ट्र विधानपरिषदेवर बिनविरोध निवड.
  • दि. ३० एप्रिल इ.स. २०११ रोजी विधानपरिषदेचे सदस्‍य म्‍हणून शपथ.
  • राज्‍यसभा सदस्‍यत्‍वाचा दि. ६ मे इ.स. २०११ रोजी राजीनामा.
  • २६ सप्टेंबर २०१४ रोजी त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.
  • दि. १९ ऑक्टोबर २०१४  रोजी महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत विजयी... कराड दक्षिण चे आमदार...
  • दि. 24 ऑक्टोबर २०१९ रोजी महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत विजयी... कराड दक्षिण चे आमदार
  • आशा प्रतिभावंत जनसामान्यांच्या विकासाभिमुख नेत्यांना साप्ताहिक "कुमजाई पर्व " परिवार कडून जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

*पाटण ते मुंबई पायी पदयात्रा : 15 मे रोजी झेंडा चौकातून मनसेचा एल्गार; ‘मोफत वीज आमच्या हक्काची’ - गोरख नारकर*

पाटणच्या स्वाभिमानासाठी लढाई, पक्ष-गट बाजूला ठेवून सामील होण्याचे आवाहन; मागण्यांसाठी मनसे आक्रमक *पाटण/प्रतिनिधी :* पाटण तालुक्...