संपादक - प्रदीप विष्णु माने 8108253323 ताज्या बातम्या सामाजिक,राजकारण, मनोरंजन,क्रीडा आणि इतर
बुधवार, १४ जानेवारी, २०२६
तळमावले - काळंबादेवी को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या दिनदर्शिका २०२६ चे थाटात प्रकाशन;
काळंबादेवी को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या दिनदर्शिका २०२६ चे थाटात प्रकाशन;
:
तळमावले येथील काळंबादेवी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, तळमावले यांच्या मुख्य कार्यालयात दिनदर्शिका २०२६ चे प्रकाशन उत्साहात संपन्न झाले. सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ व अनुभवी नेतृत्व लाभलेल्या या कार्यक्रमास बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना, दौलतनगर (मरळी) चे माजी चेअरमन व विद्यमान संचालक मा. श्री. डॉ. दिलीपराव चव्हाण यांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.
या प्रसंगी पाटण बाजार समितीचे उपसभापती श्री. विलास गोडांबे, संस्थेचे संस्थापक व चेअरमन मा. श्री. रमेश घाडगे, व्यवस्थापक श्री. सुरज घाडगे, पाटण पंचायत समितीचे माजी सदस्य मा. श्री. महादेवराव पानवळ, मस्करवाडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच श्री. बबन मस्कर, कुंभारगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन श्री. रामराव इनामदार, गलमेवाडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच श्री. दत्तात्रय चोरगे, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर मा. श्री. सुशांत तुपे यांच्यासह श्री. सुरज पाटील, श्री. विक्रम यादव, श्री. प्रमोद शिद्रुक, श्री. संभाजीराव चव्हाण, श्री. अजित कुंभार, श्री. अनवर डांगे, श्री. दादासाहेब मोरे, श्री. प्रकाश कोतवडे तसेच दै. कृष्णाकाठ न्यूज नेटवर्क, कराडचे प्रतिनिधी श्री. राजेंद्र पुजारी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात मान्यवरांनी सोसायटीच्या आजवरच्या कार्याचा गौरव करत आर्थिक शिस्त, पारदर्शक कारभार व सभासदाभिमुख धोरणांमुळे संस्थेने परिसरात विश्वासार्हतेचे स्थान निर्माण केल्याचे नमूद केले. दिनदर्शिकेत संस्थेची वाटचाल, सामाजिक उपक्रम, महत्त्वाच्या तारखा व उपयुक्त माहिती समाविष्ट असून ती सभासदांसाठी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
यावेळी मान्यवरांनी काळंबादेवी को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या पुढील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देत, सहकाराच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांना आर्थिक सक्षमतेकडे नेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे आयोजन सुबक व शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले असून उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
*लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण व खाऊ वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न*
कुंभारगाव, दि. २२ जुलै : *महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार व परिपत्रकानुसार महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्र...
-
कुंभारगाव साप्ताहिक कुमजाई पर्व न्यूज प्रतिनिधी. दि. 14 जुलै 2026 चिखलेवाडी ग्रामपंचायत हद्दीत मोरेवाडी येथे सोमवारी रात्रीच्य...
-
धक्कादायक घटना! मलकापुरात मित्राकडूनच मित्राचा खून — दारूच्या नशेत उफाळला जुन्या वादाचा राग मलकापूर (कुमजाई पर्व प्रतिनिधी) ...
-
*कुंभारगाव–गलमेवाडीत रात्रीचा थरार: घराजवळील शेडमध्ये बिबट्याचा हल्ला, दोन शेळ्यांचा फडशा.* भरवस्तीत शिरून शेळ्यांवर हल्ला; द...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा