गुरुवार, १७ जुलै, २०२५

मलकापूर कराड ढेबेवाडी रोडवर 'ड्रंक अँड ड्राईव्ह'चा थरार ! मद्यधुंद डॉक्टरने दोन दुचाकींसह तिघांना उडवले.

मलकापूर कराड ढेबेवाडी रोडवर 'ड्रंक अँड ड्राईव्ह'चा थरार ! मद्यधुंद डॉक्टरने दोन दुचाकींसह तिघांना उडवले.

मद्यधुंद डॉक्टरने दोन दुचाकीसह दोन महिला व एका वृद्ध व्यक्तीला उडवले. या 'ड्रंक अँड ड्राईव्ह' अपघातात तिघे गंभीर जखमी झाले. आगाशिवनगर- मलकापूर (ता. कराड) येथील शिवछावा चौकात बुधवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

अपघातानंतर कराड ढेबेवाडी रस्त्यावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. संबंधित मद्यधुंद डॉक्टरला पोलीस कर्मचाऱ्यांनी महामार्ग पोलीस चौकीत ताब्यात घेतले आहे. डॉ. राजाराम जगताप (रा. कार्वे, ता. कराड) असे मद्यधुंद डॉक्टरचे नाव आहे. तर पोपट कांबळे (वय ६५ रा. आगशिवनगर) व यांच्यासह दोघी मायलेकी अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. मायलेकी कारच्या धडकने दुचाकीवर आदळल्या.

मद्यधुंद डॉक्टर कार (एमएच ५० ए ५६५९) घेऊन कराडच्या दिशेने जात होता. कराड- ढेबेवाडी मार्गावर मोरया कॉम्प्लेक्स ते शिवछावा चौक या २०० मीटरच्या अंतरात दोन दुचाकीसह एक वयस्कर व्यक्ती व दोन मायलेकींना त्याच्या कारने उडवले. या अपघातात वृद्ध व्यक्तीच्या पायावरून कार गेल्यामुळे तो गंभीर जखमी झाला. तर चालत घरी निघालेल्या मायलेकींना धडक दिल्याने त्या दोघी उडून रस्त्याकडल्या लावलेल्या दुचाकीवर पडल्याने त्या दोघीही गंभीर जखमी झाल्या आहेत. खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांच्या दोन दुचाकीनाही कारने धडक दिल्यामुळे दुचाकींचे नुकसान झाले आहे.

मद्यधुंद डॉक्टरची पोलिसांशी हुज्जत
अपघातानंतर आसपासच्या दुकानदारांनी अपघात स्थळी धाव घेतली. अपघाताची बातमी कराड शहर पोलिसांना देण्यात आली. कराड शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदीप सूर्यवंशी यांच्यासह कर्मचारी तातडीने अपघातस्थळी धावले. जखमींना तातडीने उपचारासाठी कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले. संबंधित मद्यधुंद डॉक्टरला महामार्ग पोलीस चौकीत कारसह ताब्यात घेतले. यावेळी डॉक्टरने पोलिसांशीही हुज्जत घातली. अपघाताची नोंद घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

बुधवार, १६ जुलै, २०२५

गट अन् गणांत मोडतोड, गावांचीही अदलाबदल; सातारा जिल्हा परिषद, पंचायत समितीची प्रारूप रचना जाहीर.

गट अन् गणांत मोडतोड, गावांचीही अदलाबदल; सातारा जिल्हा परिषद, पंचायत समितीची प्रारूप रचना जाहीर.

सातारा जिल्हा परिषदेची निवडणुकीसाठी जिल्ह्यातील ६५ गट आणि पंचायत समितीच्या १३० गणांचा प्रारूप आराखडा सोमवारी जाहीर करण्यात आला. यामध्ये काही तालुक्यांतील गट आणि गणांत मोडतोड झाली असून नावेही बदलली आहेत.

काही ठिकाणी गावांची अदलाबदलही झाली आहे. त्यामुळे खटाव, फलटण आणि काेरेगाव तालुक्यात प्रत्येकी एक गट आणि दाेन गट वाढले आहेत. यावर २१ जुलैपर्यंत हरकती नोंदवता येणार आहेत.

जिल्हा प्रशासनाने जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांची प्रभाग रचना प्रसिद्ध केली. यामध्ये बहुतांशी जुन्या गटांची आणि गणांची नावे जैसे थेच आहेत. पण, काही ठिकाणी बदल झाला आहे. तसेच खटाव, कोरेगाव आणि खटाव तालुक्यात प्रत्येकी एक गट आणि दोन गण वाढलेत. यामुळे या तालुक्यात पूर्वीच्या गट आणि गणात मोडतोड झाली आहे. काही गावे दुसरीकडे, तसेच नवीन गट-गणात जोडण्यात आली आहेत.

तसेच याच तालुक्यात नवीन गट आणि गण निर्माण झालेत. त्यातील काही पूर्वीचे गट होते. या प्रारूप रचनेवर २१ जुलैपर्यंत आलेल्या हरकतीवर विभागीय आयुक्तांसमोर प्रत्यक्षात सुनावणी होणार आहे.

तालुकानिहाय गट अन् गण..

पाटण
गोकुळ तर्फ हेळवाक - गोकुळ, कामगरगाव
तारळे - तारळे, मुरुड
म्हावशी - म्हावशी, चाफळ
मल्हारपेठ - मल्हारपेठ, नाडे
मारुल हवेली - मारुल हवेली, नाटोशी
मंद्रूळ कोळे - मंद्रूळ कोळे, सणबूर
काळगाव - काळगाव, कुंभारगाव

कऱ्हाड
गट - गण
पाल - पाल, चरेगाव
उंब्रज - उंब्रज, तळबीड
मसूर - मसूर, वडोली भिकेश्वर
कोपर्डे हवेली - कोपर्डे हवेली, वाघेरी
सैदापूर - सैदापूर, हजारमाची
वारुंजी - वारुंजी, कोयना वसाहत
तांबवे - तांबवे, सुपने
विंग - विंग, कोळे
कार्वे - कार्वे, गोळेश्वर
रेठरे बुद्रुक - रेठरे बुद्रुक, शेरे
काले - काले, कालवडे
येळगाव - येळगाव, सवादे

मंगळवार, १५ जुलै, २०२५

पाटण तालुका पोलिस पाटील कार्यकारणी पद ग्रहण व सत्कार समारंभ संपन्न.

पाटण तालुका पोलिस पाटील कार्यकारणी पद ग्रहण व सत्कार समारंभ संपन्न.

  तळमावळे ता.पाटण महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघ पाटण तालुका नूतन कार्यकारणी पदग्रहण समारंभ रविवार १३ जुलै रोजी तळमावले तालुका पाटण येथे  राज्याध्यक्ष श्री बाळासाहेब शिंदे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व विभागीय अधिकारी पाटण सोपान जी टोणपे (प्रांत),  व उपविभागीय पोलीस अधिकारी पाटण विजय पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त संतोष पवार, ढेबेवाडी पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ, प्रवीण दाईगडे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष हनुमंतराव सोनवलकर, जिल्हाध्यक्ष प्रदीप गाढवे,खेड तालुका अध्यक्ष दीपक पावडे तसेच सातारा जिल्ह्यातील सर्व तालुकाप्रमुख पदाधिकारी व पोलीस पाटील यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. 

नूतन पाटण तालुका पोलीस पाटील कार्यकारणी अध्यक्ष म्हणून काळगाव पोलिस पाटील नितीन जगन्नाथ पाटील उपाध्यक्ष विक्रम दिनकर वरेकर, सचिव संग्राम पांढरपट्टे, सहसचिव अमोल गायकवाड, सदस्य विकास माने, बजरंग रामिस्टे, महादेव वरेकर, नितीन पाटील, संदीप भिंगारदेवे, प्रकाश लोखंडे, दिनकर कदम, संध्या बाटे, वैशाली चव्हाण, कांचन सुतार, विद्या माने यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी पाटणचे डी, वाय,एस, पी विजय पाटील,उपविभागीय अधिकारी सोपान टोणपे (प्रांत),सहाय्यक आयुक्त मुंबई संतोष पवार,प्रदीप गाढवे जिल्हाध्यक्ष पोलीस पाटील संघ यांनी आपले मनोगते व्यक्त केली यावेळी मुंबई पोलिस आयुक्त संतोष पवार यांचा पाटण पोलिस पाटील यांचे वतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाची प्रस्तावना,सूत्रसंचलन पोलिस पाटील अमित शिंदे यांनी केले आभार संतोष पवार यांनी मानले.

रविवार, १३ जुलै, २०२५

राष्ट्रसेवा आरोग्य कर्मचारी संघटना सातारा ची जिल्हास्तरीय सहविचार सभा उत्साहात संपन्न..



   शनिवार दिनांक 12/07/2025 रोजी राष्ट्रसेवा आरोग्य कर्मचारी संघटना सातारा ची जिल्हास्तरीय सहविचार सभा ग्रामविकास भवन सातारा येथे जिल्हा अध्यक्ष श्री चंद्रकांत पाटील यांचे अध्यक्षतेखाली आणि बहुसंख्य सभासदांच्या उपस्थितीत पार पडली.यावेळी आरोग्य कर्मचारी बांधवांच्या समस्या सोडवण्याबाबत संघटनेमार्फत ठोस पाऊले उचलण्याबाबत सर्वानुमते निर्णय घेण्यात आले.यामध्ये..
🔸जिल्हा परिषद सातारा कडील आरोग्य कर्मचारी यांचे नियमित मासिक वेतन 2 ते 3 महिने प्रलंबित राहत असून हे वेतन वेळेवर न झाल्यास संघटनेमार्फ ऑनलाईन हजेरीवर बहिष्कार तसेच रिपोर्टिंग बंद करण्याबाबतचे निवेदन मा.जिल्हा आरोग्य अधिकारी यांना देण्याचे ठरले.तसेच सेवेत नव्याने रुजू आरोग्य कर्मचारी यांचे सेवाविषय प्रश्न सोडविण्याबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल.

🔸हिवताप विभागडील आरोग्य कर्मचारी यांचे विनंती बदली प्रक्रिया समुपदेशन पद्धत राबवून करणे,एकूण रिक्त पदांपैकी 25 टक्के पदे सरळ सेवेने भरली असून उर्वरित रिक्त 75 टक्के पदांवर पदोन्नती होण्यासाठी विभागीय स्तरावर पाठपुरावा करण्याचे ठरवण्यात आले.

    *यासोबतच जिल्हा संघटना राज्य कार्यकारिणी बरोबर करत असलेल्या कामकाजाची माहिती कर्मचारी बांधवांना देण्यात आली.यामध्ये आरोग्य सेवक पदनाम बदल,वेतन त्रुटी दूर करण्यासाठी संघटनेने केलेलं प्रयत्न,ऑनलाईन कामकाज करण्यासाठी इतर संवर्गीय कर्मचाऱ्याप्रमाणे आरोग्य सेवक बांधवांना मोबाईल भत्ता मंजूर करण्यासाठी पाठपुरावा,दुसरा आणि चौथा शनिवार सुट्टी मिळण्यासाठी संघटनेने केलेले प्रयत्न यांची माहिती कर्मचाऱ्यांना देण्यात आली.यावेळी कार्यक्षेत्रात कर्मचारी बांधवांना कामकाज करत असताना येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा करून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले.यावेळी नवीन कर्मचारी बांधवांचे संघटनेमार्फत स्वागत करण्यात आले*

   *यावेळी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष श्री गणेश दहिफळे,जिल्हा अध्यक्ष श्री चंद्रकांत पाटील,जिल्हा सचिव श्री श्रीकांत माळवे,जिल्हा कार्यकारी अध्यक्ष श्री रामहरी तांदळे,श्री सुखदेव वायदंडे,जिल्हा उपाध्यक्ष श्री सचिन राठोड,श्री अमोल गंबरे,श्री प्रशांत तायडे,श्री संदीप साळुंखे,संघटक श्री रोहित भोकरे,श्री महेश जाधव श्री हणमंत बरकडे यांचेसह बहुसंख्य कर्मचारी बांधव उपस्थित होते.*

गुरुवार, १० जुलै, २०२५

पाटण - मनसे आक्रमक! 'पाटणला मनसेचे उपोषण सुरूच'; दुसऱ्या दिवशी अनेकांची भेट, कराड - चिपळूण रस्त्याचा प्रश्न.

पाटण - मनसे आक्रमक! 'पाटणला मनसेचे उपोषण सुरूच'; दुसऱ्या दिवशी अनेकांची भेट, कऱ्हाड- चिपळूण रस्त्याचा प्रश्न.


पाटण : कराड - चिपळूण राष्ट्रीय महामार्गाची झालेली दुरवस्था व लेखी आश्वासन देऊनही केलेल्या टोलवाटोलवीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष गोरख नारकर यांनी कालपासून येथील प्रांत कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.उपोषण आज दुसऱ्या दिवशीही कायम राहिले.

वारंवार पत्रव्यवहार, आंदोलने, उपोषणे करूनही राष्ट्रीय महामार्ग व संबंधित प्रशासन कंपनीला पाठीशी घालत असल्याचा आरोप होत आहे. कऱ्हाड- चिपळूण रस्त्याच्या कामाबाबत अनेक तक्रारी होऊन वारंवार बैठका देखील झाल्या. मात्र, राष्ट्रीय महामार्ग विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. उपोषणादरम्यान केलेल्या मागण्यांची पूर्तता झाल्याशिवाय आंदोलन स्थगित करणार नाही.

उपोषण ठिकाणी येऊन गोड बोलण्याला भाळणार नाही. राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी करमणूक कार्यक्रमाला गेल्यासारखे आंदोलन पाहायला येतात. त्यांना आंदोलनाचे गांभीर्य नाही. संबंधित कंपनी व ठेकेदाराविरोधात कारवाई केल्यावरच मनसेचे आंदोलन स्थगित होईल, अन्यथा आंदोलनाची तीव्रता वाढवू, असा इशारा नारकर व मनसे पदाधिकारी यांनी आज दिला.

उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी पोलिस निरीक्षक अविनाश कवठेकर यांनी भेट दिली. दरम्यान, दयानंद नलावडे, राहुल संकपाळ, भाजप समन्वयक विक्रमबाबा पाटणकर, अक्षय देसाई, संपत देसाई, बापू टोळे, संजय पवार, बळीराम गायकवाड, चंद्रकांत देसाई यांनी आज आंदोलनाला पाठिंबा दिला.

पाटणमध्ये उलटा धबधबा पाहायला गेले, कार ३०० फूट दरीत कोसळली; फोटोशूटच्या नादात अपघात.

पाटण - धबधबा पाहायला गेलेल्या युवकांची कार दरीत कोसळली; फोटोशूटच्या नादात अपघात.

पाटण तालुक्यातील सडा वाघापूर रस्त्यावर गुजरवाडीनजीक टेबल पॉईंटवरत कार खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात साहिल अनिल जाधव (वय २० रा. गोळेश्वर, ता. कराड) गंभीर जखमी झाला. जखमीला उपचारासाठी कराडच्या सह्याद्री हाँस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे.

हा अपघात बुधवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या दरम्यान झाला.

– कार गवतावरून घसरून थेट दरीत
सडा वाघापूरला उलटा धबधबा पाहायला जात असताना टेबल पॉईंटवरती अनेक पर्यटक फोटोशूट व करमणुकीसाठी थांबतात. बुधवारी सायंकाळी ४ च्या दरम्यान साहिल अनिल जाधव आपल्या मित्रांसमवेत फिरण्यासाठी आला होता. सोबतचे मित्र फोटो काढण्यात मग्न होते. दरम्यान, गाडीमध्ये साहिल जाधव हा एकटाच होता. गाडीला हॅंण्ड ब्रेक लागला नसल्याने गाडी गवतावरुन खोल दरीत कोसळली.

शेळ्या चारणाऱ्या युवकाचे प्रसंगावधान.
म्हावशी येथील बकरी चारण्यासाठी गेलेल्या मंगेश तुकाराम जाधव या युवकास अपघाताचा आवाज आल्याने तो घटनास्थळी पोहचला. दरीतील कोसळलेल्या गाडीचा दरवाजा तोडून त्याने अडकलेल्या अनिलला बाहेर काढले. यावेळी उपस्थित नागरिकांनी आरडाओरडा करत प्रशासनाशी संपर्क साधला. उपस्थितांनी प्रसंगावधान राखत जखमीस तात्काळ उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. नशीब बलवत्तर म्हणून साहिलचे प्राण वाचले. जखमी साहिलची तब्येत बरी असल्याचे दवाखाना प्रशासनाने सांगितले.


बुधवार, ९ जुलै, २०२५

मुख्यालयी अनुपस्थित अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत: पाटण पंचायत समितीकडून यादी मागवली

मुख्यालयी अनुपस्थित अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत: पाटण पंचायत समितीकडून यादी मागवली.

पाटण - राज्य शासनाच्या स्पष्ट आदेशांना न जुमानता, जिल्ह्यातील 36 विभागांतील अनेक प्राथमिक शिक्षक, पर्यवेक्षक, मुख्याध्यापक, ग्रामविकास अधिकारी, आरोग्य सेवक आणि सहाय्यक अधिकारी 16 जून 2025 पासून मुख्यालयी उपस्थित राहत नसल्याचे उघड झाले आहे.

पाटण पंचायत समितीला 8 जुलै रोजी प्राप्त झालेल्या अधिकृत ई-मेलमुळे मुख्यालयी राहणे टाळणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

पाटण पंचायत समितीला मंगळवारी प्राप्त झालेल्या ई-मेलमध्ये मुख्यालयी नियमित उपस्थित न राहणाऱ्या अधिकाऱ्यांची यादी मागवण्यात आली आहे. यासोबतच जिल्हा परिषदेने संबंधितांवर दंडात्मक कारवाईचे संकेत दिले आहेत. अनेक अधिकारी आणि कर्मचारी शासकीय आदेश धुडकावून मुख्यालयी राहत नसल्याने प्रशासनाने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे.

शिस्तभंगाची कारवाई सुरू होणार
या ई-मेलनंतर पंचायत समितीच्या प्रशासकीय कामांना वेग आला असून, मुख्यालयी अनुपस्थित असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. यामुळे अधिकाऱ्यांमध्ये चिंता आणि गोंधळाचे वातावरण आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अधिक सतर्क झाले असून, शासनाचे आदेश झुगारणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.

मंद्रूळकोळे खुर्द येथे नविन ट्रान्सफॉर्मर बसविलाविकासाठी झुकते माप देणाऱ्या ना. शंभूराज देसाई यांचे आभार

ढेबेवाडी प्रतिनिधी            सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून मिळालेले मंद्रूळकोळे खुर्द येथे ...