न झालेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर
मुंबई, 16 जुलै: दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षा होऊ शकल्या नाहीत. तरी विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल तयार करुन हाच निकाल आज ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे. शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील निकालासंदर्भातली माहिती दिली आहे.
यंदाची निकालाची टक्केवारी 99.95 टक्के आहे. कोकण विभागाचा सर्वाधिक 100 टक्के निकाल लागला असून सर्वात कमी निकाल नागपूर जिल्ह्याचा लागला आहे.
निकालात पुन्हा मुलींनी बाजी मारली आहे. विद्यार्थिनी पुन्हा अव्वल असून मुलींच्या निकालाची टक्केवारी 99.96% इतकी आहे. मुलांची टक्केवारी 99.94% असून राज्यातील 22 हजार 384 शाळांचा निकाल 100 % लागला आहे.
6922 विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवले असून 9 शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे. 27 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 97.84 टक्के लागला आहे.
परीक्षा निकालाची प्रक्रिया सगळीच नवीन असून तरीही वेळेत काम पूर्ण झालंय ,सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेतली असल्याची प्रतिक्रिया दिनकर पाटील दिली आहे. तसंच श्रेणी सुधारण्यासाठी विद्यार्थ्यांना संधी मिळणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं.
असा तपासा 10 वीचा निकाल
निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर http: //result.mh-ssc.ac.in आणि mahahssc board.in जा
SSC BOARD RESULT या पर्यायावर क्लिक करा.
या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचा सीट नंबर टाइप करा. सीट नंबर स्पेसशिवाय टाइप करा.
आईच्या नावाची पहिली तीन अक्षर टाका.
लगेचच तुम्हाला तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
तुम्हाला तो निकाल डाऊनलोड करता येणार आहे. विद्यार्थी संदर्भासाठी निकालाचे प्रिंटआउटही काढू शकणार आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा