सोमवार, १७ जुलै, २०२३

मंदा शेजवळ मंत्रालय सहाय्यक पदी निवड

 मंदा शेजवळ मंत्रालय सहाय्यक पदी निवड 

 



पाटण- मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयाची माजी विदयार्थिनी कु.मंदा हणमंतराव शेजवळ ह्या विदयार्थिनीची नुकतीच MPSC मार्फत अराजपत्रित परीक्षा 2021 मध्ये मंत्रालय सहाय्यक पदी निवड झालेली आहे,मंदा शेजवळ  विदयार्थीनीचे इ.5वी ते इ.10पर्यंतचे शिक्षण या विदयालयात झाले असून 2015 साली एस.एस.सी परीक्षेत तिने 91.00% गुण मिळवून विदयालयात प्रथम क्रमांक पटकिवलेला होता,

विदयालयीन जीवनामध्ये शिक्षण घेत असताना पहिल्यापासून तिला शासकीय नोकरी मिळविण्याची जिद्द होती ,ते ध्येय तिने स्पर्धा परीक्षेतून मिळविले या तिच्या अतुलनीय यशाबद्दल महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री मा.नामदार शंभूराज देसाईसाहेब, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.  रविराज देसाई दादा ,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कामखान्याचे चेअरमन यशराज देसाई दादा, युवा नेते जयराज देसाई  आदित्यराज देसाई तसेच सचिव श्री.डी.एम.शेजवळ व आजी माजी विदयार्थी,पालक यांनी तिचे अभिनंदन केले,या तिच्या यशाबद्दल विदयालयाच्या वतीने शाल,श्रीफळ,व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष कदम यांनी केले तर आभार श्री.मदने जे.एस.यांनी मानले,या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग व विदयार्थी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...