गुरुवार, १७ जुलै, २०२५

मलकापूर कराड ढेबेवाडी रोडवर 'ड्रंक अँड ड्राईव्ह'चा थरार ! मद्यधुंद डॉक्टरने दोन दुचाकींसह तिघांना उडवले.

मलकापूर कराड ढेबेवाडी रोडवर 'ड्रंक अँड ड्राईव्ह'चा थरार ! मद्यधुंद डॉक्टरने दोन दुचाकींसह तिघांना उडवले.

मद्यधुंद डॉक्टरने दोन दुचाकीसह दोन महिला व एका वृद्ध व्यक्तीला उडवले. या 'ड्रंक अँड ड्राईव्ह' अपघातात तिघे गंभीर जखमी झाले. आगाशिवनगर- मलकापूर (ता. कराड) येथील शिवछावा चौकात बुधवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

अपघातानंतर कराड ढेबेवाडी रस्त्यावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. संबंधित मद्यधुंद डॉक्टरला पोलीस कर्मचाऱ्यांनी महामार्ग पोलीस चौकीत ताब्यात घेतले आहे. डॉ. राजाराम जगताप (रा. कार्वे, ता. कराड) असे मद्यधुंद डॉक्टरचे नाव आहे. तर पोपट कांबळे (वय ६५ रा. आगशिवनगर) व यांच्यासह दोघी मायलेकी अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. मायलेकी कारच्या धडकने दुचाकीवर आदळल्या.

मद्यधुंद डॉक्टर कार (एमएच ५० ए ५६५९) घेऊन कराडच्या दिशेने जात होता. कराड- ढेबेवाडी मार्गावर मोरया कॉम्प्लेक्स ते शिवछावा चौक या २०० मीटरच्या अंतरात दोन दुचाकीसह एक वयस्कर व्यक्ती व दोन मायलेकींना त्याच्या कारने उडवले. या अपघातात वृद्ध व्यक्तीच्या पायावरून कार गेल्यामुळे तो गंभीर जखमी झाला. तर चालत घरी निघालेल्या मायलेकींना धडक दिल्याने त्या दोघी उडून रस्त्याकडल्या लावलेल्या दुचाकीवर पडल्याने त्या दोघीही गंभीर जखमी झाल्या आहेत. खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांच्या दोन दुचाकीनाही कारने धडक दिल्यामुळे दुचाकींचे नुकसान झाले आहे.

मद्यधुंद डॉक्टरची पोलिसांशी हुज्जत
अपघातानंतर आसपासच्या दुकानदारांनी अपघात स्थळी धाव घेतली. अपघाताची बातमी कराड शहर पोलिसांना देण्यात आली. कराड शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदीप सूर्यवंशी यांच्यासह कर्मचारी तातडीने अपघातस्थळी धावले. जखमींना तातडीने उपचारासाठी कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले. संबंधित मद्यधुंद डॉक्टरला महामार्ग पोलीस चौकीत कारसह ताब्यात घेतले. यावेळी डॉक्टरने पोलिसांशीही हुज्जत घातली. अपघाताची नोंद घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...