पाटण: सावली प्रतिष्ठान, चिखलेवाडी ( कुंभारगाव) या सामाजिक ग्रुपच्या माध्यमातून जिल्हा परिषद चिचांबा माटेकरवाडी शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
सावली प्रतिष्ठान, चिखलेवाडी हा सामाजिक ग्रुप अनेक सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर आहे. या ग्रुपच्या माध्यमातून अनेक शैक्षणिक आणि सामाजिक आजपर्यंत उपक्रम राबवले आहेत. याप्रसंगी मुख्याध्यापक श्री अधिक देसाई सर, श्री सुनील वायचळ सर, श्री विक्रम वरेकर फौजी, श्री विनोद वायचाळ फौजी, श्री किशोर मोरे, सर्व शिक्षक, शिक्षिका, आणि ग्रामस्थ उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री. अनिल वायचळ, श्री एकनाथ पाटील सर, विक्रम वरेकर (फौजी), प्रमोद मोरे, रवींद्र माटेकर, अरुण मोरे (फौजी), मंगेश माटेकर, श्री रवींद्र काटे, श्री संतोष धडम, जालिंदर यादव, संदीप चिखले (फौजी) यांनी परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा