संपादक - प्रदीप विष्णु माने 8108253323 ताज्या बातम्या सामाजिक,राजकारण, मनोरंजन,क्रीडा आणि इतर
सोमवार, ५ जानेवारी, २०२६
नवी मुंबई येथे पाटण तालुका मुंबई रहिवासी संघ – भाजप मेळावा उत्साहात संपन्न.
नवी मुंबई येथे पाटण तालुका मुंबई रहिवासी संघ – भाजप मेळावा उत्साहात संपन्न
नवी मुंबई :
नवी मुंबई येथे पाटण तालुका मुंबई रहिवासी संघ – भाजप मेळावा मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडला. पाटण तालुक्यातील मुंबई व नवी मुंबई परिसरात वास्तव्यास असलेल्या नागरिकांना एकत्र आणून संघटन अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्यास माजी खासदार मा. संजीव नाईक साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच शिराळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. सत्यजित देशमुख साहेब, भरत पाटील (नाना) साहेब, सत्यजित पाटणकर, रमेश पाटील, हिंदुराव पाटील, सौ. प्रचिताई पाटील यांची विशेष उपस्थिती लाभली.
यावेळी नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील भाजपच्या उमेदवार भरतीताई पाटील यांच्यासह इतर सर्व उमेदवार मंचावर उपस्थित होते. तसेच प्रतापभाऊ देसाई, राजाभाऊ शेलार, अमर मोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व पाटण तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मेळाव्यात बोलताना माजी खासदार संजीव नाईक साहेब यांनी भाजप पक्षाच्या संघटनात्मक ताकदीवर भर देत, पाटण तालुक्यातील नागरिकांनी मुंबई व नवी मुंबईत सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात दिलेल्या योगदानाचे कौतुक केले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटन अधिक बळकट करून सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
आमदार सत्यजित देशमुख साहेब यांनी आपल्या भाषणात सांगितले की, पाटण व शिराळा हे जुळे भाऊ तालुके असून मुंबई व नवी मुंबईत वास्तव्यास असलेल्या दोन्ही तालुक्यांतील नागरिकांच्या अडचणीच्या वेळी मा. खासदार संजीव नाईक साहेब नेहमीच मदतीला धावून येतात. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीबद्दल त्यांनी मनापासून आभार व्यक्त केले.
यावेळी भरत पाटील (नाना) साहेब यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत संघटन मजबूत ठेवण्याचे महत्त्व विशद केले. पाटण तालुक्यातील मुंबई व नवी मुंबईतील नागरिकांनी सामाजिक एकोपा जपत विकासासाठी एकत्रितपणे काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी अधिक सक्रिय राहून भाजप पक्षाची ध्येयधोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवावीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भरत पाटील (नाना) साहेब पुढे म्हणाले की, नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत सातारा जिल्ह्यातील एकूण १३ उमेदवारांना भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली आहे, ही अभिमानाची बाब असून यासाठी त्यांनी माजी खासदार संजीव नाईक साहेबांचे विशेष आभार मानले.
यावेळी नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील उमेदवारांनीही आपली भूमिका मांडत, नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा संकल्प व्यक्त केला. उपस्थित मान्यवरांनी भाजप पक्ष अधिक बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यांनी घराघरात पोहोचण्याचे आवाहन केले.
दरम्यान, निवडणुकीनंतर सातारा जिल्ह्यातील हे १३ नगरसेवक महापौर, उपमहापौर व स्थायी समिती अध्यक्षपदाच्या शर्यतीत असतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
मेळाव्याच्या शेवटी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत व आभार मानण्यात आले. या मेळाव्यामुळे पाटण तालुका मुंबई रहिवासी संघ व भाजप पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक वाढल्याचे चित्र पाहायला मिळाले.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कुंभारगाव (चिखलेवाडी) - कै. रंगुबाई यादव यांचे निधन.
कुंभारगाव , प्रतिनिधी : पाटण तालुक्यातील कुंभारगाव (चिखलेवाडी) येथील प्रा. सुरेश यादव यांच्या मातोश्री कै. रंगुबाई रघुनाथ यादव य...
-
कुंभारगाव साप्ताहिक कुमजाई पर्व न्यूज प्रतिनिधी. दि. 14 जुलै 2026 चिखलेवाडी ग्रामपंचायत हद्दीत मोरेवाडी येथे सोमवारी रात्रीच्य...
-
धक्कादायक घटना! मलकापुरात मित्राकडूनच मित्राचा खून — दारूच्या नशेत उफाळला जुन्या वादाचा राग मलकापूर (कुमजाई पर्व प्रतिनिधी) ...
-
*कुंभारगाव–गलमेवाडीत रात्रीचा थरार: घराजवळील शेडमध्ये बिबट्याचा हल्ला, दोन शेळ्यांचा फडशा.* भरवस्तीत शिरून शेळ्यांवर हल्ला; द...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा