सोमवार, २९ मार्च, २०२१

धक्कादायक ! * कोरोना बधितांचा लपवून उरकला अंतविधी विंगात खळबळ*

धक्कादायक 
कोरोना बधितांचा लपवून उरकला अंतविधी विंगात खळबळ
विंग/प्रतिनिधी
विंग(ता.कराड)घरात पाय घसरून पडल्याने आराम मिळावा म्हणुन लोणंदला (ता.खंडाळा) लेकीने नेलेल्या विंग येथील एका ७८ वर्षीय वयोवृध्द महिलेला लोणंदमध्ये कोरोनाची बाधा झाली. पुढील उपचारासाठी तिला कोरोना हॉस्पीटल नेताना तिचा वाटेतच मृत्यु झाला. हा प्रकार नातेवाईकांनी लपवून विंगला आणुन तिच्यावरअंत्यसंस्कार  केल्याने एकच खळबळ उडाली आहे. खबरदारी म्हणून नातेवाईक व अंत्यविधीला उपस्थीत ४० जणांची कोरोना चाचणी आरोग्य विभागाने केली असून त्यात एका लहान मुलीसह तीन पुरूष अन्य एक महिला कोरोना बाधीत आढळली आहे. चार महिन्यानंतर कोरोनाने विंगात पुन्हा शिरकाव त्यामुळे केला असून विंगमध्ये धाकधूक आणखी वाढली आहे.याबाबत कोळे प्राथमिक आरोग्य विभागाकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी, विंग (ता. कराड) येथील ७८ वर्षिय वयोवृध्द महिला मागील आठवड्यात घरात घसरून पडली, तेव्हा त्या जखमी झाली. वृध्देला आराम मिळावा म्हणून तिच्या लेकीने उपचारासाठी तिला लोणंद (ता. खंडाळा) येथील एका खाजगी रूग्णालयात उपचार दिले. संशयित म्हणून स्वॅब तपासणी केली  असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला रूग्णाची हालत बघून तेथील डॉक्टरानी पुढील उपचारासाठी कोव्हीड रूग्णालयात हालवण्यास सांगितले. तेंव्हा नातेवाईकानीं आम्ही सातारा येथील रूग्णालयात पुढील उपचारासाठी घेेेऊन जातो असे सांगितले त्यानंतर त्यांनी खाजगी रुग्णवाहिका करून सातारा येथे येण्यासाठी निघाले दरम्यान प्रवासात वयोवृध्द महिलेची प्रकृती खालावली आणि वाटेतच तिचा मृत्यु झाला सोमवारी रात्री उशीरा घटना घडली.वृध्देचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी ही बाब मात्र लपवली. खाजगी रूग्णवाहिकेतून मृतदेह मुळगावी विंग येथे आणला. तिच्यावर मंगळवारी दि.23 सकाळी 10 वा.विधीवत अंत्यसंस्कार केले.तद्नंतर लोणंद मधील रुग्णालयातुन ही माहिती सातारा आरोग्य विभागाला कळवण्यात आली सातारा मधून ही माहिती कराड आणि कराड मधून कोळे येथे माहिती समजली .त्यानंतर कोळे येथील आरोग्य विभागाने घेतलेल्या माहितीनंतर ती कोरोना बाधित असल्याचे बुधवारी दि.24 मार्चला समजले. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. नातेवाईकानी ही बाब का लपवली, असा अरोप आरोग्य विभागाने केला आहे. प्रशासनाला गाफील का ठेवले, असा प्रश्न केला आहे. विशेष म्हणजे त्या मृत महिलेची लेक लोणंद येथे आशा सेविका म्हणून कार्यरत आहे.
प्रशासनासह अंत्यसंस्काराला उपस्थीत सर्वाची झोपच त्यामुळे उडाली आहे. प्रतिबंध म्हणून प्रशासनाने गुरूवारी दि.26 मार्चला कोळे प्राथमीक केंद्राअंतर्गत अर्टिफिशीअर कॅम्प येथे घेतला. त्यात ४० जणांची टेस्ट केली.

नातेवाईकासह विधीला उपस्थीत ग्रामस्थांचा समावेश त्यात केला होता. त्यामध्ये एक ९ वर्षाची लहान मुलगी एक महिलेसह अन्य तीन पुरूष बाधीत आढळले आहेत. पुरूषात एका ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा समावेश आहे. गावात अन्य दोन ठिकाणी एक महिला व पुरूष बाधित व्यक्ती सापडल्या असून एकूण संख्या आता ७ झाली आहे. असे कोळे आरोग्य विभागाने माहिती देताना सांगितले. त्यामुळे पेच अणखी वाढला आहे. तब्बल चार महिन्यानंतर गावात कोरोनाने शिरकाव केल्याने आरोग्य विभाग अणि प्रशासनापुढे पेच अणखी वाढला आहे. यावेळी कोळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ.सुप्रिया बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.अर्चना यादव समुह आरोग्य अधिकारी  श्री. शेवाळे श्री.जाधव श्री. इनामदार श्री. ठेंगे श्रीमती जाधव श्री जाधव लॅब टेक्निशियन गटप्रवर्तक श्रीमती वैशाली पवार सर्व आशासेविका उपस्थित होत्या.

----------------------------------

त्या परिसरात प्रतिबंधात्मक उपायोजना हाती घेतल्या आहेत. त्यासाठी स्थानिक प्रशासन अणखी सतर्क झाले आहे येत्या दोन दिवसात 30 किंवा 31 मार्चला पुन्हा कोळे आरोग्य केंद्राअंतर्गत अर्टिफिशीअर कॅम्प घेतला जाणार आहे. - डॉ.सुप्रिया बनकर (आरोग्य अधिकारी कोळे)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...