मंगळवार, १८ फेब्रुवारी, २०२०

15 तोळ्यांच्या दागिन्यांची तळमावले येथे चोरी

ढेबेवाडी  प्रतिनिधी ;- 

तळमावले, ता. पाटण येथे सुपुगडे वस्तीतील भरत सीताराम सुपुगडे यांच्या घरातून चोरट्यांनी सुमारे सहा लाख रुपये किमतीचे 15 तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना रविवारी सायंकाळी उशिरा उघडकीस आली.

याबाबत माहिती अशी, सुपुगडे कुटुंबीय रविवारी (दि. 16) पहाटे कोल्हापूरला देवदर्शनासाठी गेले होते. तेथून सायंकाळी ते घरी परतले. भरत सुपुगडे यांच्या पत्नी कविता या गळ्यातील दागिने नेहमीच्या ठिकाणी असलेल्या दागिन्यांच्या डब्यात ठेवायला गेल्या, तेव्हा डब्यात दागिने दिसले नाहीत. कुटुंबियांनी घरात रात्रभर दागिन्यांचा शोध घेतला. मात्र, दागिने न सापडल्याने ढेबेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

चोरट्यांनी 40 ग्रॅम वजनाचा लक्ष्मीहार, 25 ग्रॅम वजनाची सोनसाखळी व अंगठ्या अशा ऐवजावर डल्ला मारला.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कुंभारगाव (चिखलेवाडी) - कै. रंगुबाई यादव यांचे निधन.

कुंभारगाव , प्रतिनिधी : पाटण तालुक्यातील कुंभारगाव (चिखलेवाडी) येथील प्रा. सुरेश यादव यांच्या मातोश्री कै. रंगुबाई रघुनाथ यादव य...