संपादक - प्रदीप विष्णु माने 8108253323 ताज्या बातम्या सामाजिक,राजकारण, मनोरंजन,क्रीडा आणि इतर
बुधवार, १८ मार्च, २०२०
संदीप डाकवे ‘डिप्लोमा इन नॅचरोपॅथी’ कोर्स मध्ये उत्तीर्ण
सातारा ;- जिल्हा परिषद विषय समिती सदस्यांच्या सर्व निवडी बिनविरोध
साताराजिल्हा परिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सदस्यपदी 21 जणांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीत अनेक दिग्गजांचा समावेश आहे. या निवडीची घोषणा अर्थसंकल्पीय सभेत अध्यक्ष उदय कबुले यांनी केली.
सातारा जिल्हा परिषदेत पदाधिकारी बदलानंतर विषय समित्यांच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला होता.
मागील सभेत सदस्यांना निवडणूक कार्यक्रम वेळेत न पोहोचल्याने निवडीची प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. अर्थसंकल्पीय सभेत या निवडी होणार होत्या. त्यानुसार अपेक्षेप्रमाणे या निवडी बिनविरोध झाल्या. अध्यक्ष उदय कबुले यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी कॉंग्रेसची मंगळवारी सकाळी बैठक झाली. या बैठकीत सदस्य निवडीवर शिक्कामोर्तब झाले होते.उदय कबुले यांनी अर्थसंकल्पीय सभेत या निवडीची घोषणा केली.
स्थायी समितीवर माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी समाजकल्याण सभापती शिवाजी सर्वगौड, दीपक पवार, जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीवर वनिता गोरे, कृषी समितीवर माजी शिक्षण सभापती राजेश पवार, अनंत तांबे, समाजकल्याण समितीवर प्रवीण ताटे, सौ. संगीता चव्हाण, शिक्षण समितीवर शिवरुपराजे खर्डेकर, वसंतराव मानकुमरे, बांधकाम समितीवर मनोज पवार, अर्थ समितीवर कविता जगदाळे, मनोज पवार, रेखा घार्गे, अंजना कदम, पशुसंवर्धन समितीवर सौ. जयश्री गिरी, वसंतराव मानकुमरे, आरोग्य समितीवर राजाभाऊ शेलार, राजेश पवार, राजाभाऊ जगदाळे, महिला व बालकल्याण समितीवर सातारा पंचायत समितीच्या सभापती सौ. सरिता इंदलकर यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर सदस्यांनी अभिनंदनपर भाषणे केली. ज्येष्ठ सदस्य भीमराव पाटील यांनी राज्यातील महाविकास आघाडीचा फॉर्म्युला जिल्हा परिषदेत राबवला जावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
पाटण :- मुंबई -पुण्यातुन गावी येणाऱ्या गावकऱ्यांची नोंद करणार
मंगळवार, १७ मार्च, २०२०
महाराष्ट्र :- राज्य निवडणूक आयोगाकडून सर्व निवडणूक प्रक्रिया थांबवली
"चंद्रकांतदादा जरा जपून बोला नाहीतर"
नवी मुंबई | भाजप सत्तेत असताना मागची वर्षे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपाशी असल्यासारखे बसले होते, अशी बोचरी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती. त्यांच्या याच टीकेला आता राष्ट्रवादीच्या गोटातून प्रत्युत्तर दिलं जात आहे. राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांनी चंद्रकांत पाटील यांना इशारा दिला आहे.
पवारसाहेबांबद्दल विधान करताना जरा जपून विधान करावं. प्रदेशाध्यक्ष म्हणून काहीही वेड्यासारखं बरळू नये. नाही तर तुम्हाला तुमची उंची काय आहे हे दाखवावं लागेल, असा इशारा शशिकांत शिंदे यांनी पाटील यांना दिला आहे.
सत्ता नसल्यामुळे चंद्रकांत पाटील काहीही बरळत सुटले आहेत.
पवारसाहेबांच्या बद्दल चंद्रकांत पाटील यांची गेल्या काही महिन्यांत सतत वेगवेगळी विधाने येत आहेत. एका बाजूला पवारांवर पीएचडी करायचं विधान करतात. एका बाजूला दुसरं काहीतरी विधान करतात. चंद्रकांत पाटलांना राजकारणाचा मागमूस आहे की नाही याची शंका यायला लागलीय. पवार साहेबांनी महाराष्ट्रात काय इतिहास घडवला हे तुम्ही पाहत होता, अशी आठवणही त्यांनी करून दिली आहे.
7 दिवस सरकारी कार्यालयं बंद राहणार नाही; सरकारने मोठा निर्णय टाळला
मुंबई | कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व सरकारी कार्यालये 7 दिवस बंद ठेवण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. सह्याद्री अतिथीगृहावर महत्त्वाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी 'करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने मोठे आणि महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.पुढील सात दिवस सर्व सरकारी कार्यालये बंद ठेवण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला,' असं ट्वीट केलं होतं. मात्र त्यांनी नंतर ते ट्वीट डिलीट केलं
काल मंत्रालयात एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे हे कळाल्यावर प्रशासनाने आज मोठं पाऊल उचललं आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना आता 7 दिवस सुट्टी मिळणार आहे.
राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालये तसंच तहसीलदार कार्यालय तसंच विविध सरकारी कार्यालये बंद राहणार आहेत. दुसरीकडे मुंबईतची लाईफ लाईन लोकल देखील टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा विचार शासन करत आहेत.
दरम्यान, सगळ्या खासगी कार्यालयांना वर्क फ्रॉम होम देण्याच्या सूचना राज्य सरकारने केल्या आहेततसंच येणाऱ्या काही दिवसांत अनावश्य गर्दी टाळण्यासाठी लोकांनी देखील अधिक जागरूक राहणं गरजेचं आहे..
मुंबई :- महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
आठवड्याभरात कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. १०८ जण संशयित असून त्यांना विलगिकरण कक्षात दाखल करण्यात आलं आहे. तर १०६३ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे.
*लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण व खाऊ वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न*
कुंभारगाव, दि. २२ जुलै : *महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार व परिपत्रकानुसार महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्र...
-
कुंभारगाव साप्ताहिक कुमजाई पर्व न्यूज प्रतिनिधी. दि. 14 जुलै 2026 चिखलेवाडी ग्रामपंचायत हद्दीत मोरेवाडी येथे सोमवारी रात्रीच्य...
-
धक्कादायक घटना! मलकापुरात मित्राकडूनच मित्राचा खून — दारूच्या नशेत उफाळला जुन्या वादाचा राग मलकापूर (कुमजाई पर्व प्रतिनिधी) ...
-
*कुंभारगाव–गलमेवाडीत रात्रीचा थरार: घराजवळील शेडमध्ये बिबट्याचा हल्ला, दोन शेळ्यांचा फडशा.* भरवस्तीत शिरून शेळ्यांवर हल्ला; द...