रविवार, ६ जून, २०२१

कुंभारगाव : "शिवस्वराज्यदिनाचा" कार्यक्रम उत्साहात साजरा !!

कुंभारगाव : "शिवस्वराज्यदिनाचा" कार्यक्रम उत्साहात साजरा !!
फोटो : अनिल देसाई (कुंभारगाव)

कुंभारगाव ता.पाटण : कुंभारगाव येथील ग्रामपंचायत प्रांगणात शिवस्वराज्यदिनानिमित्त गावच्या सरपंच सौ.सारिकाताई पाटणकर यांच्या हस्ते शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारुन अभिवादन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांचा ६ जून १६७४ या दिवशी रायगडावर राज्याभिषेक झाला होता. या महापुरुषाच्या लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्त्वाचा दिवस म्हणजेच शिवस्वराज्यभिषेक दिन होय. हा दिवस स्वराज्याची, सार्वभौमत्वाची, स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा दिवस आहे. अशा या भूमिपुत्राच्या स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व आणखी दृढ होण्यासाठी ६ जून हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये “शिवस्वराज्य दिन” म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.भगव्या ध्वजावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप, सुवर्णहोन, जगदंब तलवार, शिवमुद्रा आणि वाघनखं यांचा समावेश आहे.कुंभारगाव ग्रामपंचायत प्रांगणात झालेल्या कार्यक्रमास कुंभारगावच्या सरपंच सौ.सारिकाताई पाटणकर,उपसरपंच श्री.राजेंद्र चव्हाण, ग्रामसेवक श्री.अनिल जाधव,प.स पाटण मा.सदस्य श्री.शंकरराव चव्हाण, श्री.संजय गुरव,श्री.हणमंत कांबळे,पोलीस पाटील श्री.अमित शिंदें,श्री.प्रविण मोरे,श्री.संदीप गुरव,सुपेकर मास्तर,ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी वर्ग आदि उपस्थित होते.

*सातारा जिल्हादंडाधिकारी यांनी केले आदेश जारी; पॉझिटिव्ह दर कमी झाल्यामुळे थोडे निर्बंध केले सैल*

*सातारा जिल्हादंडाधिकारी यांनी केले आदेश जारी; पॉझिटिव्ह दर कमी झाल्यामुळे थोडे निर्बंध केले सैल*

