सोमवार, २९ मार्च, २०२१

तळमावले : कोरोना हे मानव जातीवरील मोठे संकट आहे - डॉ.उमेश गोंजारी

तळमावले : कोरोना हे मानव जातीवरील मोठे संकट आहे - डॉ.उमेश गोंजारी
तळमावले, 28 मार्च :- कोरोनाची लाट पुन्हा दुसर्‍यांदा आली असून अनेक ठिकाणी रुग्ण संख्या वाढत आहे. पाटण तालुक्यात तळमावले प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परीसरात ही वाढणारी रुग्ण संख्या अत्यंत चिंताजनक असून नागरिकांनी निष्काळजीपणा न करता गर्दी टाळत,सोशल डिस्टनचे पालन करावे. मास्कचा वापर करून स्वत:ची काळजी घ्यावी म्हणजे आपली व आपल्या परिवार कोरोना पासून सुरक्षित राहील असे प्रतिपादन प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी  डॉ.उमेश गोंजारी व डाॅ.मंगेश खबाले यांनी केले.

कोरोना हे मानव जातीवरील मोठे संकट आहे, मागील कोरोनाची लाट  रोखण्यात प्रशासनाला यश आले.मात्र नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे कोरोनाची दुसरी लाट आली आहे.आणि रुग्ण संख्या झपाट्याने वाढली. वाढलेली रुग्णसंख्या अत्यंत चिंताजनक आहे.कोरोनाचे नवीन रूपही भयंकर आहे.म्हणून प्रत्येकाने काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.मास्कचा वापर,वेळोवेळी हात धुणे,सोशल डिस्टन्स पाळणे याचबरोबर गर्दी टाळणे ही गरजेचे आहे. ग्रामीण भागात दुकानदारांनी आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरु नये. काही लक्षणे आढळल्यास तातडीने उपचार करुन घ्यावे. याचबरोबर  आत्ता  लसीकरणला सुरवात झाली असून  1 एप्रिल पासून 45 वर्षावरील नागरीकांनी लस घ्यावी. कारण यामुळे शरीरात रोग प्रतिकार शक्ती वाढत असून त्याचा कोरोना रोखण्यासाठी मोठा लाभ होणार आहे. प्रत्येक गावातील आशासेविका ,आंगणवाडी सेविका यांनी जागरूक पणे आपल्या गावातील जेष्ठ नागरिकांना लसीकरणासाठी जागृती केली पाहिजे.कोरोना रोखणे हे सर्वांचे कर्तव्य आहे यावेळी. प्राथमिक आरोग्य केंद्र  तळमावले चे वैद्यकीय अधिकारी डॉ.उमेश  गोंजारी व डॉ.मंगेश खबाले,आरोग्य सेवक ,आरोग्य कर्मचारी,उपस्थित होते


 
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...