सोमवार, १७ फेब्रुवारी, २०२०

पारनेर : पिंपळगाव रोठा येथील महादेव मंदिरात महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन

पारनेर प्रतिनिधी ;-
पारनेर तालुक्यातील पिंपळगावरोठा येथील श्री त्र्यंबकेश्वर महादेव देवस्थान येथे सालाबाद प्रमाणे शुक्रवारी २१ फेबुवारी रोजी महाशिवरात्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
कोरठण खंडोबापासून ३ कि.मी. अंतरावर असलेल्या पिंपळगावरोठा गावात श्री त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर पुरातन असून सूर्याचे पहिले किरण या मंदिरातील पिंडीवर पडतात.या मंदिराचा जीर्णोद्धार २००३ साली झाला असून कलशारोहन स्वामी गगनगिरी महाराज व राष्ट्रसंत भैयूजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे.श्री त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्री महोत्सवाचे २१ फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले आहे.महाशिवरात्री पर्वणीत २१ फेबुवारी रोजी सकाळी ७ वाजता अभिषेक महापूजा,आरती,सकाळी ९ वाजता शारदाताई महाराज सूर्यवंशी (नाशिक) यांचे सुश्राव्य कीर्तन होईल, १२ वाजता महाप्रसाद फराळाचे वाटप ग्रामस्थाच्या सहकार्याने करण्यात येणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

*यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार 2026 जाहीर*यशवंतराव चव्हाण फाउंडेशन, मुंबई चा उपक्रम*मा.सौ. आनंदीबाई दत्तात्रय शिंगारे आदर्श माता म्हणून विशेष सन्मान*

मुंबई - यशवंतराव चव्हाण फाउंडेशन, मुंबई यांच्या वतीने सामाजिक, सहकार ,संस्कृती ,साहित्य ,कला , पत्रकारिता, वैद्यकीय सेवा , क्रीड...