शुक्रवार, ३ जानेवारी, २०२०

कोरठाणच्या राज्याच्या लग्नासाठी देवाचे मांडव डहाळे संपन्न

पारनेर प्रतिनिधी : - 

पारनेर तालुक्यातील पिंपळगावरोठा येथील श्री कोरठण खंडोबा मंदिराच्या वार्षिक यात्राउत्सव दि 10 ते 12 जानेवारी दरम्यान होत असून या कोरठणचा राजा खंडोबाच्या लग्न सभारंभासाठी तयारी पूर्ण होत आली आहे. सध्या देवाला मुंडावळया बांधण्यात आल्या आहेत तर विविध नियोजनाचे काम चालू आहे. देवाचे नवरात्र सुरु झाले असून लग्नानिमित्त हळद लावून झाल्यावर गावातील लग्न परंपरेने मांडव डहाळे वाजत गाजत आणण्यात आले.

महिलांनी देवाच्या मूर्तीला मुंडावळ्या बांधल्या व यात्रेच्या तयारीला वेग आला.

पिंपळगावरोठा येथे कोरठण खंडोबाचे जागृत देवस्थान आहे.राज्यभरातील लाखो भाविकांचे कुलदैवत आहे.यात्रा सुरू झाल्यानंतर ३ दिवस भाविकांची देवदर्शनाला गर्दी होते. दिवसभर तळीभंडार, देवदर्शन सुरू असताना सुमारे पाच ते सहा लाख भाविकांनी 'कोरठण खंडोबाच्या नावानं चांगभलं'या जयघोषाने खंडोबानगरी दुमदुमून जाते.यात्रेत पालखी सोहळा, छबिना मिरवणूक, खंडोबा चांदीची पालखी मिरवणुकीनंतर काठ्यांची मिरवणूक होते. मानाच्या काठ्या देवाच्या कळसाला टेकवल्यावर यात्रेची सांगता होते.

खंडोबा हे अनेक लोकांचे कुलदैवत आहे खंडोबाला मणि-मल्लाचा वध केला म्हणून मल्लारी (मल्हारी),मैलार तसेच (म्हाळसाचादेवीचा पती म्हणून) म्हाळसाकांत, मार्तंडभैरव किंवा (स्कंद पर्वतावरील खंडा घेऊन दैत्याचा वध करणारा म्हणून) खंडोबा म्हणतात. स्कंद पर्वतावरील श्रीशंकर आपल्या खड्गासह मल्लासुराचा वध करण्यास आला,त्यावेळी खड्गाला खंडा असे नांव पडले. हा श्रीशंकरांचा अवतार खंडामंडित झाला म्हणून त्याला खंडोबा असे म्हणू लागले.

खंडोबाला बेल-भंडार वाहणे हीच त्याची प्रमुख भक्ती होय. हळदपूड, सुक्या खोबर्‍याच्या वाट्या एकत्र करून तो प्रसाद व 'येळकोट येळकोट जय मल्हार'हा गजर करतात. याचा अर्थ असा लावतात की, 'हे खंडेराया, सर्वत्र भरपूर अन्न-धान्य पिकू दे. ज्यायोगे सर्वत्र सुकाळ होईल आणि आम्हाला भरपूर दान-धर्म करता येईल. खंडोबाच्या हातांतील वस्तु: खंडोबाच्या चार हातांत खड्ग, त्रिशूळ, डमरु व रुधिर मुंडासह पानपात्र असते. जवळ कुत्रा असतो. मानाप्रमाणे प्रथम मान नंदीला, नंतर घोड्याला व नंतर कुत्र्याला असा असतो. महाराष्ट्रांत व कर्नाटकांत खंडोबाची बरीच देवस्थाने आहेत. यापैकी कोरठण हे एक आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...