शुक्रवार, ३ जानेवारी, २०२०

जिल्ह्यासाठी भरघोस निधी मिळवून देणार : आ.शंभूराज देसाई

कराड कुमजाई पर्व प्रतिनिधी : 
सातारा जिल्ह्यातील कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी जास्तीत जास्त निधी मिळवणे, हे आपल्यासमोरील आव्हान असणार असल्याचे सांगत नामदार शंभूराज देसाई यांनी जिल्ह्याच्या विकासाला आपले नेहमीच प्राधान्य राहणार आहे.
सुदैवाने जिल्ह्याला दोन मंत्रीपदे मिळाली आहेत. कर्जमाफी योजनेमुळे डोंगरी व दुर्गम विभागातील गावांना मुलभूत सोयी - सुविधा मिळाव्यात यासाठी जास्तीचा निधी आवश्यक आहे. त्यासाठी नामदार बाळासाहेब पाटील यांच्यासोबत आपण जिल्हा नियोजन मंडळास जास्तीत जास्त निधी वाढवून मिळावा, यासाठी प्रयत्न करणार आहे. जिल्हा नियोजन मंडळाला वाढीव निधी मिळाल्यास त्यांचा जिल्ह्याला फायदाच होणार आहे

मंत्रीमंडळाच्या विस्तारानंतर पहिल्याच मंत्रीमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांना आपआपल्या विभागात कर्जमाफी योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकर्‍यांना व्हावा, यासाठी प्रयत्न करण्याची सूचना केली आहे.
कराडमधील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार बोलताना आ. शंभूराज देसाई म्हणाले, येत्या एक ते दोन दिवसांत खाते वाटप होणार असून, आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आपण द्याल, ती जबाबदारी स्वीकारू. तसेचआपणास अपेक्षित असलेली कामगिरी करत राज्यातील जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...