सातारा दि.6:  सातारा जिल्हयातील कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव विचारात घेऊन कोरोना विषाणूंची साखळी तोडण्यासाठी निर्बंधांचे स्तराबाबत आदेश पारित केला असून, कोविड-19 प्रतिबंधात्मक उपायोजनेंतर्गत साथरोग कायदा 1897, कलम 2 नूसार दिलेल्या अधिकाराच्या अंतर्गत, त्याचप्रमाणे आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 याच्या तरतुदी नूसार त्या-त्या जिल्ह्यतील कोविड बाधीत रुग्णांचा पॉझीटीव्हीटी रेट व ऑक्सिजन बेडस व्यापलेची टक्केवारी नुसार एकूण पाच स्तर निश्चित केलेले असुन, त्या-त्या स्तरानुसार संबंधीत जिल्ह्यामध्ये निर्बंध शिथिल करणेत आलेले आहेत.
 सातारा जिल्ह्यामध्ये कोविड बाधीत रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट व ऑक्सिजन बेडस व्यापलेची निकषानुसार शासनाने घोषित केलेल्या स्तरानुसार, सातारा जिल्हा चौथ्या स्तरामध्ये समाविष्ट होत आहे.कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, सातारा जिल्हयातील वाढत्या रुग्णांची संख्या पहाता, जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची साखळी तुटण्यासाठीसाठी सद्यस्थितीत लागू असलेल्या निर्बंधानुसार जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 व आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 मधील तरतूदीनुसार प्राप्त अधिकारान्वये दि. 7 जून रोजीचे 00.00 वा पासून ते पुढील आदेश होईपर्यंत खालीलप्रमाणे आदेश जारी केले आहेत.
*आर्थिक /सामाजिक क्रिया कलाप यावर खालील प्रमाणे निर्बध लागू करणेत येत आहेत*
    सर्वसाधारण मार्गदर्शक तत्वानुसार सातारा जिल्ह्यामध्ये सोमवार ते शुक्रवारी या कालावधीत सायं. 5.00 ते सकाळी 5.00 वाजेपर्यंत तसेच आठवडयाचे शेवटी म्हणजेच शनिवार व रविवार पूर्ण कालावधीसाठी संचारबंदी लागू करणेत आलेली आहे. त्यामुळे वैध कारणाशिवाय कोणत्याही नागरीकास संचार करण्यास मनाई करण्यात येत आहे. अत्यावश्यक बाबींची दुकाने/आस्थापना या सकाळी 9.00 ते दुपारी 02.00 वा. पर्यत चालू ठेवण्यास परवानगी असेल. मात्र मेडिकल/औषधांची दुकाने सकाळी 9.00 ते सायं 8.00 वाजेपर्यंत चालू राहतील. तथापि, हॉस्पीटल मधील मेडिकल/औषधांची दुकाने पुर्णवेळ चालू ठेवणेस परवानगी असेल. अत्यावश्यक नसलेली दुकान/आस्थापना या पुर्णपणे बंद राहतील. मॉल / सिनेमागृहे (एक किंवा अनेक पडदी)/ नाटयगृहे इ. पुर्णपणे बंद राहतील. हॉटेल, रेस्टॉरंटस्‍ ही केवळ पार्सल घरपोचसाठी सकाळी 9 ते रात्री 8 वा. पर्यंत चालू ठेवण्यास परवानगी असेल.  या ठिकाणी बसण्यासाठी परवानगी नाही. लॉजिंग सुविधा पुर्णपणे बंद राहील. बार, परमिटरुम व वाईन शॉप इत्यादीबाबत स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येत आहेत. सार्वजनिक जागा/खुली मैदाने/ चालणे/सायकल चालविणे यासाठी सोमवार ते शुक्रवार या कालावधीमध्ये सकाळी 05.00 ते सकाळी 9.00 या वेळेत परवानगी असेल. आठवडयाचे शेवटी म्हणजेच शनिवार व रविवार यास मनाई आहे. ज्या खाजगी कार्यालयांना मुभा देण्या आलेली आहे अशी कार्यालये वगळता इतर सर्व खाजगी कार्यालये बंद राहतील.  शासकीय कार्यालये व ज्या खाजगी कार्यालयांना परवानगी देण्यात आलेली आहे अशा कार्यालयांना 25 टक्के क्षमतेने चालू ठेवण्यास परवानगी देण्यात येत आहे. खुल्या जागेतील क्रिडा विषयक बाबी या सोमवार ते शुक्रवार या कालावधीमध्ये सकाळी 05.00 ते सकाळी 9.00 या वेळेत चालू ठेवणेस परवानगी असेल. आठवडयाचे शेवटी म्हणजेच शनिवार व रविवार यास मनाई आहे. मात्र कोणत्याही क्रिडासंबंधी स्पर्धा आयोजित करण्यास मनाई असेल. चित्रीकरण - आयसोलेशन बबलमध्येच चित्रीकरण व वास्तव्य करणे बंधनकारक राहील. कोणतेही गर्दीचे व गर्दी होईल, असे चित्रीकरण करता येणार नाही.  तसेच आयसोलेशेन बबलच्या बाहेर कोणालाही संचार / प्रवास करता येणार नाही. सामाजिक सांस्कृतिक, धार्मिक/प्रार्थना स्थळे, करमणुक कार्यक्रम, मेळावे इत्यादी पुर्णपणे बंद राहतील. तथापि सर्व धार्मिक आणि प्रार्थना स्थळामध्ये धार्मिक सेवा करणारे सेवेकरी यांना त्यांच्या पारंपारीक / धार्मिक सेवा करता येतील. यावेळी कोणत्याही बाहेरील भक्तांस प्रवेश असणार नाही.  
सातारा जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्रामध्ये कोणतेही कार्यक्रम आयोजीत करणेस मनाई आहे. तथापि, प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर क्षेत्रात खुले लॉन, विना वातानुकूलित मंगल कार्यालय/हॉल/सभागृह, घर व घराच्या परिसरात, एक हॉल/कार्यालयामध्ये एकच लग्न समारंभ दोन तासापेक्षा जास्त नसेल इतक्या कालावधीत 25 लोकांच्या (संपुर्ण कार्यक्रमासाठी भटजी, वाजंत्री, स्वयंपाकी/वाढपी इ. सह) मर्यादेत लग्न आयोजन करणेकामी संबंधित तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांची परवानगी घेणे बंधनकारक राहील. तसेच जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सातारा यांचेकडील आदेशामधील अटी व शर्तींचे पालन करणे संबंधितांवर बंधनकारक राहील. याबाबत उल्लंघन झाल्यास संबंधित व्यवस्थापन यांच्याकडून प्रथम वेळी रक्कम रुपये 25000/- दंड तसेच दुसऱ्या वेळी भंग झाल्यास रक्कम रुपये 1,00,000/- व फौजदारी कारवाई करावी. तसेच  कोविड -19 च्या अनुषंगाने निर्गमीत अटी व शर्तीचे पालन न करणाऱ्या किंवा या निर्बंधाचा भंग करणाऱ्या कुटूंबास रक्कम रु 25,000/- इतका दंड आकारला जाईल. शासनाचे दि. 15 मार्च 2021 व 17 मार्च 2021 चे आदेशातील तरतुदीनुसार, जोपर्यत केंद्र शासनाचे आपत्ती व्यवस्थापनाकडून कोविड- 19 साथीचा रोग आटोक्यात आलेचे जाहिर होत नाही तोपर्यत संबंधित मालमत्ता बंद राहील. जास्तीत जास्त 20 नातेवाईक/ नागरिकांच्या उपस्थितीत अंत्यविधी व दशक्रिया विधी करण्यया परवानगी असेल. बैठका/निवडणुक - स्थानिक संस्थांच्या / सहकारी संस्थाच्या सर्वसाधारण सभा या ज्या ठिकाणी सभा होणार अशा ठिकाणच्या मर्यादेच्या 50 टक्के क्षमतेने घेण्यास परवानगी असेल. ज्या मजुरांची राहण्याची व्यवस्था बांधकामाच्या ठिकाणी असेल, अशा बांधकामांना परवानगी देण्यात येत आहे.   शेतकरी यांना आवश्यक असणारी बियाणे, खते, शेती विषयक उपकरणे व  त्यांची दुरुस्ती व देखभाल पुरविणाऱ्या सेवांची दुकाने दुपारी 02.00 वा पर्यत चालु ठेवणेस परवानगी असेल. तसेच शेती विषयक (मशागत) करण्याची सेवा करणेस सायंकाळी 04.00 वा पर्यत परवानगी असेल.   ई-कॉमर्सच्या वस्तू तसेच सेवा या फक्त्‍ अत्यावश्यक बाबीसाठीच चालू ठेवण्यास परवानगी असेल. सातारा जिल्हयात संचार बंदी लागू करणेत येत आहे.  केश कर्तनालय व सौदर्य केंद्रे येथे फक्त लस घेतलेल्या ग्राहकांसाठीच, अगोदर भेटीची वेळ (prior Appointment) ठरवून तसेच विना-वातानूकुलीत (Non AC) जागेसाठी दुपारी 2.00 वा. पर्यत चालु ठेवण्यास परवानगी राहील. व्यायामशाळा, स्पा, वेलनेस सेंटर बंद राहतील. सार्वजनिक परिवहन बसेस सेवा या 50 टक्के क्षमतेने चालु ठेवणेस परवानगी राहील. कोणत्याही प्रवाशास उभे राहून प्रवास करण्याची परवानगी नसेल.  मालवाहतूक वाहनामधून वाहन चालक/ मदतनीस/ क्लिनर किंवा इतर असे एकुण जास्तीत जास्त 3 व्यक्तीस प्रवासास परवानगी असेल.  खाजगी वाहने/ टॅक्सी/ बसेस/  लांब पल्ल्याच्या रेल्वे द्वारे प्रवाशांचा आंतर जिल्हा प्रवास नियमीत सुरु राहील – परंतु सदर वाहनामधून स्तर पाच मध्ये समाविष्ठ असलेल्या जिल्ह्यामधून येणाऱ्या प्रवाशास ई पास बंधनकारक असेल. उत्पादन क्षेत्र - निर्यातभिमुख यंत्रणा की ज्यामध्ये सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग  ज्यांना निर्यात बंधन पूर्ण करण्याची आवश्यकता आहे अशा यंत्रणा 50% कर्मचाऱ्यांचे मर्यादेत चालू ठेवण्यास परवानगी असेल. तसेच सदर कर्मचारी यांची हालचाल  TRANSPORT BUBBLE मध्ये असावी.  उत्पादन- 1. जीवनावश्यक वस्तू उत्पादन घटक (कोणत्याही वस्तूसाठी कच्चा माल / पॅकेजिंग तयार करणार आवश्यक वस्तू आणि घटक, वस्तू आणि संपूर्ण पुरवठा साखळी), 2. सतत प्रक्रिया उदयोग की जे तातडीने थांबवता येत नाहीत आणि आवश्यक वेळ दिल्याशिवाय पुन्हा सुरु होवू शकत नाहीत. 3. राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण यांचे अनुषंगाने महत्वाच्या घटकाची निर्मिती करणारे उदयोग, 4. डाटा सेंटर / क्लाऊड सर्व्हिस प्रोव्हायडर / आयटी क्षेत्रातील गंभीर पायाभूत सुविधांना सहाय्य करणारे प्रदाता - अशा यंत्रणा 50% कर्मचाऱ्यांचे मर्यादेत चालू ठेवणेस परवानगी असेल.सदर कर्मचारी यांची हालचाल TRANSPORT BUBBLEमध्ये असावी. *उत्पादन* -  उत्पादन क्षेत्रातील इतर उत्पादन  घटक जे आवश्यक, ‍निरंतर प्रक्रिया किंवा निर्यात देणाऱ्या घटकाअंतर्गत येत नाहीत अशा यंत्रणा 50% कर्मचाऱ्यांचे मर्यादेत चालू ठेवणेस परवानगी असेल. सदर कर्मचारी यांची हालचाल ISOLATION BUBBLE मध्ये असणे बंधनकारक राहील.  शिवभोजन थाळी योजना चालू ठेवण्यास परवानगी असेल.
* सर्वसाधारण मार्गदर्शक सुचना* ज्या आस्थापनांना दुपारी 02.00 वाजेपर्यंत चालू ठेवणेस परवानगी देणेत आली आहे त्या आस्थापनावरील कर्मचारी यांना त्यांचे घरी पोहोच होणेसाठी सायं 04.00 वाजेपर्यंत प्रवास करण्यास परवानगी असेल.  स्तर पाच मध्ये समाविष्ठ असलेल्या जिल्ह्यामधून येणाऱ्या प्रवाशांना वैयक्तीक स्वतंत्र पास असणे आवश्यक आहे. प्रवाशांच्या वाहनांना स्वतंत्र पासची आवश्यकता असणार नाही. कोविड-19 व्यवस्थापनासाठी आवश्यक असणारी शासकीय कार्यालये आणि अत्यावश्यक सेवा 100% कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीसह चालू राहतील. इतर सरकारी कार्यालयांबाबत सबंधित विभाग प्रमुख हे कर्मचाऱ्यांच्या आवश्यक जास्तीच्या उपस्थिती बाबतचा निर्णय स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या परवानगीने घेवू शकतील. 
 *अत्यावश्यक सेवांमध्ये खालील बाबींचा समावेश असेल* रुग्णालये, निदान केंद्रे (Diagnostic Centers), दवाखाने, लसीकरण केंद्रे, वैद्यकीय विमा कार्यालये, औषध दुकाने (Pharmacies) औषध कंपन्या, इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा व सदर सेवा पुरविणारी उत्पादक केंद्रे, वाहतूक व पुरवठा साखळीस परवानगी असेल. लस,सॅनिटायझर, मास्क व वैद्यकीय उपकरणे व अशा सेवांना लागणारा कच्चा माल व त्यांच्याशी सबंधित उत्पादन व वितरण. व्हेटरीनरी हॉस्पिटल्स, अॅनिमल केअर शेल्टर्स व पेट फुड शॉप्स.  वनविभागाने घोषित केल्यानुसार वनाशी संबंधित सर्व कामकाज. किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी कन्फेक्शनरी, मटन,  चिकन, अंडी,  मासे दुकाने,  इत्यादींची सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांची दुकाने. कोल्ड स्टोरेज आणि गोदाम सेवा. सार्वजनिक वाहतूक - विमान, रेल्वे, टॅक्सी, ऑटो आणि सार्वजनिक बस. राज्य व स्थानिक प्राधिकरणांचे मान्सूनपूर्व उपक्रम / सातारा जिल्ह्याचे पश्चिम  भागातील खाजगी व्यक्तींची मान्सूनपूर्व कामे. स्थानिक प्राधिकरणाद्वारे सर्व सार्वजनिक सेवा. भारतीय रिझर्व्ह बँक आणि आरबीआयने नियुक्त केलेल्या आवश्यक सेवा. सेबीच्या सर्व कार्यालये बाजारातील मूलभूत सुविधा संस्थांसारख्या स्टॉक एक्सचेंजेस,  डिपॉझिटरीज, क्लियरिंग कॉर्पोरेशन आणि इतर मध्यस्थी सेबीकडे नोंदणीकृत आहेत. दूरसंचार सेवांच्या दुरुस्ती / देखभालीसाठी आवश्यक सेवा. माल वाहतूक, पाणीपुरवठा सेवा. शेती संबंधी उपक्रम, बियाणे, खते, उपकरणे व त्याची दुरुस्ती यासह कृषी क्षेत्राचे अखंड निरंतरता सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक असणारी कृषी संबंधित क्रियाकलाप आणि  त्यांच्याशी संबंधित संलग्न उपक्रम. सर्व वस्तूंची निर्यात-आयात. ई-कॉमर्स (केवळ आवश्यक वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्यासाठी). अधिकृत मीडिया  पेट्रोल पंप आणि पेट्रोलियम संबंधित उत्पादने. गंभीर पायाभूत सुविधा आणि सेवांना आधार देणारी डेटा सेंटर क्लाउड सर्व्हिसेस/आयटी सेवा  सरकारी आणि खाजगी सुरक्षा सेवा. विदयुत आणि गॅस पुरवठा सेवा. ATM,s ,पोस्टल सेवा, कस्टम हाऊस एजंट्स / परवानाकृत मल्टि मोडल ट्रान्सपोर्ट ऑपरेटर  जे लस / जीवनरक्षक औषधे / फार्मास्युटिकल उत्पादनांच्या हालचालीशी संबंधित आहेत. कोणत्याही अत्यावश्यक सेवेसाठी कच्चा माल, पॅकेजिंग सामग्रीची निर्मिती करणारे घटक  व्यक्तींसाठी तसेच संस्थांसाठी पावसाळ्याच्या हंगामासाठी साहित्याच्या उत्पादनामध्ये गुंतलेली यंत्रणा. मालवाहतूक व अत्यावश्यक सेवेतील वाहनांच्या दुरुस्तीसाठी गॅरेज, स्पेअर पार्ट, पंक्चर दुकाने. सातारा जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या सकाळी 07.00 वा. ते दुपारी 02.00 वा. पर्यंत सुरु राहतील. बाजार समित्यांच्या ठिकाणी फक्त घाऊक किंवा किरकोळ विक्रेत्यांनाच तेथे जावून माल घेता येईल, कोणत्याही वैयक्तीक व्यक्तीस बाजार समितीच्या ठिकाणी प्रवेश नसेल या शर्तीसह सुरु राहतील. याबाबत नियंत्रण करण्याची जबाबदारी त्या त्या स्थानिक नागरी / ग्रामीण प्रशासन संस्थेची असेल.  स्थानिक आपत्ती व्यवस्थापनाद्वारे आवश्यक सेवा म्हणून नियुक्त केलेल्या कोणत्याही सेवा. 
*सूट देणेत आलेल्या बाबी / आस्थापना(Exemption Category)* केंद्रीय, राज्य आणि स्थानिक प्रशासनाची सर्व कार्यालये आणि त्यामध्ये समाविष्ठ असलेली सर्व वैधानीक प्राधिकरणे व संस्था. सहकारी, पीएसयू आणि खाजगी बँका. अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या कंपनींची कार्यालये. विमा/ वैद्यकीय हक्क सबंधित सेवा. उत्पादन/वितरण व्यवस्थापित करण्यासाठी आवश्यक असणारी फार्मास्युटिकल कंपनीची कार्यालये. रिझर्व्ह बॅंकेने स्टँड अलोन प्राइमरी डीलर्स, सीसीआयएल, एनपीसीआय, पेमेंट सिस्टम ऑपरेटर आणि आरबीआयच्या नियमन केलेल्या बाजारपेठेत कार्यरत वित्तीय बाजारातील सहभागींसह घटक आणि मध्यस्थ. सर्व नॉन-बँकिंग फायनान्शियल कॉर्पोरेशन. सर्व सूक्ष्म वित्त संस्था.न्यायालये, न्यायाधिकरण किंवा चौकशी आयोगांचे कार्य चालू असल्यास वकिलांची कार्यालये. 
*वर्तमानपत्रे / मासिके/ नियतकालिके* वर्तमानपत्रे / मासिके/ नियतकालिके छपाईस व वितरणास परवानगी असेल.
 *'आयसोलेशन बबल'* म्हणजे कामकाजासाठी ऑनसाईट निवासस्थान किंवा जवळपासची सोय. समर्पित वसाहतींद्वारे ज्यात हालचाली समर्पित परिवहन सेवेद्वारे केली जातात, ज्यात जास्तीत जास्त 10% व्यवस्थापकीय कर्मचारी बाहेरून येतात.  "ट्रान्सपोर्ट बबल" म्हणजे सार्वजनिक वाहनातून नव्हे तर समर्पित परिवहन सेवेतील बाहेरील कर्मचार्यां ची हालचाल.
 
*दंड*  सार्वजनिक ठिकाणी / सार्वजनिक वाहतूक या ठिकाणी विना मास्क असणाऱ्या व्यक्तींकडून 500/- रु दंड आकारणेत यावा. रेस्टॉरंट, हॉटेल बाबतीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर प्रत्येकी 1000/- रु दंड आकारणेत यावा. तसेच सदर आस्थापनेकडून रु. 10,000/- इतका दंड आकाराला जाईल. सदर कारवाई नंतरही वारंवार सदर नियमांचे उल्लंघन झाल्यास केंद्र शासनाकडून जोपर्यंत कोरोना विषयक कायदा अस्तित्वात असेल तोपर्यंत सदरची आस्थापना बंद केली जाईल. अत्यावश्यक सेवेतील दुकानातील मालक, कर्मचारी किंवा ग्राहक यांनी वरील नियमांचे पालन न केल्यास त्यांच्यावर रु  500 /-  इतका दंड आकाराला जाईल आणि जर एखादा ग्राहक कोव्हीड- 19 विषयक नियमांचे पालन करीत नसताना सबंधित दुकानातून जर सदर ग्राहकास सेवा दिली जात असेल तर सदर दुकानावर रु.1,000/- इतका दंड आकारला जाईल. वारंवार सदर नियमाचे उल्लंघन झाल्यास केंद्र शासनाकडून जितक्या कालावधीसाठी कोव्हीड– 19 साथरोग हा आपत्ती म्हणून अधिसूचित असेल तितक्या कालावधीसाठी सबंधित आस्थापना/दुकान बंद केले जाईल.  विनाकारण व विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तिंच्या बाबतीत अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सातारा यांचेकडील आदेशानुसार रक्कम रुपये 500/- दंड आकारणेत येईल.
  सदर आदेशाची अंमलबजावणी पोलीस अधीक्षक, Incident Commander तथा उपविभागीय दंडाधिकारी, तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी नगरपालिका/ नगरपरिषद/नगरपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्था व सर्व संबंधित प्रशासकीय विभाग प्रमुख यांनी करावी.
सदर आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधीतांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीतांचे विरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ते 60, व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 नुसार तसेच भारतीय साथरोग अधिनियम 1897 अन्वये दंडनीय / कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

*सातारा जिल्ह्यातील 1188 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 36 बाधितांचा मृत्यू*

*सातारा जिल्ह्यातील 1188 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 36 बाधितांचा मृत्यू*
 सातारा दि.6 : जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1188 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  आले असून 36 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
  तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 13 कराड 209 खंडाळा 65 खटाव 177  कोरेगांव 126 माण 78  महाबळेश्वर 20, पाटण 102 फलटण 35  सातारा 309 वाई 43  व इतर 11  असे आज अखेर  एकूण 174590 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत. 
  तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या  तर आज  अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 2 कराड 9 खंडाळा 0 खटाव 2  कोरेगांव 2 माण 5 महाबळेश्वर 0  पाटण 0 फलटण 3 सातारा 11  वाई 2  व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 3864 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

*पर्यावरण संवर्धनासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न होणे गरजेचे - प्रा. डॉ. भाऊराव दांगट*

*पर्यावरण संवर्धनासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न होणे गरजेचे*  - प्रा. डॉ. भाऊराव दांगट          
तळमावले दि. ५ श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर यांचे वतीने ' घाबरू नका, आम्ही आपल्या पाठीशी आहोत ' हे ब्रीद घेऊन कोरोना काळात समाजाला मानसिक बळ देण्याचे अभिनव कार्य सुरू आहे . संस्थेच्या या कार्याला ' शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या ' माझं गाव कोरोनामुक्त गाव आभियानाची ' जोड लाभली आहे . या अभियानाच्या माध्यमातून विचारांचा व गरजूंना मदतीचा जागर सुरू आहे . जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आज काकासाहेब चव्हाण कॉलेज तळमावलेचा भूगोलशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने प्रा. डॉ. भाऊराव दांगट ( विभागप्रमुख, वनस्पतीशास्त्र विभाग  श्रीमती मिनलबेन महेता कॉलेज,   पाचगणी ) यांचा ' पर्यावरण आणि आपण ' या विषयावर ऑनलाईन व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला . कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गाडे हे होते . या कार्यक्रमासाठी वांग व्हँली पंचक्रोशीतील विविध ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गुरुदेव कार्यकर्ते, स्वयंसेवक विद्यार्थी- विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते .                            डॉ. भाऊराव दांगट पुढे  म्हणाले, आपल्या मुलभूत गरजांची पूर्तता पर्यावरणातून होत असते . आपल्या अवतीभोवती अनेक पशु-पक्षी, कृमी कीटक यांचा अधिवास व रक्षण करणे हे मानवाचे कर्तव्य आहे . कोरोनासारख्या महामारीशी झुंज देताना पर्यावरणाचे महत्व पुन्हा  एकदा प्रकर्षाने अधोरेखित झाले आहे . पद्मश्री सन्मानप्राप्त बीजमाता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या  राहीबाई पोपेरे यांचे कार्य आदर्शवत आहे . अनेक टाकाऊ वस्तुंपासून कल्पकतेने अनेक नवनवीन गोष्टी बनविता येतात, असे सांगून साधी सोपी जीवनशैली आपले तंदुरुस्त आरोग्य  व पर्यावरण रक्षणासाठी सहाय्यभूत ठरेल . त्यासाठी सायकल चा वापर वाढविणे आवश्यक आहे .  मा. प्राचार्य डॉ. अरुण गाडे अध्यक्षस्थानावरुन मार्गदर्शन करताना म्हणाले, निसर्ग माणसाला भरभरून देत असतो . पूर्वीच्याकाळी निसर्गामधून मिळणाऱ्या रानभाज्या आवडीने खाऊन सुदृढ, निरोगी, आरोग्यसंपन्न पिढी निर्माण झाली . हा निसर्गाचा ठेवा जपायला हवा .        कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉ. अरूण गाडे ( सदस्य टास्क फोर्स समिती सातारा विभाग ) व प्रा. विक्रांत सुपुगडे ( सदस्य टास्क फोर्स समिती ) यांच्या नेतृत्वाखाली गुरुदेव कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले . 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक  प्रा. संभाजी नाईक  (भूगोलशास्त्र विभागप्रमुख व प्रकल्प अधिकारी रा.से.यो विभाग ) यांनी केले. सूत्रसंचालन  प्रा. डॉ.  गवराम पोटे  (मराठी विभाग प्रमुख) यांनी केले .                     आभार  प्रा. डॉ.यु.ई.साळुंखे (वाणिज्य विभाग प्रमुख) यांनी मानले .

*संयुक्त विद्यार्थी संघटना, महाराष्ट्र राज्य यांचा सरकारला १० जुनचा अल्टीमेंट*

*संयुक्त विद्यार्थी संघटना, महाराष्ट्र राज्य यांचा सरकारला १० जुनचा अल्टीमेंट*

*कुमजाई पर्व वृत्तसेवा*
कराड - ( ६ जून ) -  महाविद्यालयीन विद्यार्थी यांचा महाविद्यालयातील विविध अनावश्यक  व खासगी क्लासेस फी बाबत १० जुन २०२१ अखेर शासन निर्णय न झाल्यास संयुक्त विद्यार्थी संघटना, महाराष्ट्र राज्य  संपूर्ण राज्यभर विद्यार्थीवर्गासह  तीव्र आंदोलन करणार असल्याचा  इशारा संयुक्त विद्यार्थी संघटना, महाराष्ट्र राज्य यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून दिला आहे.
  कोरोना महामारीचे संकट गेल्या वर्षा पेक्षा जास्त काळापासून जगावर आहे त्यामुळे केलेले लॉकडोवन व समाजातील सर्व वर्गावर आर्थिक संकट ओढवलेले आहे. महाविद्यालय वर्षभरापासून ऑनलाइन वर्ग घेत आहेत. मात्र विद्यार्थी वर्गाकडून अशा कठीण काळामध्ये पूर्ण फी वसुल केली जात आहे. या फी मध्ये सवलत अथवा माफ व्हावी? यासाठी मुख्यमंत्री कार्यालय व उच्च तंत्र शिक्षण विभागाशी संघटनात्मक पातळीवर लढा सुरू आहे. त्यासाठी चाळीसहून अधिक लोकप्रतिनिधीनां प्रत्यक्ष भेटून शिफारशी ही केल्या आहेत. तसेच राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांनाही प्रत्यक्ष भेटून संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रथमेश निकमसाहेब, संकेत कचरेसाहेब, प्रदेश महासचिव संकेत पाटीलसाहेब, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष स्वप्नील पवारसाहेब व इतर पदाधिकाऱ्यांनी दोन वेळच्या भेटी वेळी संपूर्ण माहिती व परिस्थिची विस्तृत माहिती दिल्यानंतर नामदारांनी बैठक लावण्याचे आश्वासन दिले होते? मात्र आतापर्यंत अनेक वेळा ई-मेल अथवा डिजिटल माध्यम इत्यादी माध्यमातून अनेक वेळा पाठपुरावा करूनही संबंधित विभागाकडून कोणताही प्रतिसाद दिला जात नाही आहे . 
  त्यामुळे ४ जुन २०२१ रोजी संघटनेची झालेल्या ऑनलाइन बैठकीत सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला आहे .

शनिवार, ५ जून, २०२१

*सातारा जिल्ह्यातील 1394 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 27 बाधितांचा मृत्यू :*2923 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज*

*सातारा जिल्ह्यातील 1394 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 27 बाधितांचा मृत्यू :*2923 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज*

 सातारा दि.5 : जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1394 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  आले असून 27 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
  तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 92 कराड 252 खंडाळा 157  खटाव 74  कोरेगांव 116 माण 43 महाबळेश्वर 3 पाटण 56 फलटण 212 सातारा 294  वाई 81व इतर 14 असे आज अखेर  एकूण 173479 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत. 
  तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या  तर आज  अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 4  कराड 5 खंडाळा 1 खटाव 3 कोरेगांव 3 माण 0 महाबळेश्वर 0  पाटण 1 फलटण 2 सातारा 6 वाई 2 व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 3828 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
*2923 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज*
दरम्यान जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 2923 नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
*एकूण नमुने -844646*
*एकूण बाधित - 173479*
*घरी सोडण्यात आलेले -154148* 
*मृत्यू -3828*
*उपचारार्थ रुग्ण-15490*
                                                                           

राज्यात सोमवारपासून अनलॉक प्रक्रिया सुरु सातारा जिल्हा तिसऱ्या टप्प्यात

राज्यात सोमवारपासून अनलॉक प्रक्रिया सुरु सातारा जिल्हा तिसऱ्या टप्प्यात
मुंबई : दि.5 - राज्यात सोमवारपासून अनलॉक प्रक्रिया सुरु होणार आहे. कोरोना पॉझिटिव्हीटी रेटनुसार पाच टप्प्यांमध्ये अनलॉक प्रक्रिया होणार आहे. या संदर्भात राज्य सरकारकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. राज्यात अनलॉक प्रक्रियेसाठी ५ टप्पे तयार करण्यात आले आहेत.शासनाने जाहीर केलेल्या नियमावलीमध्ये राज्यातील पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यांचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यात 5 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे.शासनाने जाहीर केलेल्या नियमावलीमध्ये राज्यातील पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यांचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यात 5 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे.

पहिल्या टप्प्यात हे जिल्हे

नाशिक, औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा ,चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, परभणी, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ 

दुसऱ्या टप्प्यातील जिल्हे

अहमदनगर, अमरावती, हिंगोली, मुंबई, मुंबई उपनगर, नंदूरबार

तिसऱ्या टप्प्यातील जिल्हे

अकोला, बीड, कोल्हापूर, उस्मानाबाद, पालघर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर 

चौथ्या टप्प्यातील जिल्हे

पुणे, रायगड


अत्यावश्यक सेवेतील दुकाने 7 ते 2 वाजेपर्यंत आणि इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार 7 ते 2 वाजेपर्यंत सुरू राहतील अत्यावश्यक सेवा वगळता शनिवार आणि रविवार बंद राहतील

- मॉल्स आणि सिनेमागृह पूर्णपणे बंद

- हॉटेल्स 50 टक्के क्षमतेने सकाळी 7 ते 2 वाजेपर्यंत खुली रहातील. दुपारी 2 नंतर पार्सल सेवा. शनिवार आणि रविवार बंद राहतील.

- सार्वजनिक उद्याने, मैदाने, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक सकाळी 5 ते 9 यावेळेत सुरू राहतील

- खासगी आणि सरकारी कार्यालयात 50 टक्के क्षमतेने उपस्थिती

- इंडोर खेळले जाणारे स्पोर्ट्स बंद राहतील

- सिनेमा चित्रीकरणाला स्टुडीओमध्ये परवानगी

- सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजनात्मक कार्यक्रमाला 50 टक्के क्षमतेने दुपारी 2 वाजेपर्यंत परवानगी (सोमवार ते शुक्रवार)

-लग्न सोहळ्यास 50 जणांची उपस्थिती, अंत्यसंस्कार 20 जणांची उपस्थिती, इतर बैठकीस 50 टक्के उपस्थित

- कृषी क्षेत्रातील कामांना आणि ई कॉमर्स, बांधकाम क्षेत्रातील कामांना दुपारी 2 वाजेपर्यंत परवानगी

- दुपारी 2 वाजल्यानंतर जमावबंदी कायम राहिल

*कुंभारगाव माटेकरवाडी येथे मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व भव्य कलश मिरवणूक*.

          = कुंभारगाव तालुका पाटण येथील माटेकरवाडी येथे शंभू महादेव शिवलिंग, नंदी, श्री पार्वती माता, श्री गणेश, श्री हनुमान, श्...