गुरुवार, १० जुलै, २०२५

पाटणमध्ये उलटा धबधबा पाहायला गेले, कार ३०० फूट दरीत कोसळली; फोटोशूटच्या नादात अपघात.

पाटण - धबधबा पाहायला गेलेल्या युवकांची कार दरीत कोसळली; फोटोशूटच्या नादात अपघात.

पाटण तालुक्यातील सडा वाघापूर रस्त्यावर गुजरवाडीनजीक टेबल पॉईंटवरत कार खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात साहिल अनिल जाधव (वय २० रा. गोळेश्वर, ता. कराड) गंभीर जखमी झाला. जखमीला उपचारासाठी कराडच्या सह्याद्री हाँस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे.

हा अपघात बुधवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या दरम्यान झाला.

– कार गवतावरून घसरून थेट दरीत
सडा वाघापूरला उलटा धबधबा पाहायला जात असताना टेबल पॉईंटवरती अनेक पर्यटक फोटोशूट व करमणुकीसाठी थांबतात. बुधवारी सायंकाळी ४ च्या दरम्यान साहिल अनिल जाधव आपल्या मित्रांसमवेत फिरण्यासाठी आला होता. सोबतचे मित्र फोटो काढण्यात मग्न होते. दरम्यान, गाडीमध्ये साहिल जाधव हा एकटाच होता. गाडीला हॅंण्ड ब्रेक लागला नसल्याने गाडी गवतावरुन खोल दरीत कोसळली.

शेळ्या चारणाऱ्या युवकाचे प्रसंगावधान.
म्हावशी येथील बकरी चारण्यासाठी गेलेल्या मंगेश तुकाराम जाधव या युवकास अपघाताचा आवाज आल्याने तो घटनास्थळी पोहचला. दरीतील कोसळलेल्या गाडीचा दरवाजा तोडून त्याने अडकलेल्या अनिलला बाहेर काढले. यावेळी उपस्थित नागरिकांनी आरडाओरडा करत प्रशासनाशी संपर्क साधला. उपस्थितांनी प्रसंगावधान राखत जखमीस तात्काळ उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. नशीब बलवत्तर म्हणून साहिलचे प्राण वाचले. जखमी साहिलची तब्येत बरी असल्याचे दवाखाना प्रशासनाने सांगितले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...