बुधवार, २१ जानेवारी, २०२६

सातारा - जिल्हा परिषद–पंचायत समिती रणधुमाळी! भाजपच्या ‘स्वबळा’ला महायुतीतील घटक पक्षांचा एकजूट प्रतिउत्तर – आज मोठी घोषणा फलटण व पाटण – धनुष्यबाणावरच सर्व उमेदवार

सातारा - जिल्हा परिषद–पंचायत समिती रणधुमाळी! भाजपच्या ‘स्वबळा’ला महायुतीतील घटक पक्षांचा एकजूट प्रतिउत्तर – आज मोठी घोषणा 

  • फलटण व पाटण – धनुष्यबाणावरच सर्व उमेदवार

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण अक्षरशः उकळत्या टप्प्यावर पोहोचले आहे. भाजपने सर्वत्र ‘स्वबळावर निवडणूक’ लढवण्याचा नारा दिल्यानंतर महायुतीतील घटक पक्षांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून, आता भाजपविरोधात एकत्रित ताकद उभी करण्याचा निर्णायक निर्णय घेण्यात आला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, महायुतीतील घटक पक्ष व इतर समविचारी पक्षांनी आघाडीचा फॉर्म्युला निश्चित केला असून, याबाबतची अधिकृत घोषणा बुधवारी होणार आहे. ज्या तालुक्यात ज्याची ताकद, त्या तालुक्यात त्यालाच प्राधान्य या तत्त्वावर जागा वाटप होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मंगळवारी पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या कोयना दौलत निवासस्थानी झालेल्या बैठकीत राजकीय खलबते चांगलीच रंगली. या बैठकीस आ. महेश शिंदे, संपर्कप्रमुख शरद कणसे, जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, रणजित भोसले, जयवंत शेलार, कराडचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, फलटणचे अनिकेतराजे ना. निंबाळकर यांच्यासह अनेक वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.

भाजपकडून घटक पक्षांवर दबाव टाकत सर्वत्र स्वबळाचा आग्रह धरला जात असल्याने, बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. अखेर भाजपला रोखण्यासाठी विरोधकांची एकजूट करण्याचा ठाम निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून यासाठी बैठकांचा सपाटा सुरू असून, शिवसेना शिंदे गटाचे नेते ना. शंभूराज देसाई, अजित पवार गटाचे ना. मकरंद पाटील, शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे, माजी सभापती आ. रामराजे ना. निंबाळकर, माजी आ. बाळासाहेब पाटील यांच्या स्वतंत्र बैठकाही झाल्या आहेत.

⚔️ तालुकानिहाय रणनिती ठरली!

  • सातारा तालुका – सर्व पक्ष एकत्र येऊन भाजपविरोधात लढणार
  • कोरेगाव – जबाबदारी आ. महेश शिंदेंकडे
  • जावली – आ. शशिकांत शिंदेंच्या विचाराने लढत
  • वाई, खंडाळा, महाबळेश्वर – ना. मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली
  • फलटण व पाटणधनुष्यबाणावरच सर्व उमेदवार
  • कराड दक्षिण – पृथ्वीराज चव्हाण व ॲड. उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या विचाराने
  • कराड उत्तर – बाळासाहेब पाटील यांच्यासोबत
  • माण–खटाव – निर्णय बुधवारी जाहीर

🚩 ‘ज्याच्याकडे गट, त्याच्याकडेच गण’ – ठाम निर्णय

जिल्हा परिषदेचे 65 गट आणि पंचायत समितीचे 130 गण यानुसार उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या पक्षाला गट दिला जाईल, त्याच पक्षाला संबंधित गणही दिला जाणार असल्याचे निश्चित झाले आहे. अर्ज माघारीपर्यंत सर्व मित्र पक्ष समन्वय साधून एकच तगडा उमेदवार उभा करण्यावर एकमत झाले आहे.

या सर्व राजकीय घडामोडींवर बुधवारी अधिकृत शिक्कामोर्तब होणार असून, जिल्ह्यातील निवडणूक रणांगणात भाजपविरोधात महाआघाडीचे शक्तिप्रदर्शन पाहायला मिळणार, हे मात्र निश्चित! 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे प्रितीसंगमावर स्व. यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे प्रितीसंगमावर स्व. यशवंतराव चव्हाण यांना भावपूर्ण अभिवादन. सातारा | दि. २ : महाराष्ट्राचे शिल्पका...