संपादक - प्रदीप विष्णु माने 8108253323 ताज्या बातम्या सामाजिक,राजकारण, मनोरंजन,क्रीडा आणि इतर
बुधवार, १५ ऑक्टोबर, २०२५
विद्यार्थ्यांचा सन्मान — प्रारंभ युवापर्व सामाजिक संस्थेचा उपक्रम, सळवे येथे गुणगौरव सोहळा व शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न
विद्यार्थ्यांचा सन्मान — प्रारंभ युवापर्व सामाजिक संस्थेचा उपक्रम
सळवे येथे गुणगौरव सोहळा व शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न.
सळवे (ता. पाटण, जि. सातारा) — ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, या हेतूने प्रारंभ युवापर्व सामाजिक संस्था नेहमीच कार्यरत असते. सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून संस्थेच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त यावर्षीही विद्यार्थी गुणगौरव सोहळा व शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
हा कार्यक्रम शनिवार, दि. 11 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10.00 वाजता सळवे येथील माध्यमिक शाळेत आयोजित करण्यात आला होता.
या सोहळ्यात सन 2024-2025 या शैक्षणिक वर्षात इयत्ता १०वी मध्ये सर्वाधिक गुण मिळवलेल्या पहिल्या सहा विद्यार्थ्यांचा ट्रॉफी, बॅग आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
तसेच सळवे, एकावडेवाडी आणि वरपेवाडी येथील एकूण 150 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
याशिवाय जिजाऊ आश्रम, कोळे येथे धान्य व शालेय वस्तूंचे वाटप करून सामाजिक कार्याचा उत्कृष्ट आदर्श संस्थेने घालून दिला.
या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष आनंद कदम, पदाधिकारी प्रशांत खरात, विजय कदम, संदीप कदम, प्रताप कदम, समाजसेवक तुकाराम कदम महाराज, तसेच सळवे ग्रामपंचायतीच्या सरपंच रुपाली पवार, माजी सरपंच शंकर कुंभार, लक्ष्मण बोर्गे, फौजी विलास मोहिते, आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाळेच्या वतीने मुख्याध्यापक सौ. प्रतिभा सावंत मॅडम, मुख्याध्यापक चव्हाण सर, पाटील मॅडम, चोरगे सर तसेच इतर शिक्षकांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोगत आणि आभार प्रदर्शनाने सोहळ्याची सांगता करण्यात आली.
🌸 प्रारंभ युवापर्व सामाजिक संस्थेचा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून, ग्रामीण भागात शिक्षणाच्या प्रोत्साहनासाठी एक आदर्श उदाहरण ठरले आहे. 🌸
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
मंद्रूळकोळे खुर्द येथे नविन ट्रान्सफॉर्मर बसविलाविकासाठी झुकते माप देणाऱ्या ना. शंभूराज देसाई यांचे आभार
ढेबेवाडी प्रतिनिधी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून मिळालेले मंद्रूळकोळे खुर्द येथे ...
-
धक्कादायक घटना! मलकापुरात मित्राकडूनच मित्राचा खून — दारूच्या नशेत उफाळला जुन्या वादाचा राग मलकापूर (कुमजाई पर्व प्रतिनिधी) ...
-
कुठरे - जबरी घरफोडी सात लाखांहून अधिक सोनं आणि रोकड घेऊन चोरटे फरार! पवारवाडी-कुठरे, ता. पाटण येथील दिनकर कृष्णा पवार यांच्या घ...
-
*कुंभारगाव–गलमेवाडीत रात्रीचा थरार: घराजवळील शेडमध्ये बिबट्याचा हल्ला, दोन शेळ्यांचा फडशा.* भरवस्तीत शिरून शेळ्यांवर हल्ला; द...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा