*सातारा जिल्ह्यातील 1394 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 27 बाधितांचा मृत्यू :*2923 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज*
सातारा दि.5 : जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1394 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 27 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 92 कराड 252 खंडाळा 157 खटाव 74 कोरेगांव 116 माण 43 महाबळेश्वर 3 पाटण 56 फलटण 212 सातारा 294 वाई 81व इतर 14 असे आज अखेर एकूण 173479 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 4 कराड 5 खंडाळा 1 खटाव 3 कोरेगांव 3 माण 0 महाबळेश्वर 0 पाटण 1 फलटण 2 सातारा 6 वाई 2 व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 3828 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
*2923 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज*
दरम्यान जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 2923 नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
*एकूण नमुने -844646*
*एकूण बाधित - 173479*
*घरी सोडण्यात आलेले -154148*
*मृत्यू -3828*
*उपचारार्थ रुग्ण-15490*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा