शनिवार, ८ फेब्रुवारी, २०२०

पाटणमधील 144.500 ‍किमीच्या ग्रामीण रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नती

पाटण प्रतिनिधी ; राज्य शासनाकडे पाटण मतदारसंघातील ग्रामीण रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नती देण्याचा विषय प्रलंबीत होता. राज्यमंत्री शंभूराजे यांच्या प्रयत्नामुळे मतदारसंघातील 144.500 किलोमीटर लांबीच्या एकूण 10 ग्रामीण व इतर जिल्हा मार्गाच्या रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नती मिळाली असून दर्जोन्नती झालेल्या ग्रामीण रस्त्यांसाठी आता राज्याच्या अर्थसंकल्पातून निधी मिळणार आहे.
पाटण मतदारसंघातील डोंगरी आणि दुर्गम भागातील ग्रामीण व इतर जिल्हा मार्गाच्या रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्ग याप्रमाणे दर्जोन्नती मिळण्याचा विषय राज्याच्या सार्वजनीक बांधकाम विभागाकडे अनेक वर्षापासून प्रलंबीत होता.याकरीता शंभूराज देसाईंनी पंचवार्षिकमध्ये युतीच्या शासनाकडे पाठपुरावा करुन पाटण मतदारसंघातील ग्रामीण व इतर जिल्हा मार्गाच्या रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्ग असा दर्जा मिळणेकरीताचा आराखडा जिल्हा परीषद बांधकाम व सार्वजनीक बांधकाम विभागामार्फत तयार करुन घेतला
हा आराखडा सार्वजनीक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या निर्दशनास आणून देत या ग्रामीण व इतर जिल्हा मार्गावरील रस्त्यांच्या कामांना प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नती देण्याची आग्रही मागणी केली. 5 फेब्रुवारी 2020० रोजी शासन आदेश पारित झाला असून या निर्णयामध्ये 10 ग्रामीण आणि इतर जिल्हा मार्गावरील रस्त्यांचा समावेश आहे. दर्जोन्नती मिळालेल्या ग्रामीण आणि इतर जिल्हा मार्गावर आता राज्य शासनाच्या अर्थसंकल्पातून निधी उपलब्ध होणार असून दळणवळणाच्या दृष्टीने पाटण मतदारसंघाच्या विकासात यामुळे भर पडणार आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मंद्रूळकोळे खुर्द येथे नविन ट्रान्सफॉर्मर बसविलाविकासाठी झुकते माप देणाऱ्या ना. शंभूराज देसाई यांचे आभार

ढेबेवाडी प्रतिनिधी            सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून मिळालेले मंद्रूळकोळे खुर्द येथे ...