शुक्रवार, १६ जुलै, २०२१

*विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते 31 रुग्णवाहिकांचे लोकार्पण*

*विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते  31 रुग्णवाहिकांचे लोकार्पण*
सातारा दि.16 : जिल्हा परिषदेने 14 व्या वित्त आयोगातून खरेदी केलेल्या 31 रुग्णवाहिकांचे लोकार्पण आज विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले.
येथील अण्णासाहेब कल्याणी विद्यालयाच्या प्रांगणात  झालेल्या या कार्यक्रमास पालकमंत्री बाळसाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार दिपक चव्हाण, आमदार महेश शिंदे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदिप विधाते, कृषी सभापती मंगेश धुमाळ आदी उपस्थित होते.
*ग्रामीण भागातील रुग्णांना मिळणार दिलासा*
*- पालकमंत्री बाळासाहेब पाटील* 
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका मिळावी ही मागणी अनेक वर्षांची होती. शासनाच्या सहकार्याने जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी 31 रुग्णवाहिका मिळाल्या आहेत. यामुळे रुग्णांना लवकरात लवकर उपचार मिळणार असून या रुग्णवाहिकांमुळे निश्चित ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

*यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार 2026 जाहीर*यशवंतराव चव्हाण फाउंडेशन, मुंबई चा उपक्रम*मा.सौ. आनंदीबाई दत्तात्रय शिंगारे आदर्श माता म्हणून विशेष सन्मान*

मुंबई - यशवंतराव चव्हाण फाउंडेशन, मुंबई यांच्या वतीने सामाजिक, सहकार ,संस्कृती ,साहित्य ,कला , पत्रकारिता, वैद्यकीय सेवा , क्रीड...