रविवार, ७ डिसेंबर, २०२५

अक्षय चव्हाण यांच्या प्रयत्नाला यश पालकांना ऑरीजनल शैक्षणिक कागदपत्रे सुपुर्द.
सणबूर : रयत विद्यार्थी विचार मंच पश्चिम महाराष्ट्र प्रभारी अध्यक्ष अक्षय चव्हाण यांच्याकडे विद्यार्थीनीची तक्रार चैताली लॅबोरेटरीचे संचालक सामाजिक कार्यकर्ते धर्मेंद्र मगरे यांच्या नेतृत्वाखाली ०४-११-२०२५ रोजी प्राप्त झाली होती. मोहीनी दिलीप घाडगे राहणार चिखलेवाडी, ता. पाटण जि. सातारा ही विद्यार्थीनी सावकार होमीओपॅथी मेडीकल कॉलेज सातारा येथे शिक्षण घेत होती. शिक्षण घेत असताना काही कारणाने अर्ध्यावर शिक्षण सोडाव लागलं. ती विद्यार्थीनी वारंवार कॉलेजला अर्ज करत होती, तेथे बघु, देऊया, अर्ज करा, अशी त्या विद्यार्थीनीची वडातान करत होती. ह्या विद्यार्थीनीची दखल घेत रयत विद्यार्थी विचार मंच पश्चिम महाराष्ट्र प्रभारी अध्यक्ष यांनी हा प्रश्न मार्गी लावला आहे आणि तीन दिवसात पालकांना विद्यार्थीनीचे सर्व ऑरीजनल कागदपत्रे सुपुर्द केले आहे. पालकांनमध्ये व विद्यार्थीनीमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे व पालकांनी अक्षय चव्हाण यांना भेटुन आभार मानले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

*कळगावमध्ये बिबट्याचा कहर! घराशेजारील गोठ्यात घुसून 3 गाभण शेळ्या केल्या ठार, मुंबईहून गावी आलेल्या शेतकऱ्याचे स्वप्न उद्ध्वस्त*

पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगाव) येथे काल (दि. २२) रात्रीच्या सुमारास बिबट्याने थेट घराशेजारील गोठ्यात घुसून शेळ्यांवर भीषण हल्ला केल्याची...