संपादक - प्रदीप विष्णु माने 8108253323 ताज्या बातम्या सामाजिक,राजकारण, मनोरंजन,क्रीडा आणि इतर
शनिवार, ४ जानेवारी, २०२०
पाणीप्रश्न कायस्वरूपी सुटावा या मागणीसाठी मंत्रीपदावर सोडले पाणी : आमदार निलेश लंके
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे 2000 रुपये तुमच्या खात्यात पोहोचले नाहीत? येथे करा तक्रार
भारत सरकारने शेतकर्यांना एक मोठी भेट दिली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा दुसरा टप्पा सरकारने सुरू केला आहे. या योजनेत सरकारने देशातील 6 कोटी शेतकर्यांच्या खात्यावर 2000 रुपये पाठविले आहेत. तथापि, जर या योजनेअंतर्गत एखाद्या शेतकऱ्याला पैसे मिळाले नाहीत तर काळजी करण्याचे कारण नाही, कारण आपण आता केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे तक्रार करू शकता. केंद्र सरकारने सुरू केलेली ही सर्वात मोठी शेतकरी संबंधित योजना आहे आणि प्रत्येक शेतकर्याचा फायदा व्हावा यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे, जेणेकरून शेती संकट संपेल
सर्व प्रथम, आपल्याला आपल्या क्षेत्रातील लेखापाल आणि कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा लागेल आणि त्यांना त्याबद्दल माहिती द्यावी लागेल.जर हे लोक आपले म्हणणे ऐकत नाहीत तर आपण त्यासंबंधित हेल्पलाइनवर देखील कॉल करू शकता.
सोमवार ते शुक्रवार या काळात पंतप्रधान-किसान हेल्प डेस्क (पीएम-किसन हेल्प डेस्क) वर ईमेल (ईमेल) pmkisan-ict@gov.in वर संपर्क साधता येईल. तेथून काही फरक पडत नसेल तर या सेलच्या फोन नंबर 011-23381092 (डायरेक्ट हेल्पलाइन) वर कॉल करा.
केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी म्हणतात की, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे पैसे कोणत्याही शेतकऱ्याच्या बँक खात्यात पोहोचले नाहीत तर ते सोडविले जाईल.
चौधरी म्हणतात की, जर पैसे शेतकर्याच्या खात्यावर पोहोचले नाहीत किंवा तांत्रिक अडचण आली असेल तर तो कोणत्याही परिस्थितीत निश्चित करेल. ते म्हणाले, 'आमचा प्रयत्न आहे की प्रत्येक शेतकऱ्याला याचा फायदा मिळाला पाहिजे, म्हणूनच सरकारने पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत वचन दिल्याप्रमाणे या योजनेचा विस्तार केला.'
शेतकरी सतत तक्रारी करीत आहेत
गेल्या अनेक महिन्यांपासून किसान सन्मान निधी योजनेबाबत तक्रारी येत आहेत. नोंदणीकृत शेतकर्यांनाही पैसे मिळत नसल्याची तक्रार येत आहे. काही गावात दोन शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा झाले आहेत, तर काही शेतकरी असे आहेत की ज्यांचा पहिला हप्ता त्यांच्या खात्यावर पोहोचला नाही. काही लोकांना त्यांच्या खात्यात पहिला हप्ता मिळाला आहे आणि दुसरा हप्ता सापडला नाही. अशा लोकांनी प्रथम त्यांचे लेखापाल आणि कृषी अधिकारी यांना विचारावे की त्यांचे नाव लाभार्थ्यांच्या यादीत आहे की नाही. जर ते असेल तर मग पैसे का आले नाहीत ते त्यांना विचारा. आपणास उत्तर न मिळाल्यास योजनेच्या हेल्पलाईनशी संपर्क साधा. देशातील सर्व 14.5 कोटी शेतकर्यांना सरकार पैसे देऊ इच्छित आहे. जर शासनाचा हा हेतू पूर्ण करण्यात एखादा अधिकारी अडथळा ठरत असेल तर त्याला पूरक करा.
आपण या योजनेच्या शेतकरी कल्याण विभागात संपर्क साधू शकता. दिल्लीमधील त्याचा फोन नंबर 011-23382401 आहे, तर ईमेल आयडी (pmkisan-hqrs@gov.in) आहे
शुक्रवार, ३ जानेवारी, २०२०
कोरठाणच्या राज्याच्या लग्नासाठी देवाचे मांडव डहाळे संपन्न
पिंपळगावरोठा येथे कोरठण खंडोबाचे जागृत देवस्थान आहे.राज्यभरातील लाखो भाविकांचे कुलदैवत आहे.यात्रा सुरू झाल्यानंतर ३ दिवस भाविकांची देवदर्शनाला गर्दी होते. दिवसभर तळीभंडार, देवदर्शन सुरू असताना सुमारे पाच ते सहा लाख भाविकांनी 'कोरठण खंडोबाच्या नावानं चांगभलं'या जयघोषाने खंडोबानगरी दुमदुमून जाते.यात्रेत पालखी सोहळा, छबिना मिरवणूक, खंडोबा चांदीची पालखी मिरवणुकीनंतर काठ्यांची मिरवणूक होते. मानाच्या काठ्या देवाच्या कळसाला टेकवल्यावर यात्रेची सांगता होते.
खंडोबा हे अनेक लोकांचे कुलदैवत आहे खंडोबाला मणि-मल्लाचा वध केला म्हणून मल्लारी (मल्हारी),मैलार तसेच (म्हाळसाचादेवीचा पती म्हणून) म्हाळसाकांत, मार्तंडभैरव किंवा (स्कंद पर्वतावरील खंडा घेऊन दैत्याचा वध करणारा म्हणून) खंडोबा म्हणतात. स्कंद पर्वतावरील श्रीशंकर आपल्या खड्गासह मल्लासुराचा वध करण्यास आला,त्यावेळी खड्गाला खंडा असे नांव पडले. हा श्रीशंकरांचा अवतार खंडामंडित झाला म्हणून त्याला खंडोबा असे म्हणू लागले.
खंडोबाला बेल-भंडार वाहणे हीच त्याची प्रमुख भक्ती होय. हळदपूड, सुक्या खोबर्याच्या वाट्या एकत्र करून तो प्रसाद व 'येळकोट येळकोट जय मल्हार'हा गजर करतात. याचा अर्थ असा लावतात की, 'हे खंडेराया, सर्वत्र भरपूर अन्न-धान्य पिकू दे. ज्यायोगे सर्वत्र सुकाळ होईल आणि आम्हाला भरपूर दान-धर्म करता येईल. खंडोबाच्या हातांतील वस्तु: खंडोबाच्या चार हातांत खड्ग, त्रिशूळ, डमरु व रुधिर मुंडासह पानपात्र असते. जवळ कुत्रा असतो. मानाप्रमाणे प्रथम मान नंदीला, नंतर घोड्याला व नंतर कुत्र्याला असा असतो. महाराष्ट्रांत व कर्नाटकांत खंडोबाची बरीच देवस्थाने आहेत. यापैकी कोरठण हे एक आहे.
खंडोबा पिवळा झाला, हजारो महिलांनी कोरठणला लावली हळद
सालाबादप्रमाणे परंपरेने युवतीपासून वृद्ध महिलानी मोठ्या संख्येने वाजत गाजत येऊन पारनेर तालुक्यातील पिंपळगावरोठा येथील श्री कोरठण खंडोबाच्या पौष नवरात्राला प्रारंभ निमित्त देवाला हळद लावली. पौष पौर्णिमेला खंडोबाचे म्हाळसाबरोबर लग्न झाले. त्यानिमित्त आज हा कार्यक्रम संपन्न झाला.
पिंपळगावरोठा गावातील मारुती मंदिरासमोरून ढोल, लेझीम, वाद्यवृंदाच्या तालावर वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.
पिंपळगावरोठा येथे कोरठण खंडोबाचे जागृत देवस्थान आहे.महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या, स्वयंभू श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान तिथेक्षेत्रावर वार्षिक यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने भरणार आहे. 3 दिवसांच्या यात्रेला 6 लाखांवर यात्रेकरु, कुलदैवत खंडोबाच्या कोरठण गडावर येऊन देवदर्शन करतील, धार्मिक व सामाजिक संस्कृती जोपसणारी लाखो भाविकांच्या, भक्तिमय मांदियाळीचे दर्शन घडविणारी यात्रा म्हणुन या यात्रेचे महत्त्व आहे. पोष पौर्णिमेला श्री खंडोबाचे म्हाळसादेवी बरोबर लग्न झाले. म्हणून दरवर्षी पौष पौर्णिमेला 3 दिवस मोठा यात्रोत्सव येथे भरतो. पौष षष्टीला शेकडो महिला देवाला हळद लावतात व यात्रेचे नवरात्र सुरू होते. कार्यक्रमास देवस्थानचे अध्यक्ष अॅड.पांडुरंग गायकवाड, मनिषा जगदाळे, किसन धुमाळ गुंजाळ, अमर गुंजाळ, किसन मुंढे, बन्सी ढोमे, रामदास मुळे, शांताराम खोसे, गोपीनाथ घुले, जालिंदर खोसे, उत्तम सुबरे, भगवान भामरे, तानाजी मुळे व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते
जिल्ह्यासाठी भरघोस निधी मिळवून देणार : आ.शंभूराज देसाई
मंत्रीमंडळाच्या विस्तारानंतर पहिल्याच मंत्रीमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांना आपआपल्या विभागात कर्जमाफी योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकर्यांना व्हावा, यासाठी प्रयत्न करण्याची सूचना केली आहे.
गुरुवार, २ जानेवारी, २०२०
शंभूराज देसाईंनी आणि पृथ्वीराज चव्हाण कराडमध्ये भेट
शंभूराज देसाईंनी भरविला पृथ्वीराज चव्हाणांना कंदीपेढा
कराड प्रतिनिधी K P ऑनलाइन
आमदार शंभूराज देसाई यांनी राज्यमंत्री झाल्यानंतर आज पहिल्यांदाच कराडला भेट दिली. यावेळी मंत्री देसाई यांनी पृथ्वीराज चव्हाण यांची त्यांच्या पाटण कॉलनीतील निवासस्थानी भेट दिली. दोघा नेत्यांनी एकमेकांची गळाभेट घेतली तसेच देसाई यांनी चव्हाण यांना सातारी कंदीपेढा भरवून आनंद व्यक्त केला.
कै. बाळासाहेब देसाई यांच्याप्रमाणेच त्यांचे नातू शंभूराज देसाई हेही मंत्रीपदाच्या कार्यकाळात आपला वेगळा ठसा उमटवतील, असा विश्वास पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.
शंभूराज देसाई हे गेली दोन दिवस साताऱ्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी काल पाटण मतदारसंघातील जनतेच्या शुभेच्छा स्वीकारल्या.
येथे शंभूराज देसाई यांचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वागत केले. यावेळी चव्हाण यांच्या पत्नी सत्वशीला चव्हाण यांनी मंत्री देसाईंचे औक्षण केले.
यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, शंभूराज यांना त्यांचे आजोबा बाळासाहेब देसाई यांच्यानंतर जवळपास तीन दशकानंतर मंत्रीपद मिळाले आहे. माझे मुळगाव कुंभारगाव हे पाटण तालुक्यातीलच आहे. तसेच कै. बाळासाहेब देसाई हे माझ्या वडिलांसोबत संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईत सहभागी होते. राज्यातील राजकारणातही कै. बाळासाहेब देसाई यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला होता.
त्यांनी राज्य सरकारमध्ये शिक्षण, कृषी, गृह आदी प्रमुख खाती सक्षमपणे सांभाळली होती. कै. बाळासाहेब देसाई यांनी त्यांच्या मंत्रीपदाच्या कारकिर्दीत जी कामे केली त्याची नोंद आजही घ्यावी लागते. त्यांच्यासारखे सक्षमपणे त्यांचे नातू शंभूराज देसाई हे आपल्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात वेगळा ठसा उमटवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी जयवंतराव उर्फ बंडानाना जगताप, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, जिल्हा कॉंग्रेस अल्पसंख्याक अध्यक्ष झाकीर पठाण, कऱ्हाड शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष नगरसेवक राजेंद्र माने, प्रदीप जाधव, नगरसेवक इंद्रजित गुजर, सुनील बरिदे, दिलीप देशमुख, लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष डॉ. दिलीपराव चव्हाण, सतीश पाटील आदी उपस्थित होते
बुधवार, १ जानेवारी, २०२०
विद्याविहार : महिलेचे धड सापडल्यानंतर आता कुर्ला येथे पाय सापडले...
मुंबई - घाटकोपरमध्ये महिलेचे धड सापडल्यानंतर, मंगळवारी कुर्ला परिसरात महिलेचे दोन पाय सापडले आहेत. तिच्या शिराचा शोध पोलीस घेत आहेत. या प्रकरणी घाटकोपर पोलीस अधिक तपास करत आहेत.
विद्याविहार एसटी डेपोजवळील किरोळ रोडच्या पदपथावर सोमवारी एका चादरीत ३० ते ३५ वयोगटांतील महिलेचा धड आढळून आल्याने खळबळ उडाली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी धड ताब्यात घेत अधिक तपास सुरू केला. या महिलेचे दोन्ही पाय आणि शिर शरीरापासून वेगळे करण्यात आले होते. मयत महिलेची ओळख पटू नये, यासाठी हत्या करणाऱ्याने महिलेचे शिर अन्य ठिकाणी टाकले.
मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने, दोन ते तीन दिवसांपूर्वी या महिलेची हत्या झाली असावी. पोलीस याचा अधिक तपास करत आहेत.
*लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण व खाऊ वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न*
कुंभारगाव, दि. २२ जुलै : *महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार व परिपत्रकानुसार महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्र...
-
कुंभारगाव साप्ताहिक कुमजाई पर्व न्यूज प्रतिनिधी. दि. 14 जुलै 2026 चिखलेवाडी ग्रामपंचायत हद्दीत मोरेवाडी येथे सोमवारी रात्रीच्य...
-
धक्कादायक घटना! मलकापुरात मित्राकडूनच मित्राचा खून — दारूच्या नशेत उफाळला जुन्या वादाचा राग मलकापूर (कुमजाई पर्व प्रतिनिधी) ...
-
*कुंभारगाव–गलमेवाडीत रात्रीचा थरार: घराजवळील शेडमध्ये बिबट्याचा हल्ला, दोन शेळ्यांचा फडशा.* भरवस्तीत शिरून शेळ्यांवर हल्ला; द...