स्वाती गोडसे राज्यस्तरीय सुधारककार गोपाळ गणेश आगरकर पुरस्काराने सन्मानित
तळमावले/वार्ताहर
इंद्रधनु विचार मंच फाउंडेशनच्यावतीने सुधारककार गोपाळ गणेश आगरकर यांच्या 167 व्या जयंतीनिमित्त गोपाळ गणेश आगरकर सुधारक पत्रकारिता पुरस्कार 2023 टेंभू ता.कराड येथे नुकताच संपन्न झाला. यामध्ये पत्रकारिता क्षेत्रातील मानाचा राज्यस्तरीय सुधारककार गोपाळ गणेश आगरकर पुरस्कार सुप्रसिध्द वृत्तनिवेदिका स्वाती पांडुरंग गोडसे यांना सातारा लोकसभा मतदार संघ व सिक्कीमचे माजी राज्यपाल खासदार श्रीनिवास पाटील व अन्य मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ देऊन प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुधारक शिक्षण संस्था टेंभूचे सचिव प्रकाश पाटील, उद्योजक रामकृष्ण वेताळ, टेंभू गावचे सरपंच युवराज भोईटे, डाॅ.संदीप डाकवे, गोपाळ गणेश आगरकर विद्यालयातील मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, विद्यार्थी कराड पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
स्वाती गोडसे यांनी यापुर्वी पुणे आकाशवाणी, दुरदर्शनच्या कृषीवार्ता या बुलेटीनचे अँकरींग, झी 24 तास, न्यूज 18 लोकमत या वृत्तवाहिन्यांवर न्यूज अँकर म्हणून काम केले आहे. झी टाॅकीजच्या गजर किर्तनाचा सोहळा आनंदाचा या आषाढी वारी विषेश कार्यक्रमाचेही सुत्रसंचालन केले आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी पंढरपूर वारी लोकांपर्यत पोहोचवण्याचे काम केले आहे.
याशिवाय स्वाती गोडसे यांना क्रीएटीव्ह डान्ससाठी पुणे विद्यापीठांच्या कुलगुरुंच्या हस्ते मेडल मिळाले आहे. तसेच 42 विद्यापीठांमधून नंबर आला म्हणून गुजरात विद्यापीठाने करंडक देवून त्यांच्या कलेचा गौरव केला आहे. वृंदावन फाउंडेशनचा आधुनिक दुर्गा, अभंग पुरस्कार असे अनेक पुरस्कार गोडसे यांना मिळाले आहेत.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इंद्रधनू विचारमंच फाउंडेशनचे विश्वस्त विकास भोसले, नितीन ढापरे, संदीप चेणगे, प्रमोद तोडकर, अशोक मोहने, माणिक डोंगरे व अन्य पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
स्वाती गोडसे यांना राज्यस्तरीय सुधारककार गोपाळ गणेश आगरकर पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा