कुंभारगाव ता.पाटण : कोरोना संसर्गजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कुंभारगावांत दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे.गावातील एकंदर परिस्थितीच्या अनुषंगाने कोरोना साखळी तुटावी म्हणून ग्रामपंचायत प्रशासनाने संपूर्ण गावांमध्ये शनिवार दि.10 जुलै पासून 7 दिवसाचा जनता कर्फ्यू घोषित करून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले होते. मागील संसर्गजन्य काळामध्ये अनेक वेळा शासनाच्या आवाहनाला जनतेने प्रतिसाद देऊन बंद पाळला होता. त्याचीच पुनरावृत्ती व्हावी असे ग्रामपंचायत प्रशासनाला अभिप्रेत असताना कुंभारगावमध्ये मात्र मंगळवारी रात्री अज्ञात व्यक्तींना कुंपण लावून बंद केलेले रस्ते कुंपण तोडून मोकळे केले त्यावर कहर म्हणजे त्यावरील फलक सुद्धा काढून फेकून देऊन जनता कर्फ्यूला खो घालण्याचा प्रयत्न केला.सदर घटनेची दखल घेऊन ग्रामपंचायतीच्या वतीने ढेबेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे कुंपण तोडून टाकणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ह्या घटनेमुळे संपूर्ण गावाला वेठीस धरले जात आहे.सामान्य गावकऱ्यांची काही चूक नसताना त्यांची किंमत मोजावी लागली नाही तर देव पावला असंच काहीसं म्हणावं लागेल. ज्यांनी कोणी हे कृत्य केलं आहे त्याला गावातील सुजाण नागरिक माप करणार नाही हे मात्र नक्की.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकार, वैद्यकीय अधिकारी, पोलिस प्रशासन आणि महसूल विभाग आपले कर्तव्य चोख बजावत आहे. मात्र, कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनासोबत कुंभारगावातील नागरिकांचीही तितकीच जबाबदारी आहे. भविष्यात कोरोनाला अटकाव घालायचा असेल तर प्रत्येकाने जबाबदारी स्वीकारून आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे.-सौ.सारिका पाटणकर (सरपंच -कुंभारगाव)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा