बुधवार, १२ जुलै, २०२३

श्री हनुमान तरूण मंडळ व हनुमान क्रिकेट क्लब शिद्रूकवाडी (खळे) यांच्या कडून जि.प. प्राथमिक शाळा शिद्रूकवाडी (खळे) येथे शालेय साहित्य चे वाटप

श्री हनुमान तरूण मंडळ व हनुमान क्रिकेट क्लब शिद्रूकवाडी (खळे) यांचा कडून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिद्रूकवाडी (खळे) येथे शालेय साहित्य चे वाटप करण्यात आले.मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास त्याच्या शिक्षणावरच अवलंबून असतो हा मूलमंत्र लक्षात घेता, गरजू विद्यार्थ्यांना मोफत  शालेय साहित्य मिळावे, या दृष्टीकोनातून श्री हनुमान तरूण मंडळ व हनुमान क्रिकेट क्लब शिद्रूकवाडी (खळे) यांचा कडून
 "मोफत शालेय साहित्य वाटप" हा अभिनव राबवीला आहे.
आपल्या भागातील शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना व अभ्यासाचा सराव करताना शालेय उपयोगी साहित्य कमी पडू नये. अनेक पालकांना सर्व साहित्य घेणे शक्य नसते हि गरज ओळखून हा उपक्रम राबविण्यात आला असल्याचे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले .यावेळी शाळेचे मुख्याध्यापक , मॅडम आणि हनुमान तरूण मंडळीतील कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

*लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण व खाऊ वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न*

कुंभारगाव, दि. २२ जुलै : *महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार व परिपत्रकानुसार महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्र...