सोमवार, २९ मार्च, २०२१

तळमावले : ढेबेवाडी परिसरात संचारबंदीला उत्स्फूर्त प्रतिसाद

तळमावले : ढेबेवाडी परिसरात संचारबंदीला उत्स्फूर्त प्रतिसाद

फोटो:अनिल देसाई कुंभारगाव

तळमावले दि.२९ सातारा जिल्ह्यात कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेता, रविवार, २८ मार्चपासून जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे त्याला ढेबेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.दररोज रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहणार असल्याचा आदेश जिल्हाधिकारी यांनी शनिवारी दिला. त्यानुसार संचारबंदीच्या कालावधीत मुक्त संचार करण्यास मनाई करण्यात आली आहे.

जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असून, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे दिलेल्या निर्देशान्वये आणि जिल्ह्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, जिल्ह्यात रात्रीची जमावबंदी व संचारबंदी रविवार, २८ मार्चपासून लागू करण्यात आली आहे.

दररोज रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहणार असून, संचारबंदीच्या कालावधीत अत्यावश्यक आणि जीवनाश्यक सेवा आणि कर्तव्यावरील व्यक्तींव्यतिरिक्त इतर व्यक्तींना बाहेर फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. संचारबंदीच्या आदेशाची ढेबेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून, बाहेर फिरणाऱ्यांविरुध्द कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे स.पो.नि.संतोष पवार यांनी "कुमजाई पर्व" बोलताना सांगितले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...