शनिवार, ८ फेब्रुवारी, २०२०

गणेश नाईकांच्या साम्राज्याला खिंडार पडणार, नवी मुंबईत पुन्हा राजकीय भूकंप

नवी मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ आली असताना भाजप नेते गणेश नाईक यांच्या गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. तुर्भेमधील भाजपचे चार नगरसेवक शिवसनेच्या वाटेवर आहेत. नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांची तर शिवसेनेसोबतची जवळीक आजच्या कार्यक्रमातून पाहायला मिळाली. त्यांचा हा अघोषित शिवसेना प्रवेश मानला जात आहे.
ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरेश कुलकर्णी यांचे कौतुक केले. तसेच तुर्भेमधील झोडपट्टीला एसआरए लागू करण्याबाबत पावले उचलली जातील, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदेही चांगलेच सक्रिय झाले आहेत.
Ad

अशातच नगरसेवक फुटीची बातमी समोर आल्याने गणेश नाईक यांच्या अडचणी वाढू शकतात.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच नवी मुंबईत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला होता. या मेळाव्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीनही पक्षाच्या नेत्यांनी गणेश नाईक यांना आव्हान दिलं होतं.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मंद्रूळकोळे खुर्द येथे नविन ट्रान्सफॉर्मर बसविलाविकासाठी झुकते माप देणाऱ्या ना. शंभूराज देसाई यांचे आभार

ढेबेवाडी प्रतिनिधी            सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून मिळालेले मंद्रूळकोळे खुर्द येथे ...