बुधवार, ९ जुलै, २०२५

मुख्यालयी अनुपस्थित अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत: पाटण पंचायत समितीकडून यादी मागवली

मुख्यालयी अनुपस्थित अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत: पाटण पंचायत समितीकडून यादी मागवली.

पाटण - राज्य शासनाच्या स्पष्ट आदेशांना न जुमानता, जिल्ह्यातील 36 विभागांतील अनेक प्राथमिक शिक्षक, पर्यवेक्षक, मुख्याध्यापक, ग्रामविकास अधिकारी, आरोग्य सेवक आणि सहाय्यक अधिकारी 16 जून 2025 पासून मुख्यालयी उपस्थित राहत नसल्याचे उघड झाले आहे.

पाटण पंचायत समितीला 8 जुलै रोजी प्राप्त झालेल्या अधिकृत ई-मेलमुळे मुख्यालयी राहणे टाळणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

पाटण पंचायत समितीला मंगळवारी प्राप्त झालेल्या ई-मेलमध्ये मुख्यालयी नियमित उपस्थित न राहणाऱ्या अधिकाऱ्यांची यादी मागवण्यात आली आहे. यासोबतच जिल्हा परिषदेने संबंधितांवर दंडात्मक कारवाईचे संकेत दिले आहेत. अनेक अधिकारी आणि कर्मचारी शासकीय आदेश धुडकावून मुख्यालयी राहत नसल्याने प्रशासनाने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे.

शिस्तभंगाची कारवाई सुरू होणार
या ई-मेलनंतर पंचायत समितीच्या प्रशासकीय कामांना वेग आला असून, मुख्यालयी अनुपस्थित असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. यामुळे अधिकाऱ्यांमध्ये चिंता आणि गोंधळाचे वातावरण आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अधिक सतर्क झाले असून, शासनाचे आदेश झुगारणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...