पाटण : बोगस लॅब कोविड रुग्णाच्या जीवाशी खेळ : हजारो रुग्णांची झाली फसवणूक
पाटण दि.30 कोरोनाच्या नावाखाली सर्वत्र लूट सुरू असताना पाटण मध्ये कोविड अवैध रक्तचाचणी केंद्र उघड करण्यात पोलिसांना यश आले. याबाबत एकास अटक केली आहे तर पेशाने डॉक्टर असलेली व्यक्ती फरार झाली आहे.
याबाबत माहिती अशी की, पाटण तालुक्यातील नवसरी येथील दत्तात्रय उडुगडे यांना थकवा जाणवत होता. ते डॉ वनारसे दवाखान्यात उपचारासाठी गेले.तिथे त्यांची तपासणी केल्यानंतर रक्त व इतर आवश्यक अन्य चाचणी करण्यासाठी उडुगडे यांना यशवंत पॉथॉलॉजी लॅब मध्ये पाठविण्यात आले होते. तिथे उडुगडे यांची कोविड ची लक्षणे दिसतात असे सांगितले तसेच पाटण तालुक्यातील मरळी येथील कोविड केंद्रात त्वरित दाखल व्हावे असा सल्ला दिला होता.परंतु, उडुगडे यांच्या नातेवाईकांनी सातारा ला उपचार करण्याचे ठरविले साताऱ्यात उडुगडे यांची काळजी पूर्वक तपासणी केली असता कोविड नसल्याचे स्पष्ट झाले.
ही घटना जानेवारी महिन्यात घडली होती. तेव्हा त्याची लेखी तक्रार दाखल करून कारवाई ची मागणी केली असता दोन महिन्यांनंतर लॅब अवैध असल्याची बाब पुढे आली आहे. लॅब मालक अनिल बाबुराव इनामदार रा .तांबवे ता कराड व डॉ उदय राजाराम वनारसे रा.मल्हार पेठ, पाटण यांच्या विरोधात पोलिसांनी पुरावे गोळा करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. यामध्ये इनामदाराला अटक केली असून डॉ वनारसे फरार झाला आहे.सध्या लॅब सील केली असून अनेक रुग्णांनी चाचणी अहवाल घेण्यासाठी पैसे खर्च केले आहेत. त्यांचे पैसे परत मिळेपर्यंत आरोपींना जामीन मंजूर करू नये अशी मागणी रुग्णाच्या नातेवाईकानीं केली आहे.आजून अशाप्रकारचे कितीतरी लॅब असण्याची शक्यता नाकारता येत नाही प्रशासनाने यांची माहिती घेऊन कारवाई करावी आणि सामान्य माणसाची होणारी लूट थांबवावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा