सालाबादप्रमाणे परंपरेने युवतीपासून वृद्ध महिलानी मोठ्या संख्येने वाजत गाजत येऊन पारनेर तालुक्यातील पिंपळगावरोठा येथील श्री कोरठण खंडोबाच्या पौष नवरात्राला प्रारंभ निमित्त देवाला हळद लावली. पौष पौर्णिमेला खंडोबाचे म्हाळसाबरोबर लग्न झाले. त्यानिमित्त आज हा कार्यक्रम संपन्न झाला.
पिंपळगावरोठा गावातील मारुती मंदिरासमोरून ढोल, लेझीम, वाद्यवृंदाच्या तालावर वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.
पिंपळगावरोठा येथे कोरठण खंडोबाचे जागृत देवस्थान आहे.महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या, स्वयंभू श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान तिथेक्षेत्रावर वार्षिक यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने भरणार आहे. 3 दिवसांच्या यात्रेला 6 लाखांवर यात्रेकरु, कुलदैवत खंडोबाच्या कोरठण गडावर येऊन देवदर्शन करतील, धार्मिक व सामाजिक संस्कृती जोपसणारी लाखो भाविकांच्या, भक्तिमय मांदियाळीचे दर्शन घडविणारी यात्रा म्हणुन या यात्रेचे महत्त्व आहे. पोष पौर्णिमेला श्री खंडोबाचे म्हाळसादेवी बरोबर लग्न झाले. म्हणून दरवर्षी पौष पौर्णिमेला 3 दिवस मोठा यात्रोत्सव येथे भरतो. पौष षष्टीला शेकडो महिला देवाला हळद लावतात व यात्रेचे नवरात्र सुरू होते. कार्यक्रमास देवस्थानचे अध्यक्ष अॅड.पांडुरंग गायकवाड, मनिषा जगदाळे, किसन धुमाळ गुंजाळ, अमर गुंजाळ, किसन मुंढे, बन्सी ढोमे, रामदास मुळे, शांताराम खोसे, गोपीनाथ घुले, जालिंदर खोसे, उत्तम सुबरे, भगवान भामरे, तानाजी मुळे व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा