बुधवार, ३१ मार्च, २०२१

ढेबेवाडी : गावठी बॉम्बने रानडुकराची शिकार करणारी टोळी गजाआड

ढेबेवाडी : गावठी बॉम्बने रानडुकराची शिकार करणारी टोळी गजाआड 
ढेबेवाडी दि.31 : गावठी बॉम्बच्या सहाय्याने रानडुकराची शिकार केल्याप्रकरणी ढेबेवाडी वनक्षेत्रातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी सोमवारी रात्री रवले येथील पाटीलवाडी फाट्याजवळ शिकारीचा मुद्देमाल आणि एका चारचाकी वाहनासह कोल्हापूरच्या तिघांसह 4 जणांना अटक केली. एक संशयित फरारी झाल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली आहे. वनाधिकारी व कर्मचार्‍यांनी संबधित वाहनाचा मालक राजाराम गंगाराम गिजे, गणेश सोमा परबते, मारूती निवृत्ती पवार (सर्व रा. नवेपारगांव, कोल्हापूर) व ते ज्याचाकडे पाहुणे म्हणून आले होते तो पाहुणा तुकाराम ज्ञानू साळुंखे (रा.रूवले ता.पाटण) अशा चौघांना ताब्यात घेतले.एक संशयित फरार झाला आहे. त्याचा शोध सुरू आहे.

याबाबत ढेबेवाडी वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार ढेबेवाडी वनपरिक्षेत्रात अधिकारी व कर्मचारी 29 मार्च रोजी रात्री गस्त घाल असताना रात्री 2.00 च्या सुमारास सणबूर-रूवले रस्त्यावर पाटीलवाडी फाटा येथे वन्यजीव तपासणी नाक्यावर मारूती स्विफ्ट कार (MH. 02 DA 1373) ची तपासणी करता गाडीच्या डिकीत प्लास्टिकच्या गोणीत डोके फुटलेल्या अवस्थेतील रान डुकराचा मांसलभाग आढळून आला.

गाडीत दोन इसम बसलेले होते. दोघांना वाहनांसह ताब्यात घेऊन अधिक चौकशी करता संबधित गाडी नवेपारगांव ता.हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर येथील असल्याचे सांगण्यात आले. शिकार्‍यांनी फासेपारद्याकडून कापडी व प्लास्टिकचे बॉम्ब तयार करून घेतले होते. त्याचा रवले येथील वन्यजीव तपासणी नाक्या समोरच्या खासगी क्षेत्रातील माती बंधार्‍या जवळ वापर करण्यात आला.

रानडुकराच्या तोंडात या बॉम्बचा स्फोट झाला. त्यामुळे जबडा फाटला व डोके फुटल्याने मृत्यू झाला. नंतर त्याचे मटण वाटून घेतले. संबधित गाडीतील इसमानी दिलेल्या माहितीनुसार यात आणखी तिघांचा सहभाग होता. मटण घेऊन दोघे गाडीतून नवे पारगांवला निघाले होते. यावरून शिकारीत पाच जणांचा सहभाग होता हे स्पष्ट झाले.

वरील संशितांनी शिकार केल्याचे कबूल केले आहे. त्यांच्यावर भारतीय वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 कलम 9,39,44,48 (1) 51 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याकामी सहाय्यक वनसंरक्षक सुदाम कांबळे, पाटणचे वन अधिकारी विलास काळे, वनपाल सुभाष राऊत, सुभाष पाटील, डी.डी.बोडके, पन्हाळे, जयवंत बेंद्रे व वनमजूरांनी परिश्रम घेतले. ढेबेवाडी वनविभागा मार्फत पुढील तपास सुरु आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे प्रितीसंगमावर स्व. यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे प्रितीसंगमावर स्व. यशवंतराव चव्हाण यांना भावपूर्ण अभिवादन. सातारा | दि. २ : महाराष्ट्राचे शिल्पका...