संपादक - प्रदीप विष्णु माने 8108253323 ताज्या बातम्या सामाजिक,राजकारण, मनोरंजन,क्रीडा आणि इतर
सोमवार, १५ डिसेंबर, २०२५
राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान, 16 जानेवारीला मतमोजणी – राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची घोषणा.
सोमवार, ८ डिसेंबर, २०२५
"मानखुर्द महाराष्ट्र नगर - शिवसेना संघटना मजबूत – मानखुर्दात कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश"
रविवार, ७ डिसेंबर, २०२५
शुक्रवार, ५ डिसेंबर, २०२५
*कुंभारगाव जि. प. शाळा नं. २ ला प्रोजेक्टर व संगणक भेट; शैक्षणिक सुविधांना नवे बळ*
कुंभारगाव जि. प. शाळा नं. २ ला प्रोजेक्टर व संगणक भेट; शैक्षणिक सुविधांना नवे बळ
कुमजाई पर्व न्यूज नेटवर्क कुंभारगाव (ता. पाटण, जि. सातारा) :
या कार्यक्रमामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची नवी दिशा मिळणार असून अध्ययन-अध्यापन प्रक्रिया अधिक प्रभावी, आकर्षक व समकालीन होणार आहे. विद्यार्थ्यांना दृकश्राव्य माध्यमातून विषय समजणे सोपे व्हावे, माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करून स्पर्धात्मक युगात त्यांना सक्षम करता यावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. मीना चाळके उपस्थित होत्या. यावेळी उपसरपंच सौ. अलका चाळके, ग्रामपंचायत सदस्य श्री. अशोक चाळके व सौ. वनिता चाळके, पोलीस पाटील सौ. वंदना चाळके, शाळेतील सर्व शिक्षक, पालक तसेच माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी मुख्याध्यापिका श्रीमती दौलतबी मुल्ला म्हणाल्या, “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाची संधी मिळावी, यासाठीच हे छोटेसे योगदान देताना समाधान वाटते. विद्यार्थी हेच देशाचे भविष्य आहेत.” तर सरपंच श्री. अशोक चाळके यांनी, “डिजिटल शिक्षण हे काळाची गरज आहे. गावातील प्रत्येक विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची सुविधा मिळावी, यासाठी ग्रामपंचायत सदैव तत्पर राहील,” असे सांगितले.
शाळेच्या मुख्याध्यापकांनी व शिक्षकवृंदांनी या योगदानाबद्दल सर्व दात्यांचे आभार मानले. पालकांनीही या उपक्रमाचे मनःपूर्वक स्वागत करून ग्रामीण शिक्षणाच्या दृष्टीने हा एक प्रेरणादायी आदर्श असल्याचे मत व्यक्त केले.
सर्वांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. नव्या संगणक व प्रोजेक्टरमुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होऊन शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत निश्चितच वाढ होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
*पाटण पंचायत समितीवर भाजपचाच झेंडा फडकणार – भरत पाटील.* *मंद्रुळकोळे जिल्हा परिषद गटातील भाजप कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा उत्साहात संपन्न..*
गुरुवार, ४ डिसेंबर, २०२५
कामोठे परिसरातील हायप्रोफाईल ‘प्रतीक जेम्स’ सोसायटीत घडलेल्या तब्बल २८ लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीचा धक्कादायक खुलासा.
बुधवार, ३ डिसेंबर, २०२५
मानखुर्द - महिलांच्या आरोग्यासाठी शिवसेनेचा मायेचा हात – प्रभाग क्रमांक १४३ मध्ये मोफत महिला आरोग्य शिबिर यशस्वी.
*लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण व खाऊ वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न*
कुंभारगाव, दि. २२ जुलै : *महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार व परिपत्रकानुसार महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्र...
-
कुंभारगाव साप्ताहिक कुमजाई पर्व न्यूज प्रतिनिधी. दि. 14 जुलै 2026 चिखलेवाडी ग्रामपंचायत हद्दीत मोरेवाडी येथे सोमवारी रात्रीच्य...
-
धक्कादायक घटना! मलकापुरात मित्राकडूनच मित्राचा खून — दारूच्या नशेत उफाळला जुन्या वादाचा राग मलकापूर (कुमजाई पर्व प्रतिनिधी) ...
-
*कुंभारगाव–गलमेवाडीत रात्रीचा थरार: घराजवळील शेडमध्ये बिबट्याचा हल्ला, दोन शेळ्यांचा फडशा.* भरवस्तीत शिरून शेळ्यांवर हल्ला; द...





