सोमवार, ५ जानेवारी, २०२६

नवभारत इंग्लिश स्कूल कुंभारगावचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न.

### नवभारत इंग्लिश स्कूल कुंभारगावचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न.
**कराड | प्रतिनिधी** दि. **४ जानेवारी २०२६** रोजी **नवभारत इंग्लिश स्कूल, कुंभारगाव (ता. पाटण)** या शाळेच्या **शैक्षणिक वर्ष २०२५–२०२६** चा **वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ** कराड येथील **यशवंतराव चव्हाण टाऊन हॉल** येथे अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून **मा. श्री. संदीप सूर्यवंशी** (सहाय्यक पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा, कराड), **मा. सौ. रंजनी पाटोळे** (सहाय्यक वाहतूक निरीक्षक, RTO कराड) व **मा. अॅड. हरिश्चंद्र काळे** (ज्येष्ठ विधिज्ञ, गुन्हे विभाग) हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी **मा. श्री. संजय देसाई साहेब** (माजी शिक्षण, अर्थ व क्रीडा सभापती तसेच कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सातारा जिल्हा) भूषवित होते. यावेळी **मा. सौ. हेमलता गायकवाड** (अध्यक्ष, विजयानंद चॅरिटेबल ट्रस्ट, कराड), **मा. सौ. गौरी मोहिते** (मुख्य कार्यकारी अधिकारी, विजयानंद चॅरिटेबल ट्रस्ट, कराड), **प्रा. सचिन पुजारी सर** (के. सी. कॉलेज तळमावले व सचिव, संजीवन प्रतिष्ठान कुंभारगाव) तसेच **मा. सौ. प्रिती गुरव–कदम** (मुख्याध्यापिका, नवभारत इंग्लिश स्कूल, कुंभारगाव) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. सर्व मान्यवरांचे स्वागत फुलझाडे व शाल देऊन करण्यात आले. या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी **शैक्षणिक गुणवत्ता, क्रीडा, सांस्कृतिक उपक्रम, वक्तृत्व, चित्रकला व विविध स्पर्धांमध्ये मिळवलेल्या उल्लेखनीय यशाबद्दल** त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षिकांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल **‘बेस्ट टिचर’ पारितोषिक** प्रदान करून गौरविण्यात आले. सर्व पुरस्कार प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांच्या शुभहस्ते प्रमाणपत्रे व पारितोषिके देऊन वितरित करण्यात आली.
प्रमुख पाहुणे **मा. श्री. संदीप सूर्यवंशी** यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, *“सातत्य, शिस्त व कठोर परिश्रम यांच्या बळावरच यश संपादन करता येते.”* तसेच रस्त्यावर प्रवास करताना **वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे अत्यावश्यक** असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले. **मा. सौ. रंजनी पाटोळे** यांनी आपल्या मनोगतात शालेय जीवनातील शिस्त व संस्कार यांचे महत्त्व सांगत, *“यश मिळविताना आई-वडील व शिक्षकांचे योगदान कधीही विसरता कामा नये. स्वप्ने साकार करण्यासाठी अभ्यासासोबत कला व गुणांना वाव देणे गरजेचे आहे,”* असे मत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात **मा. श्री. संजय देसाई साहेब** म्हणाले की, *“सन २००८ मध्ये कोणतेही पूर्वनियोजन न करता केवळ ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे या उद्देशाने नवभारत इंग्लिश स्कूलची स्थापना करण्यात आली. आज ही संस्था यशस्वी वाटचाल करत आहे. शाळेच्या नावाप्रमाणेच विद्यार्थ्यांनी नवभारत घडविण्याचा संकल्प मनाशी बांधून जिद्दीने पुढे जावे.”*
यावेळी **मा. अॅड. हरिश्चंद्र काळे** यांनी कायदा, नियम व शिस्त यांचे महत्त्व विशद करताना **“Good Touch & Bad Touch”** या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच **पोक्सो कायद्यांतर्गत असलेले गंभीर परिणाम** उदाहरणांसह सांगून विद्यार्थ्यांना सजग राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविक व वार्षिक अहवालात **मुख्याध्यापिका सौ. प्रिती गुरव–कदम** यांनी शाळेच्या संपूर्ण शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेतला व शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांच्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे **सूत्रसंचालन सौ. ज्योती पाटील व सौ. वर्षा साळुंखे–कळंत्रे** यांनी केले, तर **आभार प्रदर्शन सौ. अर्चना पुजारी व सौ. वृषाली मोरे** यांनी मानले. या समारंभास **पालकवर्ग, शिक्षकवृंद, विद्यार्थी, ग्रामस्थ, संस्थेचे आजी-माजी पदाधिकारी व हितचिंतक** मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

1 टिप्पणी:

मंद्रूळकोळे खुर्द येथे नविन ट्रान्सफॉर्मर बसविलाविकासाठी झुकते माप देणाऱ्या ना. शंभूराज देसाई यांचे आभार

ढेबेवाडी प्रतिनिधी            सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून मिळालेले मंद्रूळकोळे खुर्द येथे ...