बुधवार, ३१ मार्च, २०२१

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे महाविकास आघाडीवरील प्रभुत्व कमी झाल्याने आणि मला डावलल्याने मी शिवसेना सोडली - नरेंद्र पाटील

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे महाविकास आघाडीवरील प्रभुत्व कमी झाल्याने आणि मला डावलल्याने मी शिवसेना सोडली - नरेंद्र पाटील


सातारा | महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर उद्धव ठाकरे यांचे महाविकास आघाडीवरील प्रभुत्व कमी झाल.मला मोकळ्या मनाप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करावं म्हणून मी शिवसेना सोडून भाजपात प्रवेश केला.माथाडी कामगार संघटनेच्या संघटनेची मीटिंग असो किंवा मराठा आरक्षण संदर्भाचा विषय असो यातून मला जाणीवपूर्वक डावलले जात होते, असे अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केला आहे.

मराठा समाजाच्या आरक्षण समितीच्या अध्यक्षपदावरून बदलून एकनाथ शिंदेंना आणा अशी माझी भूमिका होती,मला जाणीवपूर्वक शिवसेनेकडून डावलण्यात येत होतं,त्यामुळे माझी घुसमट होत होती.त्यामुळेच मी भाजपात प्रवेश केला आहे असा खुलासा अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केला.

सातारा जिल्ह्यातील 383 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित ; 3 बाधितांचा मृत्यु

सातारा जिल्ह्यातील 383 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित ; 3 बाधितांचा मृत्यु
 सातारा दि.31: जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 383 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 3 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये 

सातारा तालुक्यातील सातारा 18, करंजे 4, आसनगाव 1, आसवडी 1, खेड 11, गोडोली 9, कोडोली 2, संभाजीनगर 1, सदरबझार 3, जैतापूर 1,  शाहुपुरी 2, मंगळवार पेठ 5, सोनगाव 1, विकासनगर 6, गुरुवार पेठ 1, शाहुनगर 2, शिवथर 2, तारगाव 2, वासोळे 1, कारंडवाडी 1, कोंढवे 2, माची पेठ 1,  गेंडामाळ 5, पानमळेवाडी 1, शनिवार पेठ 3, कृष्णानगर 1, सैदापूर 1, सोमवार पेठ 1, हुमगाव 1, अंगापूर 1, शिरंबे 1, निनाम पाडळी 1, सांबरवाडी 1, रामाचा गोट 1, क्षेत्र माहुली 1, बेबलेवाडी 1, ठोसेघर 1, कुपर कॉलनी 1, तामाजाईनगर 1, कळंबे 3, सोनगाव 1,  
कराड तालुक्यातील कराड 3, चोरे 1, मुंडे 1, काले 1, पार्ले 2, सोमवार पेठ 1, मंगळवार पेठ 1, शेनोली 1, विद्यानगर 1, मसूर 2, सैदापूर 1, कर्वे 1, तारुख 1, आगाशिवगनर 2,     
 पाटण तालुक्यातील पाटण 1,  ढेबेवाडी 1, वजराशी 1, मिसरे 1, तारळे 2, सदा व्हागापुर 1, ढेबेवाडी 1, खोजावडे 1, 

फलटण तालुक्यातील फलटण 4, रविवार पेठ 2, भडकमकरनगर 2, जाधववाडी 7, बोडकेवाडी 2, आसु 3, धुळदेव 1,  कोळकी 2, रांजणी 1, मलटण 7, जिंती 1, भिलकटी 1,शुक्रवार पेठ 3, तरडगाव 1, निंभोरे 1, साखरवाडी 2, कसबा पेठ 2, निंबळक 1, ओढले 1, लक्ष्मीनगर 4, मारवाड पेठ 1,  सुरवडी 1, सांगवी 2, बरड 2, निरगुडी 1, जावली 1, ठाकुरकी 1, नरसोबानगर 1,  बसाप्पाचीवाडी 1, पवार वस्ती 1, ढवळ 1,      
खटाव तालुक्यातीलनिमसोड 1, भुरकवाडी 1, खटाव 2, कोकराळे 1, पाडेगाव 1, वडूज 2, कातरखटाव 1, गणेशवाडी 1, वर्धनगड 1, मायणी 1, बुध 1, पुसेगाव 2, रेवलकरवाडी 1, त्रिमाली 1, गोरेगाव वांगी 1,  
माण तालुक्यातीलकारखील 1, कुक्कुडवाड 1, दहिवडी 3, गोंदवले 1, म्हसवड 1, 
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 10, भाडळे 1, एकंबे 1, सातारा रोड 1, पिंपोडे बु 2, कुमठे 2, अपशिंगे 1, आसरे 3, त्रिपुटी 1, अनपटवाडी 1, रुई 1, दहिगाव 2, सोनके 1, वाठार स्टेशन 1,       
खंडाळा तालुक्यातील खंडाळा 6,  बावडा 1,  म्हावशी 7, आसवली 2, अहिरे 1, लोणंद 6, शिरवळ 9, लोणी 2, तळेकरवस्ती 1,सांगवी 3,  नायगाव 1, बोरी 1, 
वाई तालुक्यातील वाई 5, खडकी 1, भुईंज 1, ओझर्डे 2, गणपती आळी 2, बावधन 1, सह्याद्रीनगर 1, धोम 1, पसरणी 2, आंब्रळ 2, चांदक 2, वेळे 4, ब्राम्हणशाही 1, रविवार पेठ 1, 
महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 9,  पाचगणी 7, भिलार 4, तळदेव 1, 
जावली तालुक्यातील भिवडी 2, मालचौंडी 1, निझरे 1, माते खुर्द बु 2, कुसुंबी 1, मेढा 2, कारंडी 2, मुरा 1, कुडाळ 2, भुतेघर 1, सायगाव 1, आनेवाडी 1, चोरांबे 2, सरताळे 1, रुईघर 1,      
इतर 5, खेड बु 1, अटके 1, आलेवाडी 1, पांडेवाडी 1, सणबुर 1, येरफळे 1, सोनगाव 1, बोरेगाव 1, हडको कॉलनी 1, डांगेघर 1,   खबालवाडी 1, नांदवळ 1, कोळे सबणबुर 1,    
बाहेरील जिल्ह्यातील येटगाव ता. कडेगाव 1, वाळवा 1, निरा 3, पुरंदर 1, इस्लामपूर 1, कोल्हापूर 1, खडकी पुणे 1, कडेगाव 1,   
3 बाधितांचा मृत्यु
 स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे वाई येथील 51 वर्षीय पुरुष, गोपुज ता. खटाव येथील 55 वर्षीय महिला व झोरे ता. जावली येथील 80 वर्षीय पुरुष अशा एकूण 3 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
   
एकूण नमुने -404270
एकूण बाधित -65542  
घरी सोडण्यात आलेले -59997  
मृत्यू -1906 
उपचारार्थ रुग्ण-3639

ढेबेवाडी : गावठी बॉम्बने रानडुकराची शिकार करणारी टोळी गजाआड

ढेबेवाडी : गावठी बॉम्बने रानडुकराची शिकार करणारी टोळी गजाआड 
ढेबेवाडी दि.31 : गावठी बॉम्बच्या सहाय्याने रानडुकराची शिकार केल्याप्रकरणी ढेबेवाडी वनक्षेत्रातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी सोमवारी रात्री रवले येथील पाटीलवाडी फाट्याजवळ शिकारीचा मुद्देमाल आणि एका चारचाकी वाहनासह कोल्हापूरच्या तिघांसह 4 जणांना अटक केली. एक संशयित फरारी झाल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली आहे. वनाधिकारी व कर्मचार्‍यांनी संबधित वाहनाचा मालक राजाराम गंगाराम गिजे, गणेश सोमा परबते, मारूती निवृत्ती पवार (सर्व रा. नवेपारगांव, कोल्हापूर) व ते ज्याचाकडे पाहुणे म्हणून आले होते तो पाहुणा तुकाराम ज्ञानू साळुंखे (रा.रूवले ता.पाटण) अशा चौघांना ताब्यात घेतले.एक संशयित फरार झाला आहे. त्याचा शोध सुरू आहे.

याबाबत ढेबेवाडी वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार ढेबेवाडी वनपरिक्षेत्रात अधिकारी व कर्मचारी 29 मार्च रोजी रात्री गस्त घाल असताना रात्री 2.00 च्या सुमारास सणबूर-रूवले रस्त्यावर पाटीलवाडी फाटा येथे वन्यजीव तपासणी नाक्यावर मारूती स्विफ्ट कार (MH. 02 DA 1373) ची तपासणी करता गाडीच्या डिकीत प्लास्टिकच्या गोणीत डोके फुटलेल्या अवस्थेतील रान डुकराचा मांसलभाग आढळून आला.

गाडीत दोन इसम बसलेले होते. दोघांना वाहनांसह ताब्यात घेऊन अधिक चौकशी करता संबधित गाडी नवेपारगांव ता.हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर येथील असल्याचे सांगण्यात आले. शिकार्‍यांनी फासेपारद्याकडून कापडी व प्लास्टिकचे बॉम्ब तयार करून घेतले होते. त्याचा रवले येथील वन्यजीव तपासणी नाक्या समोरच्या खासगी क्षेत्रातील माती बंधार्‍या जवळ वापर करण्यात आला.

रानडुकराच्या तोंडात या बॉम्बचा स्फोट झाला. त्यामुळे जबडा फाटला व डोके फुटल्याने मृत्यू झाला. नंतर त्याचे मटण वाटून घेतले. संबधित गाडीतील इसमानी दिलेल्या माहितीनुसार यात आणखी तिघांचा सहभाग होता. मटण घेऊन दोघे गाडीतून नवे पारगांवला निघाले होते. यावरून शिकारीत पाच जणांचा सहभाग होता हे स्पष्ट झाले.

वरील संशितांनी शिकार केल्याचे कबूल केले आहे. त्यांच्यावर भारतीय वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 कलम 9,39,44,48 (1) 51 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याकामी सहाय्यक वनसंरक्षक सुदाम कांबळे, पाटणचे वन अधिकारी विलास काळे, वनपाल सुभाष राऊत, सुभाष पाटील, डी.डी.बोडके, पन्हाळे, जयवंत बेंद्रे व वनमजूरांनी परिश्रम घेतले. ढेबेवाडी वनविभागा मार्फत पुढील तपास सुरु आहे.

मंगळवार, ३० मार्च, २०२१

पाटण : बोगस लॅब कोविड रुग्णाच्या जीवाशी खेळ : हजारो रुग्णांची झाली फसवणूक

पाटण :  बोगस लॅब कोविड रुग्णाच्या जीवाशी खेळ : हजारो रुग्णांची झाली फसवणूक

पाटण दि.30 कोरोनाच्या नावाखाली सर्वत्र लूट सुरू असताना  पाटण मध्ये कोविड अवैध रक्तचाचणी केंद्र उघड करण्यात पोलिसांना यश आले. याबाबत एकास अटक केली आहे तर पेशाने डॉक्टर असलेली व्यक्ती फरार झाली आहे.

याबाबत माहिती अशी की, पाटण तालुक्यातील नवसरी येथील दत्तात्रय उडुगडे यांना थकवा जाणवत होता. ते डॉ वनारसे दवाखान्यात उपचारासाठी गेले.तिथे त्यांची तपासणी केल्यानंतर रक्त व इतर आवश्यक अन्य चाचणी करण्यासाठी उडुगडे यांना यशवंत पॉथॉलॉजी लॅब मध्ये पाठविण्यात आले होते. तिथे उडुगडे यांची कोविड ची लक्षणे दिसतात असे सांगितले तसेच पाटण तालुक्यातील मरळी येथील कोविड केंद्रात त्वरित दाखल व्हावे असा सल्ला दिला होता.परंतु, उडुगडे यांच्या नातेवाईकांनी सातारा ला उपचार करण्याचे ठरविले साताऱ्यात उडुगडे यांची काळजी पूर्वक तपासणी केली असता कोविड नसल्याचे स्पष्ट झाले.

ही घटना जानेवारी महिन्यात घडली होती. तेव्हा त्याची लेखी तक्रार दाखल करून कारवाई ची मागणी केली असता दोन महिन्यांनंतर लॅब अवैध असल्याची बाब पुढे आली आहे. लॅब मालक अनिल बाबुराव इनामदार रा .तांबवे ता कराड व डॉ उदय राजाराम वनारसे रा.मल्हार पेठ, पाटण यांच्या विरोधात पोलिसांनी पुरावे गोळा करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. यामध्ये इनामदाराला अटक केली असून डॉ वनारसे फरार झाला आहे.सध्या लॅब सील केली असून अनेक रुग्णांनी चाचणी अहवाल घेण्यासाठी पैसे खर्च केले आहेत. त्यांचे पैसे परत मिळेपर्यंत आरोपींना जामीन मंजूर करू नये अशी मागणी रुग्णाच्या नातेवाईकानीं केली आहे.आजून अशाप्रकारचे कितीतरी लॅब असण्याची शक्यता नाकारता येत नाही प्रशासनाने यांची माहिती घेऊन कारवाई करावी आणि सामान्य माणसाची होणारी लूट थांबवावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.



कराड : पुन्हा लॉकडाउन केल्यास बुडणाऱ्या रोजगाराची भरपाई सरकारने रोख रकमेद्वारे थेट लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात जमा करावी – श्री पृथ्वीराज चव्हाण

कराड : पुन्हा लॉकडाउन केल्यास बुडणाऱ्या रोजगाराची भरपाई सरकारने रोख रकमेद्वारे थेट लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात जमा करावी – श्री पृथ्वीराज चव्हाण 

३० मार्च | कराड 
राज्यात कोरोना बाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. २०२० मध्ये आढळून आलेल्या रुग्णसंख्येपेक्षा अधिक रुग्ण दरदिवशी राज्यात सापडत आहेत. विदर्भातील अमरावती आणि नागपूरपासून सुरू झालेली कोरोनाची ही दुसरी लाट (?) मुंबई-पुण्यासह, मराठवाडा आणि राज्याच्या इतर भागात वेगाने पसरत आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा लॉकडाउन करावे की कसे यावर प्रशासन, वैद्यकीय तज्ञ, उद्योग क्षेत्रातील व्यक्ती आणि सामान्य जनता यांमधून वेगवेगळे मतप्रवाह पुढे येत आहेत. महाराष्ट्रात उद्योजक असो किंवा वैद्यकीय तज्ञ प्रत्येकजण निडरपणे आपले मत मांडू शकतो ही आश्वासक बाब असली तरीदेखील शासनासमोर मात्र गंभीर पेचप्रसंग आहे. परिणामी राज्य पातळीवर लॉकडाऊनची अपरिहार्यता निर्माण झाल्यास खालील बाबी विचारात घेणे आवश्यक आहे. 

● लॉकडाउनची अंमलबजावणी करण्याआधी सर्वसामान्य जनतेला पूर्वसूचना देणे. 
● लॉकडाउनचा कालावधी कमीत-कमी ठेवणे. 
● या दरम्यान बुडणाऱ्या रोजगाराची भरपाई सरकारने रोख रकमेद्वारे थेट लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात जमा करणे (पाश्चिमात्य  देशांप्रमाणे). यासाठी प्रसंगी आमदार व खासदार स्थानिक विकास निधीचा वापर करणे. 
● खाजगी वाहनातून प्रवासास मुभा देणे. 
● शेतमाल तसेच इतर औद्योगिक मालाची वाहतूक चालु ठेऊन पुरवठा साखळीवर परिणाम होऊ न देणे.  
● लसीकरणाचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढवणे.     

केंद्र सरकारने गेली वर्षी मार्च मध्ये अचानकपणे कोणतेही नियोजन न करता लॉकडाउन घोषित केले होते. सारासार विचार न करता घेतलेल्या या निर्णयाचा मोठा फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला बसला व भारतातील ३ कोटींहून अधिक लोक दारिद्र्य रेषेखाली ढकलले गेले. त्यामुळे जनतेला विश्वासात घेऊन अर्थव्यवस्थेचे कमीत-कमी नुकसान होईल आणि कोरोना संसर्गाची साखळी मोडण्यास मदत ठरेल अशा प्रकारे लॉकडाउनचे नियोजन करणे आवश्यक आहे.

फलटण ते लोणंद मार्गे पुण्याकडे जाणा-या डेमू ट्रेनला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले

फलटण ते लोणंद मार्गे पुण्याकडे जाणा-या डेमू ट्रेनला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले

श्री प्रकाश जावडेकर, पर्यावरण, वन व हवामान बदल, माहिती व प्रसारण, अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री, भारत सरकार यांनी दि. ३०.३.२०२१ रोजी नवी दिल्लीहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे फलटण ते लोणंदमार्गे पुणे या डेमू ट्रेनला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले.
 
श्री शामराव ऊर्फ बाळासाहेब पाटील, सहकार व पणन मंत्री महाराष्ट्र शासन तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री;  श्री. रणजितसिंह नाईक निंबाळकर, माननीय खासदार (लोकसभा), श्री गिरीश बापट, माननीय खासदार (लोकसभा), श्री. श्रीनिवास पाटील, माननीय खासदार (लोकसभा), श्री छत्रपती उदयनराजे भोसले, माननीय खासदार (राज्यसभा), श्री चंद्रकांत (दादा) पाटील, श्री सुनील कांबळे, माननीय आमदार आणि श्रीमती नीता नेवासे, नगराध्यक्षा, फलटण या प्रसंगी व्हिडिओ लिंकद्वारे सामील झाल्या.  श्री. सुनीत शर्मा, अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी, कार्यकारी अधिकारी, रेल्वे बोर्ड;   श्री पुनेंदू मिश्रा, सदस्य (परीचालन व व्यवसाय विकास -ओ अँड बी डी), रेल्वे बोर्ड, नवी दिल्लीहून सामील झाले.  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री संजीव मित्तल यांनी स्वागत केले.

श्री प्रकाश जावडेकर यावेळी बोलताना म्हणाले की, माननीय रेल्वे, वाणिज्य व उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री श्री पीयूष गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वेमध्ये व्यापक बदल दिसतात.  बायो-टॉयलेट्सच्या परिचयामुळे ट्रॅक आणि स्टेशन प्लॅटफॉर्म स्वच्छ झाले आहेत.  स्वच्छ भारत यांचे हे एक आदर्श उदाहरण आहे.

 रेल्वेमंत्री म्हणून श्री पीयूष गोयल यांच्या नेतृत्वात आयआरसीटीसीवरील आरक्षणामुळे प्रवाशांना तिकिटे जलद मिळण्यास मदत झाली असेही त्यांनी नमूद केले.  सर्वोच्च मानकाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी मानवरहित रेल्वेमार्ग क्रॉसिंगचे उच्चाटन, विद्युतीकरणाची प्रगती, रेल्वे मार्गांचे दुहेरीकरण,  रेल्वेची बंदर कनेक्टिव्हिटी या पायाभूत सुविधांमुळे अर्थव्यवस्था व विकासाला चालना मिळाली आहे.  ५००० हून अधिक रेल्वे स्थानकांत वाय-फाय प्रदान करण्यात आले आहेत, ज्यामुळे प्रवाशांना वर्ल्ड वाईड वेबवर जाता येईल आणि त्यांचे ज्ञानाचे क्षितिज उघडले जाईल.

 फलटण-पुणे डेमू ट्रेन : पार्श्वभूमी
फलटण ते पुण्यादरम्यान लोणंद मार्गे रेल्वेगाडी सुरू झाल्याने या भागातील लोकांना आणि शेतक-यांना नवीन बाजारपेठेत पोहोचण्यास, विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या शैक्षणिक संस्थांमध्ये आणि कामगारांना अधिक रोजगार मिळण्यास मदत होईल.

रेल्वे सर्वात स्वस्त वाहतुकीचा मार्ग आहे आणि पुणे ते फलटण दरम्यान लोणंदमार्गे थेट संपर्क असणे या प्रदेशासाठी एक वरदान ठरणार आहे.

यामुळे फलटणमधील रहिवाशांना फलटण ते पुणे आणि परत अशी थेट प्रवासी रेल्वे कनेक्टीवीटी मिळेल.
 

तळमावले : सौ.सुमन डाकवे यांना स्पंदन-नारीरत्न पुरस्कार प्रदान

तळमावले : सौ.सुमन डाकवे यांना स्पंदन-नारीरत्न पुरस्कार प्रदान

तळमावले/वार्ताहर
भांडूप येथे वास्तव्यास असलेल्या सौ.सुमन विठ्ठल डाकवे यांना स्पंदन-नारीरत्न पुरस्कार-2021 देवून स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट च्यावतीने सन्मानित करण्यात आले. सदर पुरस्कार वितरणप्रसंगी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डाॅ.संदीप डाकवे, सचिव सौ.रेश्मा डाकवे, सौ.गयाबाई डाकवे, राजाराम डाकवे, विठ्ठल डाकवे, चि.स्पंदन डाकवे व अन्य मान्यवर उपस्थित होते. आकर्षक सन्मानपत्र, स्पंदन दिनदर्शिका, शाल असे या पुरस्काराचे स्वरुप होते.
सौ.सुमन डाकवे यांनी अंगणवाडी च्या माध्यमातून कोरोना काळात उल्लेखनीय स्वरुपाची कामगिरी केली होती. तसेच अनेक विधायक उपक्रमदेखील राबवले होते. या कामामुळे त्यांनी भांडूप मध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे त्यांना पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट च्यावतीने ‘स्पंदन-नारीरत्न पुरस्कार 2021’ देवून सन्मानित करण्यात आले. नावीण्यपूर्ण उपक्रमासाठी स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट नेहमीच अग्रेसर आहे.
सौ.सुमन डाकवे यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.

सातारा : 191 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; एका बाधिताचा मृत्यु

सातारा : 191 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; एका बाधिताचा मृत्यु
सातारा दि. 30 : जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 191 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून एका बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये

  सातारा तालुक्यातील सातारा 4, अपशिंगे 1, खेड 3, गडकर आळी 2, जकातवाडी 1, देगाव रोड 1, विसावा नाका 1, नुने 1, सदरबझार 4, राधिका रोड 2, देगाव 1, करंजे 1, सासुर्वे 1, अंभेखरी 1, खिंडवाडी 1, संगमनगर 1, मालदन 1, सदाशिव पेठ 1, कृष्णानगर 3, गोडोली 2, मिताल 1, मंगळवार पेठ 1, शुक्रवार पेठ 1, सोमवार पेठ 1,  केसरकर पेठ 1, अतित 1, गेंडामाळ 1, वडूथ 1, कोडोली 1, शाहुनगर 1, साई कॉलनी 1,कोंढवे 1,काशिळ 1.     

पाटण तालुक्यातील पाटण 1, ढेबेवाडी 1, गव्हानवाडी 1, माजगाव 5.  

  कराड तालुक्यातीलकराड 2, सोमवार पेठ 1, शुक्रवार पेठ 1, विद्यानगर 1, आगाशिवनगर 2, पाल 1, मलकापूर 3,  तांबवे 1, कोळेवाडी 2, जाखीनवाडी 1, शनिवार पेठ 5,पवार वस्ती 1,  मंगळवार पेठ 3, गुरुवार पेठ 1, शेरे 1,  सैदापूर 3, वहागाव 1,गोळेश्वर 1, काले 1, पार्ले 1.  

 फलटण तालुक्यातील बिरदेवनगर 1, शिवाजीनगर 1, लक्ष्मीनगर 2, तरडगाव 1, कोळकी 1, जिंती 2, गिरवी 1, नांदल 1, जाधववाडी 3, बारसर गल्ली 1, बुधवार पेठ 1, भडकमकरनगर 1, मलटण 2, खुंटे 1,  संजीवराजे नगर 1, फडतरवाडी 1, सोमवार पेठ 1, साखरवाडी 2, शुक्रवार पेठ 1, नरसोबा नगर 1, गुणवरे 1, काळज 1, सरडे 1, आलगुडेवाडी 1, पाचबत्ती चौक 1, सालपे 1, गोखळी 1.
 खटाव तालुक्यातील पुसेसावळी 4, बुध 2,पुसेगाव 1, चितळी 1,वडूज 3, गोरेगाव वांगी 1.    
 माण तालुक्यातीलबोराटवाडी 1, दहिवडी 1,  गोंदवले खु 1, शिंगणापूर 1, घेरेवाडी 1, पळशी 3.  
 कोरेगाव तालुक्यातील ल्हासुर्णे 1, शिरढोण 1, कोरेगाव 6, किरोली वाठार 1.   
वाई तालुक्यातीलगणपती आळी 3, सोनगिरवाडी 2, रविवार पेठ 1, गंगापुरी 1, सिद्धनाथवाडी 1, धर्मपुरी 1, फुलेनगर 1, वाई 2, यशवंतनगर 1, बावधन 1, भुईंज 1, एकसळ 1.  
खंडाळा तालुक्यातील लोणंद 5, शिरवळ 2, विंग 1, खंडाळा 1.   
जावली तालुक्यातील जावली 1. 
 महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 4, मेटगुट 1.  
*इतर*1, खार्शी 1. 
बाहेरील जिल्ह्यातील शेडगेवाडी ता. शिराळा 1,   सांगली 3, मिरज 1, बोंबाळेवाडी 1, पलूस 1,  कोपरगाव जि. अहमदनगर 1. 
  1 बाधितांचा मृत्यु
 स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे कोरेगाव येथील 65 वर्षीय कोविड बाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
        
 
*एकूण नमुने -402823 *
एकूण बाधित -65153 
घरी सोडण्यात आलेले -59846 
मृत्यू -1903
उपचारार्थ रुग्ण-3404
                                                      

काळगाव :धामणीतील युवकाचा प्रामाणिकपणा आय फोन 5 केला परत

काळगाव :धामणीतील युवकाचा प्रामाणिकपणा आय फोन 5 केला परत 
प्रतिनिधी / मनोज सावंत
धामणी ता.पाटण, दि.28 मार्च  : धामणी गावातील एका युवकाचा प्रामाणिकपणा अधोरेखीत करणारा एक प्रसंग  28 मार्च रोजी सकाळी चांदोली धरण परिसरात घडला. रस्त्यात सापडलेला महागडा आय 
फोन 5 मोबाईल युवकाने मुळ मालकाचा शोध घेऊन त्याला परत केला. रोहित रघुनाथ पवार रा.धामणी असे या प्रामाणिक युवकाचे नाव आहे.

यासंदर्भातील मिळालेल्या माहितीनुसार रोहित पवार हे चांदोली धरण परिसरात फिरायला गेले असता तिथे रस्त्यावर एक महागडा आय फोन 5 मोबाईल पडलेला दिसला त्यांनी फोन घेतला तर तो लॉक केलेला होता त्यानंतर त्यांनी फोन खोलून सिमकार्ड काढून दुसऱ्या फोनमध्ये टाकून त्यातील नंबरवर फोन करून फोनच्या मालकाचा शोध घेतला असता फोन चे मालक विनायक पवार रा.नांदगाव ता.कराड हे असल्याचे निष्पन्न झाले,

 विनायक पवार यांना कराड येथे बोलवून  ओळख पटवून सदरचा मोबाईल त्यांना परत देण्यात आला रोहित पवार ह्यांच्या प्रामाणिकपणा बद्दल त्याचे परिसरात कौतुक होत आहे.




कोळेवाडी : विजेचा धक्का लागून वायरमन गंभीर जखमी

कोळेवाडी : विजेचा धक्का लागून वायरमन गंभीर जखमी

कोळेवाडी ता.कराड दि .30 विजेच्या खांबावर काम करीत असताना विजेचा धक्का लागून वायरमन गंभीर जखमी झाल्याची दुर्देवी घटना आणे गाव ता.कराड येथे सोमवारी सकाळी १०.३० च्या सुमारास घडली.

इंद्रजित थोरात (वय 24 रा.चचेगाव ता.कराड) असे जखमी वायरमनचे नाव आहे या घटनेची सविस्तर माहिती अशी की कोळेवाडी सबस्टेशन मधील झालेला बिघाड दुरुस्ती करण्यासाठी आणे गावातील विजेच्या खांबावर काम करायचे होते तेव्हा थोरात यांनी कोळेवाडी येथील एक फिडर बंद करून आणे येथील खांबावरती काम करीत असताना विजेचा धक्का लागला कारण ज्या खांबावर काम करायचे होते त्याच खांबावरती तांबवे सबस्टेशन येथून येणारा वीजपुरवठा चालू होता, रिंगफिडींग असल्याचे स्थानिक कर्मचाऱ्याला माहिती नसल्याने ही घटना घडली या अपघातात थोरात गंभीर जखमी झाले असून त्याना उपचारासाठी कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे त्यांची प्रकृती स्थिर आहे असे डॉक्टरांनी सांगितले.



 

सोमवार, २९ मार्च, २०२१

तळमावले : ढेबेवाडी परिसरात संचारबंदीला उत्स्फूर्त प्रतिसाद

तळमावले : ढेबेवाडी परिसरात संचारबंदीला उत्स्फूर्त प्रतिसाद

फोटो:अनिल देसाई कुंभारगाव

तळमावले दि.२९ सातारा जिल्ह्यात कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेता, रविवार, २८ मार्चपासून जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे त्याला ढेबेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.दररोज रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहणार असल्याचा आदेश जिल्हाधिकारी यांनी शनिवारी दिला. त्यानुसार संचारबंदीच्या कालावधीत मुक्त संचार करण्यास मनाई करण्यात आली आहे.

जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असून, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे दिलेल्या निर्देशान्वये आणि जिल्ह्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, जिल्ह्यात रात्रीची जमावबंदी व संचारबंदी रविवार, २८ मार्चपासून लागू करण्यात आली आहे.

दररोज रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहणार असून, संचारबंदीच्या कालावधीत अत्यावश्यक आणि जीवनाश्यक सेवा आणि कर्तव्यावरील व्यक्तींव्यतिरिक्त इतर व्यक्तींना बाहेर फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. संचारबंदीच्या आदेशाची ढेबेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून, बाहेर फिरणाऱ्यांविरुध्द कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे स.पो.नि.संतोष पवार यांनी "कुमजाई पर्व" बोलताना सांगितले.


सातारा : 474 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 4 बाधितांचा मृत्यु

सातारा : 474 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 4 बाधितांचा मृत्यु

 सातारा दि. 29 : जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 474 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 4 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये

  सातारा तालुक्यातील  सातारा 23, शुक्रवार पेठ 2, शनिवार पेठ 3, सोमवार पेठ 1, गुरुवार पेठ 1, चिमणपुरा पेठ 5, व्यंकटपुरा पेठ 1, यादोगोपाळ पेठ 1, विकास नगर 1, पंताचा गोट 1, रामाचा गोट 1, संभाजीनगर 2, गडकर आळी 1, कूपर कॉलनी 1, केसरकर पेठ 2, सदरबझार 9, शाहुपुरी 3, गोडोली 4, कोडोली 1, सैनिक स्कूल 1, देशमुख कॉलनी 1, विराटनगर 1, शाहुनगर 6,  एमआयडीसी 1, मोळाचा ओढा 1, संगमनगर 1,  सुधाकर नगर 1, उत्तेकर नगर 1, दहिगाव 3, वनवासवाडी 1, जाखणगाव 2, खेड 1, पाडळी 2, करंजपूर 1,  राजापुरी  1, नवघरवाडी 1,वासोळे 1, मार्ढे 1, पाटेघर 4, चिंपणेर वंदन 2, वर्णे 1, खेड 1, वेखणवाडी 2, तळबीड 1, बोरखळ 1, अबदानवाडी 1, लवंघर 1, जैतापूर चिंचणेर 1, धनकवडी सातारा रोड 1, कळंबे 1.

पाटण तालुक्यातील पाटण 2, जंगमवाडी 2, शिंदेवाडी 1, चोपदरवाडी 4, अडुळ 1, मार्ली 1, जानुगडेवाडी 3, तामीने 2, निसरे 2, वरेकरवाडी 2, गुढे 1,  भोसगाव 2, मुरुड 5, गोरेवाडी 1. 

  कराड तालुक्यातील कराड 2,  सोमवार पेठ 1, मंगळवार पेठ 1, शुक्रवार पेठ 1, राजाराम नगर 1, विद्यानगर 1, मलकापूर 4,  तांबवे 1, घोगाव 1, रेठरे खु 2, चरेगाव 1,  उंब्रज 1, तारुख 1, कासारशिरंभे 3, जुळेवाडी 4, मसूर 2, पाल 3, कोळेवाडी 1. 
  
 फलटण तालुक्यातील  फलटण 2, शुक्रवार पेठ 1, पद्मावती नगर 1, मेटकरी गल्ली 1, मलठण 1,  लक्ष्मीनगर 1, नरसोबा नगर 2, अक्षतनगर कोळकी 1, आदर्की खुर्द 1, अरडगाव 1, हिंगणगाव 1, कांबळेश्वर 1, विढणी 1, वडगाव 2, रावडी 1,  राजुरी 1, सांगवी 2, निंबळक 1, शिंदेवाडी 1, कोळकी 2, चौधरवाडी 1, वाठार निंबाळकर 2. 
 खटाव तालुक्यातील  खटाव 3, पुसेगाव 1, वडूज 11, येराळवाडी 2, शिरसवाडे 1, अंबवडे 1, होळीचागाव 4, तुपेवाडी 1, भुरुकवाडी 6, नेर 1, रैवळकरवाडी 1, भोसरे 3, त्रिमली 1, अंभेरी 1, औंध 5, नांदोशी 1,  बुध 2, नागनाथवाडी 1, मायणी 2, ढोकळवाडी 5, चोर्डे 1, फडतरवाडी 1, पुसेसावळी 4, वडगाव 4, पळशी 1, गिरीजाशंकरवाडी 1, लोणी 4, धारपुडी 1, कातरखटाव 1, तडावळ 1, गणेशवाडी 2, येळमरवाडी 3, गुरसाळे 1, लांडेवाडी 1, ललगुण 1, पुसेगाव 2. 
 माण तालुक्यातील   शिंगणापूर 1, दहिवडी 9, पांगरी 3, श्रीतव 1, राजवडी 1, बिजवडी 3, झाशी 1, गोंदवले खुर्द 2, किरकसाल 1, दिवड 1, हिंगणी 1, म्हसवड 2, कालचौंडी 1, पळशी 1, मोही 1. 
 कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 8, वाठार स्टेशन 9, बेलेवाडी 1, रहिमतपूर 1, कणेरखेड 1, करंजखोप 1, भोसे 1, मोरबेंड 1, रणदुल्‌लाबाद 3, वाठार बु 1, देऊर 4, तालीये 2,  पळशी 1, दुधानवाडी पळशी 3, ल्हासुर्णे 2,  सोळशी 1, शिवांबे 1, खामकरवाडी 1, मोरेबेंड 1. 
वाई तालुक्यातील वाई 3, गंगापुरी 1, रविवार पेठ 1, शेंदूरजणे 4,  बावधन 7, धर्मपुरी 1, पांडेवाडी 4, म्हाटेकरवाडी 2, उंबारवाडी 1, आसरे 1, नागेवाडी 1, वेळे 1,  सतालेवाडी 3, अंभेरी 1, भुईंज 4, ओझर्डे 1, पिराचीवाडी 1, जोशीविहीर 1, केंजळ 1, वासोळे 1, वाघजाईवाडी खटेकरवाडी 1.
खंडाळा तालुक्यातील  खंडाळा 3, लोणंद 1, शिरवळ 4, अजुनज 1, वाहगाव 1, नायगाव 1, मिरजेवाडी 1.  
जावली तालुक्यातील अलेवाडी 3, कारंडी 5, सोनगाव 1, हाटगेघर 1, विरार 1, भणंग 1, निझरे 1, मोरघर 3, सायगाव 1, रायगाव 1, रांगणेघर 1, रेंगडी 2, भोगावली 8, पिंपळी 2, 
 महाबळेश्वर तालुक्यातील  महाबळेश्वर 5, नावके 1, खिंगार 7, गोदावली 4, डांगेघर 2, अंब्रळ 1, चर्तुबेट 4,  गुरुघर गौताड 1,  भेकवली 1, पाचगणी 3, बिरवडी 1, चोरारी तळदेव 1, माचूतार 1, 
इतर  2. 
बाहेरील जिल्ह्यातील किनी 1 (कोल्हापूर), येडेमच्छिंद्र 1, बत्तीसशिराळा 1, पुणे 1, चांभारली मोहोपाडा(रत्नागिरी)1, कोंढवा (पुणे)1.
  4 बाधितांचा मृत्यु
        जिल्हा रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये दुधणेवाडी, ता. कोरेगाव येथील 59 वर्षीय पुरुष, भीमनगर ता. फलटण येथील 60 वर्षीय पुरुष व जिल्ह्यातील विविध खाजगी कोविड रुग्णालयामध्ये सांगवी ता. खंडाळा येथील 75 वर्षीय महिला, लोणंद ता. खंडाळा येथील 72 वर्षीय पुरुष असे एकूण  4 बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला असल्याची माहितीही डॉ. चव्हाण यांनी दिली आहे.
 
एकूण नमुने - 402154
एकूण बाधित - 64968 
घरी सोडण्यात आलेले - 59543 
मृत्यू - 1902
उपचारार्थ रुग्ण- 3523
                                                        

धक्कादायक ! * कोरोना बधितांचा लपवून उरकला अंतविधी विंगात खळबळ*

धक्कादायक 
कोरोना बधितांचा लपवून उरकला अंतविधी विंगात खळबळ
विंग/प्रतिनिधी
विंग(ता.कराड)घरात पाय घसरून पडल्याने आराम मिळावा म्हणुन लोणंदला (ता.खंडाळा) लेकीने नेलेल्या विंग येथील एका ७८ वर्षीय वयोवृध्द महिलेला लोणंदमध्ये कोरोनाची बाधा झाली. पुढील उपचारासाठी तिला कोरोना हॉस्पीटल नेताना तिचा वाटेतच मृत्यु झाला. हा प्रकार नातेवाईकांनी लपवून विंगला आणुन तिच्यावरअंत्यसंस्कार  केल्याने एकच खळबळ उडाली आहे. खबरदारी म्हणून नातेवाईक व अंत्यविधीला उपस्थीत ४० जणांची कोरोना चाचणी आरोग्य विभागाने केली असून त्यात एका लहान मुलीसह तीन पुरूष अन्य एक महिला कोरोना बाधीत आढळली आहे. चार महिन्यानंतर कोरोनाने विंगात पुन्हा शिरकाव त्यामुळे केला असून विंगमध्ये धाकधूक आणखी वाढली आहे.याबाबत कोळे प्राथमिक आरोग्य विभागाकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी, विंग (ता. कराड) येथील ७८ वर्षिय वयोवृध्द महिला मागील आठवड्यात घरात घसरून पडली, तेव्हा त्या जखमी झाली. वृध्देला आराम मिळावा म्हणून तिच्या लेकीने उपचारासाठी तिला लोणंद (ता. खंडाळा) येथील एका खाजगी रूग्णालयात उपचार दिले. संशयित म्हणून स्वॅब तपासणी केली  असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला रूग्णाची हालत बघून तेथील डॉक्टरानी पुढील उपचारासाठी कोव्हीड रूग्णालयात हालवण्यास सांगितले. तेंव्हा नातेवाईकानीं आम्ही सातारा येथील रूग्णालयात पुढील उपचारासाठी घेेेऊन जातो असे सांगितले त्यानंतर त्यांनी खाजगी रुग्णवाहिका करून सातारा येथे येण्यासाठी निघाले दरम्यान प्रवासात वयोवृध्द महिलेची प्रकृती खालावली आणि वाटेतच तिचा मृत्यु झाला सोमवारी रात्री उशीरा घटना घडली.वृध्देचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी ही बाब मात्र लपवली. खाजगी रूग्णवाहिकेतून मृतदेह मुळगावी विंग येथे आणला. तिच्यावर मंगळवारी दि.23 सकाळी 10 वा.विधीवत अंत्यसंस्कार केले.तद्नंतर लोणंद मधील रुग्णालयातुन ही माहिती सातारा आरोग्य विभागाला कळवण्यात आली सातारा मधून ही माहिती कराड आणि कराड मधून कोळे येथे माहिती समजली .त्यानंतर कोळे येथील आरोग्य विभागाने घेतलेल्या माहितीनंतर ती कोरोना बाधित असल्याचे बुधवारी दि.24 मार्चला समजले. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. नातेवाईकानी ही बाब का लपवली, असा अरोप आरोग्य विभागाने केला आहे. प्रशासनाला गाफील का ठेवले, असा प्रश्न केला आहे. विशेष म्हणजे त्या मृत महिलेची लेक लोणंद येथे आशा सेविका म्हणून कार्यरत आहे.
प्रशासनासह अंत्यसंस्काराला उपस्थीत सर्वाची झोपच त्यामुळे उडाली आहे. प्रतिबंध म्हणून प्रशासनाने गुरूवारी दि.26 मार्चला कोळे प्राथमीक केंद्राअंतर्गत अर्टिफिशीअर कॅम्प येथे घेतला. त्यात ४० जणांची टेस्ट केली.

नातेवाईकासह विधीला उपस्थीत ग्रामस्थांचा समावेश त्यात केला होता. त्यामध्ये एक ९ वर्षाची लहान मुलगी एक महिलेसह अन्य तीन पुरूष बाधीत आढळले आहेत. पुरूषात एका ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा समावेश आहे. गावात अन्य दोन ठिकाणी एक महिला व पुरूष बाधित व्यक्ती सापडल्या असून एकूण संख्या आता ७ झाली आहे. असे कोळे आरोग्य विभागाने माहिती देताना सांगितले. त्यामुळे पेच अणखी वाढला आहे. तब्बल चार महिन्यानंतर गावात कोरोनाने शिरकाव केल्याने आरोग्य विभाग अणि प्रशासनापुढे पेच अणखी वाढला आहे. यावेळी कोळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ.सुप्रिया बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.अर्चना यादव समुह आरोग्य अधिकारी  श्री. शेवाळे श्री.जाधव श्री. इनामदार श्री. ठेंगे श्रीमती जाधव श्री जाधव लॅब टेक्निशियन गटप्रवर्तक श्रीमती वैशाली पवार सर्व आशासेविका उपस्थित होत्या.

----------------------------------

त्या परिसरात प्रतिबंधात्मक उपायोजना हाती घेतल्या आहेत. त्यासाठी स्थानिक प्रशासन अणखी सतर्क झाले आहे येत्या दोन दिवसात 30 किंवा 31 मार्चला पुन्हा कोळे आरोग्य केंद्राअंतर्गत अर्टिफिशीअर कॅम्प घेतला जाणार आहे. - डॉ.सुप्रिया बनकर (आरोग्य अधिकारी कोळे)

तळमावले : कोरोना हे मानव जातीवरील मोठे संकट आहे - डॉ.उमेश गोंजारी

तळमावले : कोरोना हे मानव जातीवरील मोठे संकट आहे - डॉ.उमेश गोंजारी
तळमावले, 28 मार्च :- कोरोनाची लाट पुन्हा दुसर्‍यांदा आली असून अनेक ठिकाणी रुग्ण संख्या वाढत आहे. पाटण तालुक्यात तळमावले प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परीसरात ही वाढणारी रुग्ण संख्या अत्यंत चिंताजनक असून नागरिकांनी निष्काळजीपणा न करता गर्दी टाळत,सोशल डिस्टनचे पालन करावे. मास्कचा वापर करून स्वत:ची काळजी घ्यावी म्हणजे आपली व आपल्या परिवार कोरोना पासून सुरक्षित राहील असे प्रतिपादन प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी  डॉ.उमेश गोंजारी व डाॅ.मंगेश खबाले यांनी केले.

कोरोना हे मानव जातीवरील मोठे संकट आहे, मागील कोरोनाची लाट  रोखण्यात प्रशासनाला यश आले.मात्र नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे कोरोनाची दुसरी लाट आली आहे.आणि रुग्ण संख्या झपाट्याने वाढली. वाढलेली रुग्णसंख्या अत्यंत चिंताजनक आहे.कोरोनाचे नवीन रूपही भयंकर आहे.म्हणून प्रत्येकाने काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.मास्कचा वापर,वेळोवेळी हात धुणे,सोशल डिस्टन्स पाळणे याचबरोबर गर्दी टाळणे ही गरजेचे आहे. ग्रामीण भागात दुकानदारांनी आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरु नये. काही लक्षणे आढळल्यास तातडीने उपचार करुन घ्यावे. याचबरोबर  आत्ता  लसीकरणला सुरवात झाली असून  1 एप्रिल पासून 45 वर्षावरील नागरीकांनी लस घ्यावी. कारण यामुळे शरीरात रोग प्रतिकार शक्ती वाढत असून त्याचा कोरोना रोखण्यासाठी मोठा लाभ होणार आहे. प्रत्येक गावातील आशासेविका ,आंगणवाडी सेविका यांनी जागरूक पणे आपल्या गावातील जेष्ठ नागरिकांना लसीकरणासाठी जागृती केली पाहिजे.कोरोना रोखणे हे सर्वांचे कर्तव्य आहे यावेळी. प्राथमिक आरोग्य केंद्र  तळमावले चे वैद्यकीय अधिकारी डॉ.उमेश  गोंजारी व डॉ.मंगेश खबाले,आरोग्य सेवक ,आरोग्य कर्मचारी,उपस्थित होते


 
 

रविवार, २८ मार्च, २०२१

*सातारा : जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले 15 एप्रिल पर्यंत कलम 144 चे सुधारीत आदेश*

*सातारा : जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले 15 एप्रिल पर्यंत कलम 144 चे सुधारीत आदेश*

सातारा दि.28 : कोविड 19 च्या अनुषंगाने राज्य शासनाने दिनांक 27 मार्च 2021रोजी दिलेल्या सुधारीत सुचनेनुसार जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सातारा जिल्ह्यात 15 एप्रिल 2021 पर्यंत क्रिमीनल प्रोसिजर कोड 1973  चे कलम 144 नुसार सुधारीत आदेश जारी केले आहेत. हे आदेश 15 एप्रिल रोजीच्या रात्री 24 वाजेपर्यंत पुढीलप्रमाणे लागू राहतील.
I) *सातारा जिल्हा कार्यक्षेत्रात खालील बाबींना मनाई करणेत येत आहेत*
1) सातारा जिल्हयात रात्रीचे 08.00 वाजलेपासून ते सकाळी 07.00 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करणेत येत आहे. तथापि, राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक व अत्यावश्यक सेवा चालू राहतील. 
2) इयत्ता 9 वी पर्यंत सर्व वर्ग (निवासी शाळा वगळून), प्रशिक्षण संस्था, कोचिंग इन्सिटयुट, कॉम्प्युटर व टायपिंग इन्सिटयुट बंद राहतील. तथापी, निवासी शाळा, वसतीगृह, आश्रमशाळा, विशेषता आंतरराष्ट्रीय विदयार्थ्यांचे वसतीगृह, इयत्ता 10 वी व त्यापुढील सर्व वर्ग, महाविदयालये,  शैक्षणिक संस्था चालू ठेवणेस परवानगी असेल.  ऑनलाईन/ दुरस्थ शिक्षणास परवानगी राहील.  ऑनलाईन शिक्षण आणि संबंधित कार्यासाठी शाळेत 50 टक्के शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना परवानगी राहील. त्यासाठी  शिक्षण विभागाने, आरोग्य व सुरक्षीततेबाबत निर्धारित केले आदर्श कार्य प्रणाली (SOP) चे पालन करणे बंधनकारक राहील.  
राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था, औदयोगिक प्रशिक्षण उपक्रम (आयटीआय), राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ किंवा राज्य कौशल्य विकास मंडळ किंवा भारत सरकार किंवा महाराष्ट्र सरकारच्या इतर मंत्रालयामध्ये, नोंदणीकृत अल्पकालीन प्रशिक्षण केंद्रांमध्ये कौशल्य किंवा उदयोजकता प्रशिक्षण घेणेस परवानगी राहील. राष्ट्रीय उद्योजकता आणि लघु व्यवसाय विकास संस्था (NIESBUD), भारतीय उदयोजक संस्था आणि त्यांचे प्रशिक्षण प्रदाते यांना देखील परवानगी राहील. त्यासाठी आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयाने निर्धारित केलेल्या आदर्श कार्य प्रणाली (SOP) चे पालन करणे बंधनकारक राहील. 
उच्च शिक्षण संस्थामध्ये ऑनलाईन/ दुरस्थ शिक्षण हे प्राधान्यप्राप्त अध्यापनाचे साधन असेल आणि त्यास प्रोत्साहित केले जाईल. तथापी, केवळ उच्च शिक्षण संस्था (पी.एच.डी.) आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रवाहातील पदव्युत्तर विदयार्थ्यांसाठी प्रयोगशाळेतील/प्रयोगात्मक कामांसाठी परवानगी राहील.  केंद्रीय वित्तपुरवठा उच्च शिक्षणासाठी संस्था, संस्था प्रमुख यांची स्वत:ची खात्री झाले नंतरच प्रयोगशाळा / प्रयोगात्मक कामांसाठी विदयार्थांना बोलवणेस परवानगी राहील.   इतर सर्व उच्च शैक्षणिक संस्था उदा. राज्य विदयापीठे, खाजगी विदयापीठे, इत्यादी, ते केवळ संशोधन अभ्यासक (पी.एच.डी.) आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानातील पदव्युत्तर विदयार्थ्यांसाठी प्रयोगशाळेतील/ प्रायोगिक कामासाठी परवानगी राहील. 
सर्व सरकारी आणि खाजगी ग्रंथालयांना सामाजिक अंतर व स्वच्छतेचे पालन करून काम करणेची परवानगी राहील. यशदा, वनमती, मित्र, एमईआरआय इत्यादी विविध सरकारी ऑफलाईन प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांना कंटेनमेंट झोनच्या बाहेरील भागात उघडण्यास परवानगी असेल. संबंधित प्रशासकीय विभागामार्फत निर्गमित प्रमाणित कार्यप्रणाली (एसओपी) चे पालन करणे संबंधितांवर बंधनकारक असेल.
3)  रेल्वे व विमान प्रवासी वाहतूक काही ठराविक आदेशाने मान्यता दिली असलेस किंवा आदर्श कार्यप्रणालीनुसार चालू राहील.
4) सर्व सामाजिक, राजकिय, शैक्षणिक, धार्मिक कार्यक्रम (यात्रा/जत्रा इत्यादी) तसेच मोठया संख्येने लोक जमा होणारे कार्यक्रम, परिषदा तसेच सभा मंडप, मोकळया जागेत होणारे इतर कार्यक्रम बंद राहतील. याबाबत उल्लंघन झालेस शासनाचे दिनांक 15 मार्च 2021 व 17 मार्च 2021 चे आदेशातील तरतुदीनुसार, जोपर्यत केंद्र शासनाचे आपत्ती व्यवस्थापनाकडून कोविड- 19 साथीचा रोग आटोक्यात आलेचे जाहिर होत नाही., तोपर्यत संबंधित मालमत्ता बंद राहील.
5) सार्वजनिक ठिकाणी दारू, पान, तंबाखु इत्यादी सेवन करणेस मनाई करणेत येत आहे.
6) पाच पेक्षा जास्त व्यक्तींना, रात्रीचे 8.00 वाजलेपासून ते सकाळी 7.00 वाजेपर्यत एकत्र येणेस मनाई करणेत येत आहे. 
7) शासकीय कार्यालयामध्ये गर्दी कमी करण्यासाठी, लोकप्रतिनिधी व्यतिरीक्त इतर अभ्यंगतांना बैठकीसाठी बोलविल्याशिवाय तसेच  तातडीच्या कामाव्यतिरीक्त येणेस मनाई करणेत येत आहे.

II) *सातारा जिल्हा कार्यक्षेत्रातील खालील बाबींना परवानगी राहील*
1) मॉल, हॉटेल, फुड कोर्ट्स, रेस्टॉरंट्स आणि बार यांना 50 टक्के पेक्षा जास्त नाही, इतक्या क्षमतेने सकाळी 07.00 ते रात्री 08.00 या कालावधीतच चालू ठेवणेस परवानगी देत आहे. तसेच याच कालावधीमध्ये घरपोच सुविधा चालू राहील. तथापि, पर्यटन विभागाने निर्धारित केलेली आदर्श कार्य प्रणाली (SOP) चे पालन करणे बंधनकारक राहील. याबाबत उल्लंघन झालेस शासनाचे दिनांक 15 मार्च 2021 व 17 मार्च 2021 चे आदेशातील तरतुदीनुसार, जोपर्यत केंद्र शासनाचे आपत्ती व्यवस्थापनाकडून कोविड- 19 साथीचा रोग आटोक्यात आलेचे जाहिर होत नाही., तोपर्यत बंद राहील.
2) कन्टेनमेंट झोन बाहेरील क्षेत्रात सिनेमा हॉल/थिएटर/मल्टिप्लेक्स/ नाटक थिएटर हे आसनाच्या 50% क्षमतेने सकाळी 7.00 ते सायंकाळी 8.00 या कालावधीतच चालू राहील. यामध्ये कोणत्याही खाण्यायोग्य वस्तुंना परवानगी दिली जाणार नाही. त्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग माहिती व प्रसारण मंत्रालय यांनी निर्धारित केलेल्या आदर्श कार्य प्रणाली (SOP) चे पालन करणे बंधनकारक राहील. याबाबत उल्लंघन झालेस शासनाचे दिनांक 15 मार्च 2021 व 17 मार्च 2021 चे आदेशातील तरतुदीनुसार, जोपर्यत केंद्र शासनाचे आपत्ती व्यवस्थापनाकडून कोविड- 19 साथीचा रोग आटोक्यात आलेचे जाहिर होत नाही तोपर्यत बंद राहील.
3) सातारा जिल्हयातील प्रतिबंधित क्षेत्रामध्ये कोणतेही कार्यक्रम आयोजीत करणेस मनाई आहे. तथापि, प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर क्षेत्रात खुले लॉन, विना वातानुकूलित मंगल कार्यालय/हॉल/सभागृह, घर व घराच्या परिसरात 50 लोकांच्या (संपुर्ण कार्यक्रमासाठी भटजी, वाजंत्री, स्वयंपाकी/वाढपी इ. सह) मर्यादेत लग्नाशी संबंधित मेळावे/ समारंभाचे आयोजन करणेकामी संबंधित तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांची परवानगी घेणे बंधनकारक राहील. तसेच जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सातारा यांचेकडील आदेश क्र.नैआ/कावि/437/2021 दि. 02/03/2021 मधील अटी व शर्तींचे पालन करणे संबंधितांवर बंधनकारक राहील. याबाबत उल्लंघन झालेस संबंधित व्यवस्थापन यांचेकडून प्रथम वेळी रक्कम रुपये 25000/- दंड तसेच दुसऱ्या वेळी भंग झालेस रक्कम रुपये 1,00,000/- व फौजदारी कारवाई करुन,  शासनाचे दिनांक 15 मार्च 2021 व 17 मार्च 2021 चे आदेशातील तरतुदीनुसार, जोपर्यत केंद्र शासनाचे आपत्ती व्यवस्थापनाकडून कोविड- 19 साथीचा रोग आटोक्यात आलेचे जाहिर होत नाही., तोपर्यत संबंधित मालमंत्ता बंद राहील. तसेच कार्यक्रम आयोजकांकडून रक्कम रुपये 10,000/-दंड व फौजदारी कारवाई करावी
4) उत्पादन क्षेत्र पुर्ण क्षमतेने कार्यरत राहू शकेल. तथापि संबंधित आस्थापना यांनी मास्कशिवाय तसेच थर्मल स्किनींग शिवाय प्रवेश न देणे, सॅनिटायझरचा वापर तसेच उत्पादनाच्या ठिकाणी त्यांचे कामगारामध्ये पुरेसे सामाजिक अंतर, कामाची पाळी बदलणेचे वेळी, जेवणाचे व इतर सुट्टीचे वेळी, कामावर येताना व कामावरुन सुटताना सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक आहे. याबाबत उल्लंघन झालेस शासनाचे दिनांक 15 मार्च 2021 व 17 मार्च 2021 चे आदेशातील तरतुदीनुसार, जोपर्यत केंद्र शासनाचे आपत्ती व्यवस्थापनाकडून कोविड- 19 साथीचा रोग आटोक्यात आलेचे जाहिर होत नाही., तोपर्यत संबंधित उत्पादक युनिट बंद राहील.
5) अंत्यविधी यासारख्या कार्यक्रमास 20 पर्यंत (संपुर्ण कार्यक्रमासाठी) व्यक्तींना सामाजिक अंतर ठेऊन कार्यक्रम करणेस परवानगी राहील. 
6) सर्व मार्केट/ दुकाने सकाळी 7.00 ते सायंकाळी 8.00 वा. या वेळेमध्ये चालु रहातील. तथापि, मेडीकल/औषधाची दुकाने पुर्णवेळ चालू ठेवणेस परवानगी राहील. जर पाच पेक्षा जास्त व्यक्ती दुकानात असल्यास अथवा सामाजिक अंतराचे पालन न केलेस तात्काळ बंद करावीत.
7) वृत्तपत्र छपाई आणि वाटप करणेस परवानगी देणेत येत आहे. (घरपोच वितरणासह)
8) कन्टेनमेंट झोन बाहेर, व्यवसायाच्या अनुषंगाने प्रदर्शनास परवानगी राहील. त्यासाठी औद्योगिक विभागाने निर्धारित केलेल्या आदर्श कार्य प्रणाली (SOP) चे पालन करणे बंधनकारक राहील. 
9) सातारा जिल्हयातील इंधन पंप, औदयोगिक आस्थापना व सर्व वैदयकीय आस्थापना तसेच अत्यावश्यक सेवा पुर्णवेळ चालू ठेवणेस परवानगी राहील. 
10) ऑक्सिजनची वाहतुक करणाऱ्या वाहनांना कोणत्याही वेळी राज्यांतर्गत तसेच राज्याबाहेर मुक्त हालचाल करण्यास परवानगी आहे. 
11) आरोग्य व अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व खाजगी कार्यालये 50 टक्के क्षमतेवर कार्यरत राहतील.शासकीय / निमशासकीय कार्यालयाच्या बाबतीत कार्यालय प्रमुखांनी कोविड -19 चे नियमाचे पालन करुन कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत निर्णय घेणेत यावा. 
12) कन्टेनमेंट झोन बाहेरील क्षेत्रात स्थनिक साप्ताहीक बाजार (जनावरांसह) उघडणेस परवानगी राहील. त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था यांनी निर्धारित केलेल्या आदर्श कार्य प्रणाली (SOP) चे पालन करणे बंधनकारक राहील.
13) राज्य व केंद्र शासनाने कोविड 19 बाबत ठरविलेल्या राजशिष्ठाचारानुसार सर्व रेल्वे यांना राज्यात सुरवात ते शेवट पर्यत प्रवास मुभा राहील.रेल्वेने रेल्वे स्थानकांवर येणाऱ्या प्रवाशांची आरोग्य तपासणी व मुद्रांकन करणेची आवश्यक नाही. तथापी कोविड- 19 च्या अनुषंगाने या प्रवाश्यांनी सामाजीक आंतर व स्वच्छतेचे पालन करणे आवश्यक आहे. 
14) केश कर्तनालय, स्पा, सलून, ब्युटी पार्लर हे शासनाने दिलेल्या अटी व शर्ती तसेच जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सातारा यांचेकडील आदेश क्र.नै.आ/कावि/1572/2020 दि. 27/06/2020 मधील अटी व शर्तीन्वये चालू ठेवणेस परवानगी देणेत येत आहे. 
15) सातारा जिल्हयातील सर्व सेतू केंद्र, महा-ई-सेवा केंद्र व आधारकेंद्र जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सातारा यांचेकडील आदेश क्र.नै.आ/कावि/1477/2020 दि. 11/06/2020 मधील अटी व शर्तीन्वये चालू ठेवणेस परवानगी राहील.
16) इंनडोअर हॉल मधील खेळाच्या सुविधा चालू करणेबाबत जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सातारा यांचेकडील आदेश क्र.नै.आ/कावि/2740/2020 दि. 19/10/2020 मधील अटी व शर्तीन्वये चालू ठेवणेस परवानगी राहील. 
17) सातारा जिल्हयातील व्यायामशाळा चालू करणेबाबत जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सातारा यांचेकडील आदेश क्र.नै.आ/कावि/2765-अ/2020 दि. 23/10/2020 मधील अटी व शर्तीन्वये चालू ठेवणेस परवानगी राहील. 
18) सातारा जिल्हयातील पर्यटन स्थळे खुली करण्याबाबत जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सातारा यांचेकडील आदेश क्र.नै.आ/कावि/2923/2020 दि. 04/11/2020 मधील अटी व शर्तीन्वये चालू ठेवणेस परवानगी राहील.
19) राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रिडापट्टूंच्या प्रशिक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या जलतरण तलावांना परवानगी देणेत येत आहे.  यासाठी क्रिडा व युवा व्यवहार विभागाकडून निर्धारित केलेल्या आदर्श कार्य प्रणाली (SOP) चे पालन करणे बंधनकारक राहील. 
20) कन्टेनमेंट झोन बाहेरील क्षेत्रात योग संस्था चालु करणेस परवानगी राहील. त्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग, भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग यांनी निर्धारित केलेल्या आदर्श कार्य प्रणाली (SOP) चे पालन करणे बंधनकारक राहील. 
21) बॅडमिंटन, टेनिस स्क्वॅश, इनडोअर शुटिंग रेंज इ. सर्व खेळांमध्ये शारिरीक व स्वच्छताविषयक पालन करुन चालु करणेस परवानगी राहील. 
22) धार्मिक स्थळांच्या ट्रस्ट/बोर्डाने/अधिकृत केलेल्या निर्णयानुसार कन्टेनमेंट झोन बाहेरील क्षेत्रातील सर्व धार्मिक स्थळे व प्रार्थना स्थळे सर्व सामान्यांसाठी चालू करणेत येत आहेत. तथापि, मा. मुख्य सचिव, महसूल व वनविभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनवर्सन, महाराष्ट्र शासन यांचेकडील आदेश क्र.डीएमयु/2020/सीआर.92/ डीआय एसएम-1 दि. 14/11/2020 अन्वये निर्गमित करणेत आलेल्या परिशिष्ट अ प्रमाणे निर्धारित केलेल्या आदर्श कार्य प्रणाली (SOP) चे पालन करणे बंधनकारक राहील.  तसेच, मास्कशिवाय प्रवेश न देणे. विश्वस्तांनी थर्मल स्किनींग केले शिवाय भाविकांना प्रवेश न देणे, सॅनिटायझरचा वापर करणे. धार्मिक स्थळे व प्रार्थना स्थळे परीसरातील उपलब्ध जागेचा विचार करुन, सामाजिक अंतराचे काटेकोरपणे पालन व्हावे यासाठी प्रतितास किती भाविकांना प्रवेश द्यावा याबाबतची निश्चिती करावी. शक्यतो दर्शनासाठी  ऑनलाईन आरक्षणाची सुविधा उपलब्ध करावी.
23) राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षण संस्था व क्रीडा स्पर्धा / बैठक/ खेळांचे आयोजन आणि विविध क्रीडा उपक्रमांसाठी विविध संस्था यांना कंटेनमेंट झोनच्या बाहेर काम करण्यास परवानगी असेल. यामध्ये राज्यातील विविध खेळांच्या स्पोर्टस ॲकॅडमीचा समावेश असेल. तसेच क्रीडा व युवा कार्य विभागामार्फत निर्गमित प्रमाणित कार्यप्रणाली (एसओपी) चे पालन करणे संबंधितांवर बंधनकारक राहील. 
24) गृह अलगीकरणास खालील प्रतिबंधास अधिन राहून परवानगी असेल.
1.गृह अलगीकरण झालेल्या नागरीक/रुग्णाविषयीची माहिती संबंधित स्थानिक प्राधिकरण यांना कळविणे. तसेच गृह अलगीकरण व्यक्ती ही कोणत्याही वैद्यकीय व्यावसायीकाच्या (डॉक्टर)  यांच्या देखरेखीखाली आहे याची देखील माहिती स्थानिक प्रशासनास देणे बंधनकारक आहे. 
2. कोविड -19 रुग्ण असलेल्या ठिकाणी सुरुवातीच्या दिवसापासून 14 दिवसांपर्यत दर्शनी ठिकाणी फलक लावावा, जेणेकरुन त्या ठिकाणी कोविड - 19 रुग्ण असलेची माहिती नागरीकांना होईल. 
3. कोविड -19 संक्रमित रुग्णांच्या हातावर गृह अलगीकरण (Home Quarantine)  असा शिक्का उमटवावा. 
4. कोविड -19 रुग्ण गृह अलगीकरण ठिकाणी संबंधित कुटुंबातील व्यक्तिंनीही कमीत कमी संपर्क ठेवावा.तसेच मास्क परिधान केलेशिवाय सदर ठिकाणी प्रवेश केला जाणार नाही,याची दक्षता घ्यावी
5. गृह अलगीकरणाचे कोणत्याही प्रकारचे उल्लंघन झालेस, कोविड -19 रुग्ण किंवा अलगीकरण झालेले नागरीक यांना स्थानिक प्रशासनाने सुरु केलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये (CCC) स्थलांतरीत करावे.  
25) RTPCR चाचण्यांचे प्रमाण विशेष प्रयत्न करुन 70 %पेक्षा अधिक प्रमाणात वाढविण्यात यावे.
26) कोविड-19 सकारात्मक व्यक्तिंचे संपर्क शोधणे - सकारात्मक चाचणी आलेल्या व्यक्तींचे तात्काळ अलगीकरण करणे, त्याचे संपर्क शोधुन काढून त्यांचे अलगीकरण करणे बंधनकारक असेल. अशा संपर्कातील व्यक्ती किंवा कोविड -19  बाधित रुग्णास गृह अलगीकरणासाठी स्वतंत्र व्यवस्था नसलेस संस्थात्मक अलगीकरणात राहणे बंधनकारक आहे. 
27) विहीत केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना, चाचण्या आणि रुग्ण संपर्क शोधणे याची काटेकोरपणे अंमलबजावणी करणेची जबाबदारी स्थानिक प्रशासन, पोलिस प्रशासन आणि नगरपालिका प्रशासनाची असेल.
28) मा. मुख्य सचिव, महसूल व वनविभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनवर्सन, महाराष्ट्र शासन यांनी वेळोवेळी पारित केलेले आदेशामध्ये नमूद केलेल्या सुचनांचे पालन करणे संबंधितांवर बंधनकारक राहील. तसेच अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,सातारा यांनी अन्य कोणत्याही विशिष्ट/सामान्य आदेशाव्दारे परवानगी देणेत आलेली कृती करणेस मुभा राहील.

III) *कोविड -19 चे व्यवस्थापनाच्या अनुषंगाने खालील राष्ट्रीय निर्देशांचे पालन करणे बंधनकारक असून पालन न झालेस दंडात्मक/फौजदारी कारवाईस पात्र राहील* 
1) सार्वजनीक ठिकाणी, घराबाहेर व घरामध्ये जेथे लोकांचा वावर आहे तेथे असताना चेह-याचे तोंडावर व नाकावर मास्कचा वापर न करणा-या व्यक्तींवर 500/- रु दंड आकारावा.
2) सातारा जिल्हयातील कोणत्याही सार्वजनिक अथवा ज्या ठिकाणी लोकांचा वावर जास्त प्रमाणात आहे अशा खाजगी जागेच्या ठिकाणी थूंकणेस मनाई असून, थुंकल्यास 1000/- रु दंड आकारावा
3) दुकानामध्ये प्रत्येक ग्राहकामध्ये किमान 6 फुट अंतर तसेच दुकानामध्ये एकावेळी 5 पेक्षा जास्त व्यक्तींना घेणेस मनाई करणेत येत आहे. सदर आदेशाचे उल्लंघन झालेस ग्रामीण भागासाठी र.रु.2000/- व शहरी भागासाठी र. रु. 3000/- दंड आकारावा. तसेच 7 दिवसापर्यत दुकान सक्तीने बंद करावे. सदर आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी स्थानिक स्वराज्य संस्थांनी करावी.
4) हॉटेल, रिसॉर्ट, लॉन्स, मंगल कार्यालय इत्यादी ठिकाणी आयोजीत करणेत आलेल्या कार्यक्रमाबाबत जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सातारा यांचेकडील आदेश क्र.नैआ/कावि/437/2021 दि. 02/03/2021 नुसार कार्यवाही करावी. 
5) जिल्हयात सार्वजनिक ठिकाणी, लोकांचा वावर असणाऱ्या खाजगी ठिकाणी तसेच वाहतुकीच्या साधनामध्ये सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक आहे. 
6) पाच पेक्षा जास्त व्यक्तींना, रात्रीचे 8.00 वाजलेपासून ते सकाळी 7.00 वाजेपर्यत एकत्र आल्यास प्रत्येकी रक्कम रुपये 1000/- दंड आकारावा.
7) बाग, उदयाने आणि करमणुकीच्या उददेशाने सार्वजनिक मोकळया जागा रात्री 08.00 ते सकाळी 7.00 वा या कालावधीत बंद राहतील. उल्लंघन करणाऱ्यावर प्रत्येकी 1000/- दंड आकारावा.
8) सार्वजनिक वाहतुक काही निर्बंधासह चालू करणेत आली आहे. निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यास रक्कम रुपये 500/- दंड आकारणेत येईल. सदर आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी उपप्रादेशिक परिवहन विभागाने करावी.

IV) *कामाच्या ठिकाणी खालील अतिरिक्त निर्देशांचे पालन करणे संबंधितांवर बंधनकारक राहील*
1) शक्य असेल त्या ठिकाणी घरातुन काम करण्यास प्राधान्य दयावे.
2) कामाच्या आणि व्यावसायाच्या वेळा या कार्यालयामध्ये, कामाच्या ठिकाणी मार्केटमध्ये, औद्योगिक तसेच व्यावसायीक आस्थापनेमध्ये गर्दी होणार नाही, अशा पद्धतीने विभागून दयाव्यात. THERMAL SACNNING, हॅडवॉश, सॅनिटायझर, याची ENTRY POINT व EXIT POINT वर व्यवस्था करावी.
3) कामाच्या ठिकाणी, सार्वजनिक उपयोगाच्या जागा व सामान्य माणसाच्या वापरात येणाऱ्या सर्व जागा व वस्तू यांचे वेळोवेळी सॅनिटायझेशन करणेत यावे.

V) *आरोग्य सेतु ॲप चा वापर* - जिल्हयातील सर्व नागरिकांना शासकीय कार्यालयात तसेच सर्व सार्वजनिक ठिकाणी आरोग्य सेतू या ॲपचा वापर करणे बंधनकारक राहील. तसेच हे ॲप व त्यावरील माहिती प्रत्येकाने वेळोवेळी अद्ययावत करणे बंधनकारक राहील.

VI) ज्या ठिकाणी कोरोना रुग्ण सापडतो, त्या ठिकाणी CONTAINMENT ZONE जाहिर करणेचे अधिकार INCIDENT COMMANDER म्हणून संबंधित उपविभागीय अधिकारी यांना देणेत आलेले आहेत. संबंधित CONTAINMENT ZONE बाबत उपविभागीय अधिकारी हे वेगळा आदेश काढून त्या Zone मध्ये कोणत्या बाबी चालु राहतील व कोणत्या बाबी प्रतिबंधित राहतील याबाबत सर्वाना सुचित करतील. हा आदेश CONTAINMENT ZONE वगळता सातारा जिल्हयातील इतर क्षेत्रासाठी लागू राहिल तसेच  CONTAINMENT ZONE बाबत त्या त्या क्षेत्रातील INCIDENT COMMANDER  यांचे अस्तित्वात असलेले आदेश हे संबंधित क्षेत्रात लागू राहतील. तसेच CONTAINMENT ZONE  INACTIVE झालेनंतर सदर क्षेत्राला इकडील आदेश लागू राहतील. तसेच भविष्यामध्ये जर सातारा जिल्हयातील कोणत्याही ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळतील त्या ठिकाणी संबंधित INCIDENT COMMANDER तथा उपविभागीय अधिकारी हे सदर ठिकाणी नव्याने CONTAINMENT ZONE जाहिर करुन वेगळा आदेश काढून त्या Zone मध्ये कोणत्या बाबी चालु राहतील व कोणत्या बाबी प्रतिबंधित राहतील याबाबत सर्वाना सुचित करतील.
*कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेला, सदर आदेशात कोणत्याही प्रकारचा बदल करून किंवा नवीन आदेश पारीत करून या आदेशाच्या विसंगत कोणताही आदेश, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सातारा यांचे पुर्व परवानगीशिवाय पारीत करता येणार नाही.* 
या आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधीतांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीतांचे विरुध्द मा. मुख्य सचिव, महसूल व वनविभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनवर्सन, महाराष्ट्र शासन यांचेकडील आदेश क्र.डीएमयु/2020/सीआर.92/डीआयएसएम-1 दि. 27/03/2021 मधील Annexure III मध्ये नमूद केलेप्रामणे आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ते 60, व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 नुसार तसेच भारतीय साथरोग अधिनियम 1897 अन्वये दंडनीय / कायदेशीर कारवाई संबंधित पोलीस अधिकारी/कर्मचारी यांनी करावी.

मुंबई : निर्बंधाचे काटेकोर पालन नसल्याने लॉकडाऊनबाबत नियोजन करा तातडीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश



  • टास्क फोर्सने व्यक्त केली मृत्यू वाढण्याची भीती
  • मंत्रालय, शासकीय कार्यालयांत अभ्यागतांना प्रवेश बंदीचेही निर्देश

मुंबई, दि. २८ : राज्यातील कोविड रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने होणाऱ्या वाढीमुळे बेड्स व इतर आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्याचे चित्र असून आज झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत लॉकडाऊनसारखे अतिशय कडक निर्बंध त्वरित लावण्यात यावेत, अशा सूचना देण्यात आल्या. यासंदर्भात आज आयोजित या महत्त्वाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे तसेच मुख्य सचिव सीताराम कुंटे, टास्क फोर्स डॉक्टर्स व प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निर्बंध आणि नियमांचे कडक पालन होणार नसेल तर येत्या काही दिवसांत संपूर्ण लॉकडाऊन लावून संसर्ग थोपवावा यावर चर्चा केली.यावेळी मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातील तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालयांतील अभ्यागतांना पूर्ण प्रवेशबंदी घालावी तसेच खासगी कार्यालये व आस्थापना 50 टक्के कर्मचारी संख्येचे निर्बंध पाळत नसतील तर लॉकडाऊनची तयारी करावी, अशा स्पष्ट सूचना बैठकीत दिल्या.

बेड्स, व्हेंटीलेटर कमी पडताहेत – मृत्यूंची संख्या वाढू शकते

या बैठकीच्या प्रारंभी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी राज्यातील अतिशय झपाट्याने वाढणाऱ्या संसर्गामुळे लवकरच सर्व महत्त्वाच्या आरोग्य सुविधांवर विशेषत: बेड्स, व्हेंटीलेटर, व ऑक्सिजनवर प्रचंड ताण येऊन त्या सर्वसामान्य रुग्णांना उपलब्ध होणार नाहीत अशी परिस्थिती असल्याचे निदर्शनास आणले.

ते म्हणाले की, सध्या ३ लाख ५७ हजार आयसोलेशन खाटापैकी १ लाख ७ हजार खाटा भरल्या आहेत आणि उर्वरित खाटा झपाट्याने भरल्या जात आहेत. ६० हजार ३४९ ऑक्सिजन खाटापैकी १२ हजार ७०१ खाटा, १९ हजार ९३० खाटापैकी ८ हजार ३४२ खाटा यापूर्वीच भरल्या गेल्या आहेत. ९ हजार ३० व्हेंटीलेटर्सपैकी १ हजार ८८१ वर रुग्णांना  ठेवण्यात आले आहे. काही जिल्ह्यांमध्ये तर खाटा उपलब्धच होत नसून संसर्ग वाढीच्या प्रमाणात सुविधाची क्षमता  कमी पडते आहे.

वेळीच चाचणी न केल्याचे गंभीर परिणाम दिसताहेत

गेल्या वर्षी १७ सप्टेंबर रोजी ३ लाख सक्रिय रुग्ण होते आणि ३१ हजार ३५१ मृत्यू झाले होते मात्र आता काल २७ मार्च रोजी ३ लाख ३ हजार ४७५ सक्रिय रुग्ण असून मृत्यूंची संख्या ५४ हजार ७३ झाल्याने चिंता वाढली आहे. विशेषत: संसर्ग वाढल्यास त्या प्रमाणात मृत्य वाढू शकतात आणि यामागे वेळेवर चाचणी न करून रुग्णालयांत भरती होण्यास उशीर करणे तसेच होम आयसोलेशनमध्ये असतानाही नियमांचे पालन न करणे ही कारणे असू शकतात, असेही टास्क फोर्सच्या डॉक्टर्सनी निदर्शनास आणले. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये एका दिवशी २४ हजार ६१९ रुग्ण आढळले होते. काल २७ मार्च रोजी एका दिवशी ३५ हजार ७२६ रुग्ण आढळले असून ही संख्या येत्या २४ तासांत ४० हजार झालेली असेल, अशीही माहिती आरोग्य विभागाने दिली.

लॉकडाऊनच्या दृष्टीने प्रशासनाने नियोजन करावे- मुख्यमंत्री

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट निर्देश दिले की, एकीकडे आपण कोविड परिस्थितीतही अर्थव्यवस्था सुरु राहील याचा आटोकाट प्रयत्न करतोय. मात्र अनेक घटक अजूनही ही गोष्ट गांभीर्याने घेत नाहीत. अजूनही खासगी कार्यालयातून उपस्थिती नियमांचे पालन होत नाही. विवाह समारंभ नियम तोडून सुरु आहेत, तसेच बाजारपेठांमध्ये देखील सुरक्षित अंतर, मास्क याचे पालन होताना दिसत नाही. शेवटी लोकांच्या आरोग्याचे संरक्षण करणे याला  आमचे प्राधान्य आहे. त्यामुळे अतिशय कठोरपणे नियमांचे पालन करावे अन्यथा लॉकडाऊन करावे लागेल असे समजून धान्य

पुरवठा, औषधी, अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सुविधा यांचे नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी मुख्य सचिवांना दिले.

ऑक्सिजन पुरवठा, खाटांचे प्रमाण त्वरेने वाढवा

गेल्या वर्षी आपण टप्प्याटप्प्याने सर्व आरोग्य सुविधा वाढवल्या, फिल्ड रुग्णालये उभारली पण आताच्या या संसर्गात या सुविधा कमी पडतील की काय अशी स्थिती निर्माण झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. व्हेंटीलेटर्स पुरेशा प्रमाणात उपलब्ध राहतील तसेच ऑक्सिजन उत्पादन ८० टक्के वैद्यकीय व २० टक्के इतर कारणांसाठी राखीव ठेवावे, रुग्णालयांतील खाटांच्या बाबतीत ८०:२० प्रमाणे अंमलबजावणी होते किंवा नाही व रुग्णांची गैरसोय होणार नाही हे पाहण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

ई आयसीयूचा मोठ्या प्रमाणावर सुलभतेने वापर होऊ शकतो त्यामुळे त्यादृष्टीने देखील आरोग्य विभागाने त्वरित पाऊले उचलावीत, असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

केवळ मुंबई, पुणे नाही तर उर्वरित ठिकाणीही सुविधा हवी

लोकांना कोरोनापेक्षा देखील आपली चाचणी पॉझिटिव्ह आली तर कुठल्याही विलगीकरण केंद्रात नेऊन टाकले जाईल व आपल्याला तिथे सुविधा मिळणार नाही अशी भीती आहे, ती त्वरित दूर करणे गरजेचे आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. ग्रामीण भागात सुविधा नसतील तर नजीकच्या शहरातील किंवा परिसरातील सुविधा मिळावी अशी व्यवस्था करा, तसेच केवळ मुंबई-पुणे यावर लक्ष केंद्रीत न करता राज्याच्या सर्व भागात विलगीकरण सुविधा तसेच आरोग्य सुविधा कमी पडणार नाही हे पाहण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

ई आयसीयूवर भर – आरोग्यमंत्री

यावेळी बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील ग्रामीण भागात रुग्णांचा आणि त्यांच्या संपर्काचा शोध अधिक गतिमान करण्याची गरज व्यक्त केली.  विशेषत: छोट्या शहरात आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे आव्हान असून ई आयसीयूवर भर देण्यासाठी पाऊले उचलण्यात येतील, असे सांगितले. महाराष्ट्रातील लसीकरण देशात चांगले असून ग्रामीण भागात उपलब्ध शीत साखळी वापरून उपकेंद्रांवर लसीकरण वाढवले तर अधिक वेग मिळेल असे सांगितले.

कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्ती उशिरा रुग्णालयांत पोहचत आहेत ही चिंतेची बाब आहे. अगदी  १० ते १८ वयोगटात देखील मोठ्या प्रमाणावर संसर्ग दिसत असून पुढील काळात तरुणांमध्ये देखील मृत्यूचे प्रमाण वाढू शकते अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

अर्थचक्र प्रभावित होणार नाही- मुख्य सचिव

यावेळी मुख्य सचिव सीताराम कुंटे म्हणाले की, महाराष्ट्रात लसीकरणाचा वेग समाधानकारक आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून चाचण्यांचे प्रमाणही चांगले झाले असल्याचे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले असून ज्याठिकाणी संसर्ग वाढ जास्त आहे तिथे लसीकरणाचा वेग वाढवण्याची सुचना त्यांनी केल्याचे ते म्हणाले. लॉकडाऊनचा निर्णय झाल्यास कोणताही गोंधळ उडू नये व समन्वय राहावा म्हणून योग्य त्या सुचना प्रशासनास देण्यात येत आहेत तसेच अर्थचक्रही प्रभावित होणार नाही त्याचे संतुलन ठेवण्यात येईल.

बैठकीतील निर्णय

  • मर्यादित दिवसांसाठी लॉकडाऊन लावावे. त्याची कार्यपद्धती ( एसओपी) मदत व पुनर्वसन प्रधान सचिव यांनी तयार करावी. जेणेकरून नियोजनबद्धरीतीने लॉकडाऊनची अंमलबजावणी करता येईल.
  • ऑक्सिजनची महत्त्वाची भूमिका असल्याने तो पुरेशा प्रमाणात उपलब्ध राहावा.
  • गृह विलगीकरण करण्यापेक्षा संस्थात्मक विलगीकरण करण्यावर भर द्यावा.
  • पुढे मृत्यू वाढू शकतील त्यामुळे ई आयसीयू,व्हेंटीलेटर्स पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवावे.
  • प्रशिक्षित वैद्यकीय मनुष्यबळ मिळण्यासाठी खासगी डॉक्टर्सची सेवा घ्यावी.
  • विशेषत: वृद्ध व सहव्याधी रुग्णांना प्राधान्याने उपचार मिळावेत.
  • सहव्याधी असलेल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम पद्धतीतून काम करू द्यावे.

काळगाव : धनगरवाडा परिसरात गव्याचे दर्शन.

 काळगाव : धनगरवाडा परिसरात गव्याचे दर्शन.

धामणी प्रतिनिधी / मनोज सावंत

काळगाव ता.पाटण : गुढे - पाचगणी रस्त्यावर धामणी येथील दिंडे महाराज आणि त्याचा साथीदार दुचाकी वरून सकाळी 11.30 वाजता कामानिमित्त जात होते तर त्यांना गवा दिसला त्यामुळे परीसरातील नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मनुष्य वस्तीच्या परिसरात गवा दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे

जंगल परिसरात राहणारा गवा मनुष्य वस्तीत घुसखोरी करत असल्याने नागरिकांतुन चिंता व्यक्त होत आहे.घाटरस्त्यावरून दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे.पोटासाठी अन्न शोधत असलेला गवा आता मानव वस्तीमध्ये वावरत आहेत त्यांचा ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी समस्त नागरिकांनी वन विभागाकडे केली आहे


*सातारा : 407 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; एका9 बाधिताचा मृत्यु*

*सातारा : 407 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; एका9 बाधिताचा मृत्यु*
 सातारा दि.28 : जिल्ह्यात काल शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 407 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून एका बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
*सातारा तालुक्यातील*  सातारा 6, शहरातील सोमवार पेठ 2, मंगळवार पेठ 2, बुधवार पेठ 3, शनिवार पेठ 2, रविवार पेठ 1, कोटेश्वर मंदिरजवळ  2, गडकर आळी 1, कल्याण सन्मित्र सोसायटी 1, कमानी हौदाजवळ 1, रामाचा गोट 1, शाहूपूरी 2, अमरलक्ष्मी 1 शिवम कॉलनी 1,  देवी कॉलनी 1, करंजे 1, सिव्हील 3, कांगा कॉलनी 2, विकासनगर 1, कल्परत्न सोसासटी 1, कोल्हटकर आळी 1,  देशमुखनगर 1, साईबाबा मंदिरजवळ 1, समर्थनगर 1, वनवासवाडी 1, प्रकाशनगर 2, झरेवाडी 1,  शेंद्रे 1, कोडोली 2, बोरखळ 2, शिवथर 1, सोनगाव 4, खोकडवाडी 1,  अपशिंगे 4, गणेशवाडी 2, कोंडवे 1, बसाप्पावाडी 1, कण्हेर 1, खोजेवाडी 12, शहापूर 4, निनामपाडळी 1, निवदे 1, नागठाणे 2, मल्हार पेठ 1,  आरडगाव 1, कोर्टी 1, कौंदणी 1, मोती चौक 2, वासोळे 1, वाढे 1, पाटेघर 5, देगाव 1, धावडशी 1, कुस बु. 1, मर्ढे 1, 

 *कराड तालुक्यातील*   कराड 4, शहरातील शुक्रवार पेठ 1, एकवीरा कॉलनी 1, शनिवार पेठ 4, गुरुवार पेठ 1, कार्वे नाका1, मंगळवार पेठ 1, मुंढे 2, रुक्मीणीगार्डनजवळ 1,  सोमवार पेठ 1, विद्यानगर 5, मलकापूर 1, आगाशिवनगर 6, पेरले 1, येणके 2, रेठरे बु.3, वहागाव 1, साबळेवाडी 1, कलंत्रेवाडी 1, आटके 1, शेरे 2, कोडोली 1, जुळेवाडी 1, खुडेवाडी 1, विंग 1

 *पाटण तालुक्यातील* उब्रंज-पाटण रोड 1,कडणे 1, माजगाव 1, आसलेवाडी 1, हंबराई 1, 

*फलटण तालुक्यातील*  फलटण 2, स्वामी विवेकानंदनगर 4, विडणी 5, निंभोरे 1, बरड 2, गुणवरे 4, मिरढे 2, शिंदेवाडी 1, तरडगाव 2, निरगुडी 1, कोळकी 9, सुरवडी 1, वडजल 4, दुधेभावी 2, पिंप्रद 2, गोखळी 1, राजाळे 3, माठाचीवाडी 1, वडले 1, साठेगाव 1, सरडे 2, हणूमंतवाडी 1, सोनवडी बु.1, सोनवडी खुर्द 1, जयवंतनगर 1, गिरवी 2, लक्ष्मीनगर 4, संगवी 1, जाधववाडी 3, पदमावतीनगर 1, धुमाळवाडी 1, इंदिरानगर 1, आदर्की बु.1, सस्तेवाडी 1, राजूरी 1, बिरदेवनगर 2, हिंगणगाव 1,   

*खटाव तालुक्यातील*  वडूज 1, इंजबाव 5, खुटबाव 1,

*माण तालुक्यातील*   मोही 1, ढाकणी 1, धामणी 1, दिडवाघवाडी 1, कोडलकरवाडी 2, मार्डी 1, म्हसवड 19, वरकुटे मलवडी 2, वावरहिरे 2,

*कोरेगाव तालुक्यातील*  कोरेगाव 8, सातारा रोड 3, सोनके 1, वाठार स्टेशन 1, करंजखोप 3, रहिमतपूर 4, सुर्ली 1, तडवळे 1, साप 1, बनवडी 1, पिंपरी 2, तांदुळवाडी 1, भोसे 1, दुधनवाडी 1, कुमठे 1, ल्हासूर्णे 1, नंदगिरी 1, पिंप्रद 1, रणदुल्लाबाद 1,

*खंडाळा तालुक्यातील*   शिरवळ 21, पळशी 5, लोणी 1, नायगाव 1, गुठळे 2, संगवी 1, भांदे 1, लोंणद 11, वाठारकॉलनी 1, वहागाव 2, मोरवे 2, विंग 1, खंडाळा 1, मिरजे 1, भाटकी 1, पाडेगाव 1, पवारवाडी 1, शेखमिरवाडी 1.

*वाई तालुक्यातील*  वाई शहरातील रविवार पेठ 2, सोनगिरवाडी3, चिखली 1, धावली 1, भूईज 1, चाहूर 1, ओझर्डे 2, पांडेवाडी 3, रामडोह आळी 1, धर्मपूरी 2, धोम 1, सह्याद्रीनगर 1.

*महाबळेश्वर तालुक्यातील*  महाबळेश्वर 1, सिल्वर व्हॅली खिंगर 1, मुनवर सोसायटी 4, खॉजाभाइ सोसायटी 1, रांजणवाडी 1, क्षेत्रमहाबहेश्वर 2, महाबळेश्वर बसस्थानकाजवळ 1, नगरपालिका सोसायटी 1,  दांडेघर 1, कलमगाव 1, मेटगुताड 1, पाचगणी 1,

*जावळी तालुक्यातील*   वलुथ 1,

*इतर*  निरा (पुणे) 1, इस्लामपूर (सांगली )1, वाळवा (सांगली ) 1, बालाजीनगर (पुणे) 1.
 
 *एका बाधितांचा मृत्यु*
        खासगी रुग्णालयात शिरंबे ता. कोरेगाव येथील 70 वर्षीय पुरुषाचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला असल्याची माहितीही डॉ. चव्हाण यांनी दिली आहे.
 
*एकूण नमुने - 399756*
*एकूण बाधित - 64506* 
*घरी सोडण्यात आलेले - 59464* 
*मृत्यू - 1898*
*उपचारार्थ रुग्ण- 3154*
                                                        

शनिवार, २७ मार्च, २०२१

*खा. श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून निधी मंजूर*

*खा. श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून निधी मंजूर*
कराड : प्रतिनिधी दि.28
  खा.श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून चार गावातील कब्रस्तानाच्या विकास कामांसाठी अर्धा कोटीचा निधी मंजूर झाला आहे. तशी माहिती त्यांच्या संपर्क कार्यालयाच्या वतीने देण्यात आली असून यामुळे कब्रस्तानातील निवारण शेडसह संरक्षक भिॆतीची कामे मार्गी लागणार आहेत.
    कराड तालुक्यातील पाल येथील कब्रस्तानास संरक्षक भिंत बांधण्याच्या कामासाठी 10 लाख रूपये मंजूर झाले आहेत. तसेच शिरवडे येथील कब्रस्तानास संरक्षक भिंत बांधण्यासाठी 10 लाख, खोडशी येथील कब्रस्तानास संरक्षक भिंत बांधण्याच्या कामासाठी 15 लाख आणि पाटण तालुक्यातील तारळे येथील कब्रस्तानात निवारा शेड व संरक्षक भिंत बांधण्यासाठी 13 लाख रूपये मंजूर झाले आहेत.
   सदर गावातील नागरिकांनी संबधित कामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी खा.श्रीनिवास पाटील यांच्याकडे केली होती. त्यानुसार खा. पाटील यांनी शासनाकडून हा निधी मंजूर करून घेतला आहे. निधी मंजूर होण्यासाठी राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री ना. नवाब मलिक, पालकमंत्री ना.बाळासाहेब पाटील यांचे सहकार्य लाभले आहे. त्यामुळे अनेक दिवसापासून प्रलंबित असलेली ही कामे मार्गी लागणार  असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. दरम्यान हा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल स्थानिक ग्रामस्थांनी खा. श्रीनिवास पाटील यांचे  आभार मानले आहेत.

*सातारा : 365 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 4 बाधितांचा मृत्यु*

*सातारा : 365 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 4 बाधितांचा मृत्यु*

 सातारा दि.27 : जिल्ह्यात काल शुक्रवार रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 365 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 4 बाधितांचा मृत्यु झाला  असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
*सातारा तालुक्यातील*  सातारा १३, शहरातील शुक्रवार पेठ 3, कृष्णानगर 1, सिव्हील कॉलनी 3, मल्हारपेठ 1, करंजे 1, करंजे पेठ 1, दौलतनगर 1, सहकारनगर 1, विकासनगर 2, सैदापूर 1, गोडोली 1, एसटी कॉलनी गोडोली 2, पिलाणीवाडी 1, कौंदणी 1, परमाळे 1, मालगाव 1, जकातवाडी 1,  पाडळी 1, पिलके स्टोअर्स 1, खोजेवाडी 1, कोडोली 3, पेरले 2, विक्रांतनगर 2, जिहे1, चंदननगर 2, राजापूरी 4, देगाव 1, दत्तनगर 1, सोनगाव 1, रायगाव 1, टोळेवाडी 1, लिंबगोवे 1, खिंडवाडी 1, त्रिपूटी 2, माजगाव 1, आळेवाडी 2, कोंडवे 1.

 *कराड तालुक्यातील*   कराड 6, शहरातील मंगळवार पेठ 1, सोमवार पेठ 4, विद्यानगर 1, खुबी 3, बेलवडे बु.1, बारवकरनगर 2, कोडोली 1, शेरे 4,  संगमनगर 1, शेणोली 1, मलकापूर 6, कोळेवाडी 1, घोणशी 1, पाडळी 4, हेळगाव 1, साकुर्डी 3, सुपने 3, देलेवाडी 1, केसे 6, अंधारवाडी 1, कासारशिरंबे 1, चरेगाव 1, वनमासमाची वाडी 1, गुरुवार पेठ 1, काले 1, तळबीड 1, जुळेवाडी 1, उंडाळे1 , कार्वे 1, 

 *पाटण तालुक्यातील*  पाटण 1,  कडेकरवाडी 1,शिंदेवाडी 1, नवारस्ता 1,  सुळेवाडी 1, चोपडी 1, सोनवडे 2, अडूळ 1, मोरगिरी 1, डवरी 1, चोपदारवाडी 1, पापर्डे 1, भांबे 1, घोट 1,

*फलटण तालुक्यातील* फलटण 7, शहरातील डिएड चौक 1, सोमवार पेठ 1, कसबा पेठ 1, रामबाग 1, जिंती नाका 1, बुधवार पेठ 1, हडको कॉलनी 1, रविवार पेठ 4, गिरवी नाका 1, भडकमकरनगर 1,  संजीवराजेनगर 3, गोळीबार मैदान 1, शिवाजीनगर 1, लक्ष्मीनगर 5, नाइकबोमवाडी 1, कोळकी 13, घाडगेमळा 1, तरडगाव 6, मलठण 3, शुक्रवार पेठ 2, राजाळे 2, शिंदेवाडी 2, गोखळी 1, निंबोडी 6, मळेगाव 2, विडणी 1, संगवी 1, गुणवरे 1, गुरसाळे 1, निंबळक 1, चव्हाणवाडी 1, ठाकूरकी 1, आळजापूर 1, ताथवडा 1, निरगुडी 1, सोनवडी 4, वाखरी 1, माठाचीवाडी 2, वाठार निंबळक 1, जाधववाडी 3, मिरगाव 1, हिंगणगाव 1, साखरवाडी 1, बोडकेवाडी 2, बिरदेवनगर 3, मुरुम 1

*खटाव तालुक्यातील*   राजापूर 1, ललगुण 1, पुसेसावळी 1, 

*माण तालुक्यातील*  माण 1, खडकी 1, राणंद 1, काळचौंडी 1, शेटेमळा म्हसवड 2.

*कोरेगाव तालुक्यातील* कोरेगाव 7, सालपे 2, आर्वी 1, टकले 1, जांबखुर्द 1, किन्हई 1, चिमणगाव 1, आसरे 1, ल्हासूर्णे 1, वाठार स्टेशन 1.

*खंडाळा तालुक्यातील*  खंडाळा 3, भादे 4, लोणंद 19, आरडगाव 1, शेरेचेवाडी 1, खानवडी 1, शिरवळ 8, विंग 1, गुठळे 1, लोणी 5, धनगरवाडी 2, नायगाव 1, पाडेगाव 1, बावडा 1, पडळ 1.

*वाई तालुक्यातील*  वाई शहरातील  रविवार पेठ 1, किसनवीर चौक 1, बावधन 1, धावडी 1, व्याजवाडी 1, सोनगिरवाडी 2, पाचवड 1, भूईज 1, सुरुर 1, वेलंग 1, खडकी 1,

*महाबळेश्वर तालुक्यातील* महाबळेश्वर शहरातील वॉटरसप्लाय 1, मनोहर सोसायटी 1, गवळी मोहल्ला 2, स्कुल मोहल्ला 1, पाचगणी 6, मेटगुताड 1, मधूसागर 1, नाकिंदा 1, गोगवे 1,   

*इतर*  हडपसर (पुणे)2, वाळवा (सांगली) 1,     
 
 *4 बाधितांचा मृत्यु*
       स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वोपचार रुग्णालय सातारा येथे  रांजणवाडी ता. माण येथील 67 वर्षीय महिला, गोरेवाडी ता. सातारा येथील 75 वर्षीय पुरुष,  विविध खासगी रुग्णालयात गौळीबार मैदान सातारा येथील 80 वर्षीय पुरुष, पांढरवाडी ता. वाई येथील 71 वर्षीय पुरुष  या चार  कोविड बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला असल्याची माहितीही डॉ. चव्हाण यांनी दिली आहे.
 
*एकूण नमुने - 397511*
*एकूण बाधित - 64104* 
*घरी सोडण्यात आलेले - 59307* 
*मृत्यू - 1897*
*उपचारार्थ रुग्ण- 2900*
                                        

शुक्रवार, २६ मार्च, २०२१

मुंबई : राज्यात रविवारीपासून रात्रीची संचारबंदी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मुख्यमंत्री केली मोठी घोषणा

मुंबई : राज्यात रविवारीपासून रात्रीची संचारबंदी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मुख्यमंत्री केली मोठी घोषणा 
मुंबई: राज्यात कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता गर्दी टाळणे, वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी काही कडक उपाययोजना लागू करणे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे नाईलाजाने गरजेचे ठरत असल्याने संपूर्ण राज्यात रविवारी (28 मार्च 2021) रात्रीपासून जमावबंदी लावण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या. यासंबंधीचे स्वतंत्र आदेश आजच मदत व पुनर्वसन विभागाकडून निर्गमित व्हावेत असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री म्हणाले की, मला लॉकडाऊन लावण्याची अजिबात इच्छा नाही. परंतु वाढती रुग्णसंख्या विचारात घेता, आपण ज्या आरोग्य सुविधांची मोठ्या प्रमाणात राज्यभर उभारणी केली, त्या सुविधाही कमी पडतील की काय अशी शक्यता निर्माण होताना दिसत आहे. हीच बाब लक्षात घेऊन प्रत्येक जिल्ह्यांनी त्यांच्या आरोग्य सुविधा, बेड्स व औषधांची उपलब्धता आणि त्यात करावयाची वाढ याकडे लक्ष केंद्रीत करावे अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

अहमदनगर : लग्न समारंभासाठी आता पूर्वपरवानगी आवश्यकजिल्ह्यातील आठवडे बाजार २९ मार्चपासून १५ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे आदेशजिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी जारी केले आदेश

अहमदनगर : लग्न समारंभासाठी आता पूर्वपरवानगी आवश्यक
जिल्ह्यातील आठवडे बाजार २९ मार्चपासून १५ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश
जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी जारी केले आदेश
अहमदनगर दि.26: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना म्हणून लग्न समारंभ आणि साखरपुडा यासारख्या धार्मिक समारंभाचे आयोजनास संबंधित पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकार्‍यांची पूर्वपरवानगी घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी जारी केले आहेत. गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात अशा प्रकारच्या कार्यक्रम, समारंभानंतर कोरोना रुग्ण संख्येत वाढ झाल्याचे निदर्शनास आले होते. याशिवाय, जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजार दिनांक २९ मार्चपासून ते १५ एप्रिल, २०२१ पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.
जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी आज यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. कोणतीही व्यक्ती, संस्था, संघटना यांनी या आदेशाचे उल्लंघन केल्यास ते साथरोग अधिनियम १८९७ मधील तरतूदीनुसार भारतीय दंड संहिता (४५ ऑफ १८६०) च्या कलम १८८ नुसार दंडनीय, कायदेशीर कारवाईस पात्र राहतील, असे या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
जिल्ह्यात विवाह समारंभास जास्तीत जास्त ५० व्यक्तींना एकत्र येण्यास परवानगी आहे. मात्र, लग्न समारंभ असलेले मंगल कार्यालये, लॉन्स, मॅरेज हॉल, आणि इतर समारंभाचे ठिकाणी ५० व्यक्तीपेक्षा जास्त व्यक्तीउपस्थित राहणे, सोशल डिस्टंन्सिंग, गर्दीचे व्यवस्थापन, समारंभ ठिकाणचे निर्जतुकीकरण, उपस्थित व्यक्तींसाठी सॅनिटायझरची व्यवस्था, ऑक्सीमीटरची व्यवस्था या व अन्य कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडे दुर्लक्ष करणार्‍या मंगल कार्यालयांना १० हजार रुपये दंड करण्यात येत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्ण संख्या सातत्याने वाढत असल्याने त्याला प्रतिबंध करण्यासाठी आता लग्न समारंभ, साखरपुडा या सारख्या धार्मिक समारंभ आयोजनास आता संबंधित पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी यांची पूर्वपरवानगी बंधनकारक करण्यात आली आहे.
याशिवाय, नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजार आता २९ मार्चपासून ते १५ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. 

सातारा : 495 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 1 बाधितांचा मृत्यु

सातारा : 495 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 1 बाधितांचा मृत्यु
सातारा दि.26 : जिल्ह्यात काल  बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 495 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये 
सातारा तालुक्यातील सातारा 14, शनिवार पेठ 3, रविवार पेठ 1, विद्यानगर 2, लिंब 1,  शिवथर 2, कोडोली 2, गोडोली 5, सदर बझार 4, शाहुनगर 3, गजवडी 1, खेड 2, चिंचणेर वंदन 1, आरे 1, अंबवडे बु 3, कारंडी 2, अपशिंगे 1, शेरेवाडी 1, पाटेघर 2, शहापूर 1, एकसळ 1, शेरेवाडी 7, सोनपूर 1, मालनपूर 1,  करंजे पेठ 1, यादोगापाळपेठ 4, कमानी हौद 1, सोमवार पेठ 2, शुक्रवार पेठ 2,  कुरुन 1, मल्हार पेठ 1, समर्थ मंदिर 1, अलेवाडी 1, शाहुपुरी 1, किडगाव 1, धनगरवाडी 1, कठापूर 1, कोंढवे 1, पाडळी 9, निनाम 3, सायगाव 1, 

पाटण तालुक्यातील पाटण 1, सणबूर 1, चाळकेवाडी 1, गोरेवाडी 1, दौलतनगर 1. 

कराड तालुक्यातील कराड 15, विद्यानगर 3,  सोमवार पेठ 1, शेरे 1,  गुरसाळे 1, तांबवे 1, काले 1, विंग 3, जुळेवाडी 3, हजारमाची 2, मसूर 2, कुसुर 1, येळगाव 1, मलकापूर 2, आगाशिवनगर 2, वारुंजी 1, साळशिरंभे 1, व्याघेरी 1, सुपणे 1, 

फलटण तालुक्यातील फलटण 5, शुक्रवार पेठ 3, रविवार पेठ 2, लक्ष्मीनगर 10, बुधवार पेठ 1, विद्यानगर 1, बुरुड गल्ली 1, संजीवराजे नगर 1, उमाजी नाईक चौक 1, खाटीक गल्‌ली 1, भडकमकरनगर 1,  गोळीबार मैदान 2, जिंती रोड 1, सगुणामाता नगर 6, कसबा पेठ 4,  मलठण 4, दत्तनगर 1, शिंदेवाडी 2, जाधववाडी 1, कोळकी 8, आदर्की 1, गिरवी नाका 2, पिराचीवाडी 1, कुरवली 2, वाठार निंबाळकर 2, धुमाळवाडी 1, मुरुम 2, साखरवाडी 1, खुंटे 2, वाखरी 1, नवा मळा ठाकुरकी 2, मिरेवाडी 1, सोनवडी 1, विढणी 1, गुणवरे 1, घाडगेवाडी 1, पिंपळवाडी 3, वडले 1, फडतरवाडी  1, आंदरुड 1, गोखळी  2, काळज 1,  चौधरवाडी 2, भाडळी खु 1, गिरवी 2, निरगुडी 1, सुरवडी 1, 

माण तालुक्यातील  दिवड 3,  मलवडी 6, म्हसवड 6, दहिवडी 2, भकती 1, पळशी 1, कोडालकरवाडी 2, जांभुळणी 1, शिंदी खु 1, बिदाल 3, गोदंवले खु 2, टाकेवाडी 1, 
खंडाळा तालुक्यातील खंडाळा 1, लोणंद 6, शिरवळ 1, निंबोडी 2, मोर्वे 1, पाडेगाव 2, अहिरे 2, 

 वाई तालुक्यातील वाई 1, रविवार पेठ 2, सतालेवाडी 1, धोम कॉलनी 1, एमआयडीसी 1, पांडेवाडी 1, शेंदूरजणे 1, खोलेवाडी 1, बावधन 5, यशवंतनगरी 1,व्याजवाडी 2, वेळे 2, मलटापूर 1, भुईंज 3, मांढारदेव 1, शिवाजीनगर 1, सिध्दनाथवाडी 1, कवठे 1, मोरजीवाडा 1, लागडवाडी 1, 
जावली तालुक्यातील जावळी 2, कुडाळ 1, रांगणेघर 1, मेढा 1, मोरघर 1, सोनगाव 5, वाळंजवाडी 1, अंधारी 6, माहीगाव 2, निझरे 1, तांबी 1, कुसुंबी 1, आनेवाडी 1. 
खटाव तालुक्यातील खटाव 1, बुध 3, पुसेगाव 5, काटवडी बु 2, मायणी 2, वेटाणे 1, ललगुण 1,  भोसरी 4, नांदोशी 2, पुसेसावळी 4, लाडेगाव 1,  कुरोली 1, जाखणगाव 2, काळेवाडी 1, फडतरेवाडी 1, मोळ 1, मुसंडवाडी 1, होळीचागाव 1, गुरसाळे 2,  औंध 6, विसापूर 1, गोडसेवाडी 1, खतगुण 1, तडवळे 4, वडूज 1, एनकुळ 1, तुपेवाडी 1, भुरुकवाडी 7, ध्रापुडी 2, वरुड 1, 
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 12, जळगाव 1, बिचुकले 2, तांदुळवाडी 1, चौधरवाडी 2, वाठार स्टेशन 14, ल्हासुर्णे 2, पिंपोड बु 1, रहिमतपूर 2, गोगावलेवाडी 1, साप 2, किरोली 2, मोहितेवाडी 1,वाठार 1, पिंपाडे बु 1, अंबवडे पळशी 4, धामणेर 1, अरबवाडी 1, देऊर 1, धोंडवाडी 1,तडवळे 1, अर्वी 1, 
 महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 8, क्षेत्र महाबळेश्वर 1, खारोशी 1, तापोळा 1, आंब्रळ 1, भोसे 2, डोगेघर 2, गोदावली 1, मेटगुटाड 1, 

इतर 18, विकास नगर 5, चाहुर खेड 2, 
बाहेरील जिल्ह्यातील औरंगाबाद 2, पुणे 1, शिराळा 1, सांगली 1, पंढरपूर 1. 
1 बाधितांचा मृत्यु
 जिल्हा रुग्णालय सातारा येथील भांबे ता. कराड येथील 75 वर्षीय पुरुष अशा एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
एकूण नमुने -395293
एकूण बाधित -63739 
 घरी सोडण्यात आलेले -58983  
मृत्यू -1893 
उपचारार्थ रुग्ण-2863 

ढेबेवाडी : घाट माथ्यावरील चोरी करणारे चोरटे अवघ्या चोवीस तासात जेरबंद; ढेबेवाडी पोलिसांची कारवाई गाडीचा चालकच होता सूत्रधार

 ढेबेवाडी : घाट माथ्यावरील चोरी करणारे चोरटे अवघ्या चोवीस तासात जेरबंद; ढेबेवाडी पोलिसांची कारवाई गाडीचा चालकच होता सूत्रधार 

ढेबेवाडी / प्रतिनिधी 
ढेबेवाडी (ता.पाटण) दि.26- गळ्यातील सोन्याची बोरमाळ व चैन हिसकावून पसार झालेल्या  आरोपींचा अवघ्या 24 तासात ढेबेवाडी पोलिसांनी छडा लावला. अंकुश दिनकर पवार (रा.शिद्रुकवाडी,खळे) आणि त्याचा एक साथीदार (नाव समजू शकले नाही)अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या चोरी प्रकरणी छाया लक्ष्मण कोळेकर यांनी ढेबेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.बुधवार 24 मार्च रोजी छाया यांच्या आई हौसाबाई कोळेकर वय (80) वर्षे यांना आजारी असल्याने तळमावले ता.पाटण येथे एका खाजगी दवाखान्यात आले होते.दुपारी एक वाजण्याच्या सुमारास दवाखान्यातील इलाज झालेनंतर तिला घरी घेऊन जात असताना  घाट माथ्यावरून शिद्रुकवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर शिद्रुकवाडी पासून सुमारे एक किलोमीटर पाठीमागे  त्यांच्या चारचाकी गाडीला एकजण हात करत होता व तो पायाने लंगडत होता म्हणून गाडी थांबवली, गाडी थांबवताच त्याने गाडी चालवत असलेल्या अंकुश दिनकर पवार वय (27) (मुख्य सूूत्रधार) याच्या गळ्याला सुरा लावला आणि गाडीच्या काचा खाली घेण्यास भाग पाडले आणि गाडीची चावी काढून घेऊन फेकून दिली यानंतर पाठीमागचे दार उघडून हौसाबाई कोळेकर यांच्या गळ्यातील चैन हिसकावून घेतली व दुसरी बोरमाळही हिसकावत होता यावेळी तक्रारदार छाया यांनी प्रतिकार केला व माळ धरून ठेवण्याचा प्रयत्न केला पण त्या व्यक्तीने सुरा छाया यांच्या हातावर मारून त्यांना जखमी केले आणि दागिने घेऊन पसार झाला
सदर घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक मा.अजयकुमार बन्सल,अप्पर पोलीस अधीक्षक मा.धीरज पाटील,यांच्या सूचनेनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी पाटण मा.अशोकराव थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.निरीक्षक मा.संतोष पवार यांनी  पोलिसांना तात्काळ गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गोपनीय माहितीच्या आधारावरून पोलिसांनी आरोपी अंकुश पवार व त्यांच्या साथीदारास ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली.अंकुश पवार हाच या काटातील मुख्य सूत्रधार आहे आणि त्यानेच कट रचला आणि ही चोरी केली असे पोलिसांनी सांगितले.

ढेबेवाडी पोलिसांचे कौतुक

सदर आरोपींकडून चोरून नेलेल्या मुद्देमाल एक लाख 20 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.सदर आरोपींवर भादवि कलम 392, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पथकात पो.आ.श्री खराडे, प्रशांत चव्हाण,चंद्रकांत पाटील,श्री।कपिल आगलावे सामील झाले होते.सदर आरोपींना अवघ्या चोवीस तासात जेरबंद करून गुन्हा उघडकीस आणल्याने ढेबेवाडी पोलिसांचे परिसरात कौतुक केले जात आहे.

गुरुवार, २५ मार्च, २०२१

सातारा : ‘कोयना धरण’ प्रकल्पग्रस्तांनामहाराष्ट्र दिनापासून लाभक्षेत्रातील जमीन वाटपाची प्रक्रिया सुरु करावी-उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

सातारा : ‘कोयना धरण’ प्रकल्पग्रस्तांना
महाराष्ट्र दिनापासून लाभक्षेत्रातील जमीन वाटपाची प्रक्रिया सुरु करावी
-उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
मुंबई, दि. 25 :- ‘कोयना धरण’ प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासह त्यांचे इतर प्रश्न मार्गी लावण्याची कार्यवाही तातडीने सुरु करावी. ‘कोयना धरण’ प्रकल्पग्रस्तांच्या अद्ययावत संकलन यादीचे काम 30 एप्रिलपर्यंत पूर्ण करुन येत्या 1 मे पासून म्हणजे महाराष्ट्र दिनापासून पात्र प्रकल्पग्रस्तांना सांगली, सातारा जिल्ह्यातील लाभक्षेत्रातील जमीन वाटपाची प्रक्रिया सुरु करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. 
              कोयना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली, मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात आयोजित बैठकीत उपमुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिले. बैठकीला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई (व्हिसीद्वारे), पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे, श्रमिक मुक्तीदलाचे नेते डॉ. भारत पाटणकर (व्हिसीद्वारे) आदी मान्यवरांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 
            महाराष्ट्राच्या विकासात कोयना धरणाचे मोठे योगदान आहे. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून कोयना धरणाकडे बघितलं जातं. या धरणासाठी प्रकल्पग्रस्त झालेल्या कुटुंबांचा त्याग मोठा आहे. त्यांच्या पुनर्वसनासह इतर प्रश्न मार्गी लागले पाहिजेत. त्यासाठी प्रकल्पग्रस्तांच्या संकलनयादीच्या अद्ययावतीकरणाचे काम कालबध्द पध्दतीने 30 एप्रिलपर्यंत पुर्ण करण्यात यावे. पात्र प्रकल्पग्रस्तांना सांगली आणि सातारा जिल्ह्यातील लाभक्षेत्रातील जमीन वाटपाची प्रक्रिया  महाराष्ट्र दिनापासून  सुरु करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.  
विशेष बाब म्हणून कोयना प्रकल्पग्रस्तांच्या ‘आयटीआय’ प्रमाणपत्रधारक पाल्यांना ‘महावितरण’मध्ये प्राधान्याने नोकरीच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या. कोयना प्रकल्पग्रस्त आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील बाधित स्थानिकांना घेऊन निसर्ग पर्यटनाच्या योजना राबविण्यात याव्यात, या माध्यमातून तेथील प्रकल्पग्रस्तांना रोजगार उपलब्ध होईल. त्यासाठी प्रकल्पग्रस्त बेरोजगार युवकांना प्रशिक्षण देण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.   

सातारा : होळी, धुलिवंदन व रंगपंचमी उत्सवकोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

सातारा : होळी, धुलिवंदन व रंगपंचमी   उत्सव
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

  सातारा दि.25 : कोरोनाचा प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता होळी, धुलिवंदन व रंगपंचमी हे उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 11973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार प्राप्त असलेल्या अधिकारानुसार  जारी केले आहेत. 
 यावर्षी दि. 28 मार्च रोजी होळी, 29 मार्च रोजी धुलिवंदन व दि. 2 एप्रिल रोजी रंगपंचमी हे सण साजरे करण्यात येणार आहे. होळी-शिमगा हा सण कोणत्याही प्रकारे गर्दी न करता साधेपणाने साजरा करावा. या सणानिमित्ताने एकमेकांवर रंग टाकणे, पाणी टाकणे, एकमेकांना गुलाल लावून रंगाची उधळण करण्यात येते. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी धुलिवंदन व रंगपंचमी हे सण साधेपणाने साजरे करावेत. 
 होळी-शिमगा निमित्ताने खास करुन सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये पालखीची मिरवणूक काढण्यात येते. परंतू या वर्षी पालखी घरोघरी न नेता मंदिरातच दर्शनाची व्यवस्था होईल अशी उपाययोजना करावी. त्याठिकाणी कोणत्याही प्रकारचे गर्दी होणार नाही व सोशल डिस्टन्सींगचे तंतोतंत पालन होईल याकडे सर्वतोपरी लक्ष देणे. होळी व धुलिवंदन हे उत्सव सार्वजनिक ठिकाणी व सार्वजनिक स्वरुपात आयोजित करु नये. तसेच इतर कोणतेही धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करु नयेत. या आदेशापेक्षा कडक निर्बंध स्थानिक प्रशासनांनी यापूर्वी लादले असतील तर ते लागू राहतील अथवा यानंतर देखील कडक निर्बंध लादू शकतील. या आदेशानंतर काही नवीन सूचना  प्रसिध्द झाल्यास त्याचे देखील अनुपालन करणे बंधनकारक राहील. 
 या आदेशाची संबंधितांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास त्यांचे विरुध्द यथास्थिती आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51, भातीय साथरोग अधिनियम 1897 व भातीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 नुसार दंडनीय व कायदेशीर कारवाई केली जाईल असेही आदेशात नमुद केले आहे.

*वाल्मिकी मंदिर येथे निसर्ग केंद्रासाठी एक कोटी मंजूर*खा. श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून पर्यटकांसाठी साकारणार अध्ययन केंद्र

*वाल्मिकी मंदिर येथे निसर्ग केंद्रासाठी एक कोटी मंजूर*

खा. श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून पर्यटकांसाठी साकारणार अध्ययन केंद्र
कराड: प्रतिनिधी
पर्यटकांना निसर्गाच्या  सानिध्याची अनुभूती मिळण्यासाठी पाणेरी (ता.पाटण) येथील वाल्मिकी मंदीर परिसरात निसर्ग अध्ययन केंद्रासाठी खा.श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून 1 कोटीचा निधी मंजूर झाला आहे. तशी माहिती त्यांच्या संपर्क कार्यालयाच्या वतीने देण्यात आली. हे अध्ययन केंद्र पर्यटकांसाठी पर्वणी ठरणार असून यामुळे स्थानिक पर्यटनाला चालना मिळणार आहे.
     ऐतिहासिक व धार्मिक महत्व असलेल्‍या वाल्मिक मंदीर परिसरात विपुल जंगल क्षेत्र आहे. तसेच हे धार्मिक व पर्यटन स्थळ असल्याने याठिकाणी भाविकांसह पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देत असतात. वाल्मिकी ऋृषींच्या वास्तव्याने पावन झालेला वाल्मीक मंदिर परिसर हा जंगलाने समृद्ध असून येथे विविध जातींचे प्राणी, पक्षी व झाडे आहेत. हा  जैवविविधतेने नटलेला परिसर आहे. याशिवाय वाल्मिकी मंदिर डांबरी रस्त्याने जोडले गेले असल्यामुळे येथे वर्षभर पर्यटक येत असतात. मात्र या ठिकाणी अपेक्षित पर्यटन विकास झाला नसल्याने येथे येणा-या पर्टकांचा भ्रमनिरास होत आहे. आलेल्या पर्यटकांना निसर्गाची माहिती मिळावी याकरीता निसर्ग उद्यान केंद्राची नितांत गरज होती. 
निसर्गाच्या सानिध्यात राहून पशू, पक्षी, झाडे यांची माहिती पर्यटकांना व्हावी याकरीता पाणेरी येथे वाल्मीकी मंदिराजवळ निसर्ग केंद्र स्थापन करावे अशी मागणी खा. श्रीनिवास पाटील यांनी वनविभागाकडे केली होती. त्यांनी केलेली ही मागणी मंजूर झाली असून येथील निसर्ग अध्ययन केंद्रासाठी वनविभागाने 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
    निसर्ग उद्यान केंद्राच्या इमारतीमध्ये विविध पशू, पक्षी, झाडे यांच चित्रे, फोटो, त्यांची शास्त्रीय माहिती लावण्यात येणार आहे. पशु, पक्षांचा आवाज कसा असतो हे जाणून घेण्यासाठी त्यांचे रेकॉर्ड केलेल्या आवाजाची यंत्रे याठिकाणी बसविण्यात येणार आहेत. त्यातून लहान मुलांना एका छत्राखाली सर्व माहिती मिळून निसर्गाची ओळख व्हावी असा उद्देश आहे. तसेच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची देखील संपूर्ण माहिती या केंद्रात दिली जाणार आहे. यासंदर्भातील चित्रफिती  दाखवण्याची सुध्दा त्याठिकाणी व्यवस्था केली जाणार आहे. या केंद्राचे काम लवकर सुरु करण्यात यावे अशी सूचना खा.पाटील यांनी वन्यजीव प्रमुख  दिलीप काकोडकर यांना केली आहे.

*पाटण तालुक्यातील ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ७५० विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..*

*पाटण तालुक्यातील  ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील  ७५०  विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..* पाटण :- पाटण तालुका दुर्गम, डोंगराळ,व...