धक्कादायक बाब म्हणजे संंबंधित महिलेस गर्भपाताच्या गोळ्याही देण्यात आल्या होत्या. मात्र, तिने त्या खाल्ल्या नाहीत. त्यामुळे संबंधित महिलेस मारहाणही करण्यात आली. या प्रकारानंतर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. मात्र एवढा धक्कादायक प्रकार होऊनही 13 डिसेंबर 2019 रोजी पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्हा नोंद केला होता. अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतर पोलिसांनी पतीसह संबंधित पत्नीस पोलिस ठाण्यात बोलवले होते. तेव्हा पोलिसांसमोरही गर्भपात करून घेतल्याशिवाय घरात घेणार नसल्याचे सांगण्यात आल्याचा खळबळजनक दावा पत्नीच्या पित्याने केला आहे. पोलिसांनी पुढे काय केले ? हे मला ठाऊक नाही, पण मुलीस होणार्या मारहाणीसह तिच्यावर होणार्या अत्याचारात वाढच झाली आहे. पोलिस माझे वाकडे करू शकत नाहीत, तू गर्भपात करून न घेतल्यास मी तुला ठार मारीन, अशी धमकी संबंधित पत्नीस देण्यास सुरूवात करण्यात आल्याचा दावाही पत्नीच्या वडिलांनी केला आहे. लग्नात मुलीस आपण घातलेले दोन तोळ्याचे मंगळसूत्र काढून घेत रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घराबाहेर हाकलून देण्यात आले आणि सर्वजण कुलूप लावत तेथून निघून गेले. त्यामुळे संबंधित पत्नीस दुसर्या नातेवाईकांनी घरी नेले. त्यामुळे त्या नातेवाईकांनाही महिलेच्या सासरच्या लोकांनी शिवीगाळ केली.
दरम्यान, ही घटना ज्यांच्या समोर घडली, त्या गावच्या पोलीस पाटील व महिलांच्या सह्यांचा अर्ज साक्ष म्हणून घेऊन पुन्हा एकदा मला पतीकडेच नांदायचे आहे, मला न्याय द्या, असा लेखी अर्ज देऊन पतीला योग्य समज वा शासन करून मला न्याय द्यावा, अशी मागणी संबंधित पत्नीकडून करण्यात आल्याचा दावा तिच्या वडिलांनी केला आहे. दरम्यान, सासरचे लोक घराला कुलूप घालून परगावी निघून गेले आहेत. त्यामुळे संबंधित पिडीत महिला सासरच्या जुन्या घरात रहात आहे.
गर्भलिंग तपासणी की अन्य काही?
या धक्कादायक घटनेचा अत्याचारित पत्नीच्या वडिलांनी खुलासा केल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. संबंधित महिलेस दुसर्यांदाही मुलगीच होणार, याची माहिती नातेवाईकांना कशी मिळाली? कोणत्या आधारावर दुसरी मुलगीच होणार, असा दावा ठामपणे केला जात आहे? गर्भपातासाठी गोळ्या कोणी व कोठून आणल्या? पोलिसांसमोर धमकावले जाऊनही सखोल तपास का झाला नाही? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. तसेच वारंवार कुटुंंबात मुली होत असल्याच्या कारणावरून आपल्या मुलीसही मुलगीच होईल, असे सासरच्या लोकांना वाटत आहे. त्यामुळे गर्भपात करावा, असे सांगितले जात असल्याचा दावा पीडित महिलेच्या वडिलांनी केला असल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा