रविवार, १८ जुलै, २०२१

कराड : शिंदेवाडीत गोवा बनावटीची दारू जप्त

कराड : शिंदेवाडीत गोवा बनावटीची दारू जप्त 

कुमजाई पर्व प्रतिनिधी : मनोज सावंत 

कराड दि.18 : तालुक्यातील शिंदेंवाडी गावाच्या हद्दीत कराड -ढेबेवाडी मार्गावर असलेल्या समर्थ मंगल कार्यालया समोर उभ्या असलेल्या टाटा ट्रक मधून राज्य उत्पादन शुल्क विभागाने गोवा बनावटीच्या दारूचे 21 बॉक्स जप्त केले आहेत ट्रक आणि मिळालेला दारूसाठा असा एकूण 16 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 ही कारवाई आज रविवार दि.18 रोजी करण्यात आली.गाडीच्या चालकाविरोधात (बयाजी तुकाराम साळुंखे वय. 65 वर्षे रा.कदमवाडी कुठरे ,ता.पाटण ) गुन्हा दाखल करून अटक केली आहे  ट्रक ताब्यात घेण्यात आला आहे. ही कारवाई निरीक्षक आर. एस. पाटील,दुय्यम निरीक्षक आर. एस. माने,एस.बी.जंगम,जवान व्ही.व्ही.बनसोडे,बी.एस. माळी,महिला जवान आर.के.काळोखे यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

*यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार 2026 जाहीर*यशवंतराव चव्हाण फाउंडेशन, मुंबई चा उपक्रम*मा.सौ. आनंदीबाई दत्तात्रय शिंगारे आदर्श माता म्हणून विशेष सन्मान*

मुंबई - यशवंतराव चव्हाण फाउंडेशन, मुंबई यांच्या वतीने सामाजिक, सहकार ,संस्कृती ,साहित्य ,कला , पत्रकारिता, वैद्यकीय सेवा , क्रीड...