बर्ड फ्लूच्या धर्तीवर पोल्ट्री व्यावसायिकांना मदत करण्यासाठी समिती स्थापन करावी, पोल्ट्री व्यावसायिकांवरील आपत्ती ही राष्ट्रीय असल्याने अनुदानातील भार उचलावा, अशी विनंती या वेळी करण्यात आली. या वेळी असोसिएशनचे अध्यक्ष सी.वसंतकुमार, उपाध्यक्ष श्रीकृष्ण गांगुर्डे, राजेंद्र थोरात, नबाजी काळभोर, पांडुरंग सांडभोर, डॉ. प्रसन्न पेडगावकर, श्याम भगत आदी चर्चेत सहभागी झाले होते
- प्रमुख मागण्या :
- सरकारने प्रतिपक्षी १०० रुपये नुकसानभरपाई अनुदान द्यावे.
- वीजबिले माफ करण्यात यावीत.
- शालेय मध्यान्ह भोजनात अंडी समाविष्ट करण्यात यावी.
- ग्रामपंचायत स्तरावरील व्यवसायाचा कर माफ करण्यात यावा.
- राज्य शासनाद्वारे कुक्कुटपालन व्यवसायास अर्थसहाय्य करणाऱ्या आर्थिक संस्थांना खेळत्या भांडवलाचे पुनर्गठन करून दीर्घकालीन भांडवली कर्जमध्ये करून एक वर्षाचा अधिस्थगन कालावधी द्यावा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा