ढेबेवाडी : घाट माथ्यावरील चोरी करणारे चोरटे अवघ्या चोवीस तासात जेरबंद; ढेबेवाडी पोलिसांची कारवाई गाडीचा चालकच होता सूत्रधार
ढेबेवाडी / प्रतिनिधी
ढेबेवाडी (ता.पाटण) दि.26- गळ्यातील सोन्याची बोरमाळ व चैन हिसकावून पसार झालेल्या आरोपींचा अवघ्या 24 तासात ढेबेवाडी पोलिसांनी छडा लावला. अंकुश दिनकर पवार (रा.शिद्रुकवाडी,खळे) आणि त्याचा एक साथीदार (नाव समजू शकले नाही)अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या चोरी प्रकरणी छाया लक्ष्मण कोळेकर यांनी ढेबेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.बुधवार 24 मार्च रोजी छाया यांच्या आई हौसाबाई कोळेकर वय (80) वर्षे यांना आजारी असल्याने
तळमावले ता.पाटण येथे एका खाजगी दवाखान्यात आले होते.दुपारी एक
वाजण्याच्या सुमारास दवाखान्यातील इलाज झालेनंतर तिला घरी घेऊन जात असताना
घाट माथ्यावरून शिद्रुकवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर शिद्रुकवाडी पासून
सुमारे एक किलोमीटर पाठीमागे त्यांच्या चारचाकी गाडीला एकजण हात करत होता व
तो पायाने लंगडत होता म्हणून गाडी थांबवली, गाडी थांबवताच त्याने गाडी
चालवत असलेल्या अंकुश दिनकर पवार वय (27) (मुख्य सूूत्रधार) याच्या गळ्याला सुरा लावला
आणि गाडीच्या काचा खाली घेण्यास भाग पाडले आणि गाडीची चावी काढून घेऊन
फेकून दिली यानंतर पाठीमागचे दार उघडून हौसाबाई कोळेकर यांच्या गळ्यातील
चैन हिसकावून घेतली व दुसरी बोरमाळही हिसकावत होता यावेळी तक्रारदार छाया
यांनी प्रतिकार केला व माळ धरून ठेवण्याचा प्रयत्न केला पण त्या व्यक्तीने
सुरा छाया यांच्या हातावर मारून त्यांना जखमी केले आणि दागिने घेऊन पसार
झालासदर घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक मा.अजयकुमार बन्सल,अप्पर पोलीस अधीक्षक मा.धीरज पाटील,यांच्या सूचनेनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी पाटण मा.अशोकराव थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.निरीक्षक मा.संतोष पवार यांनी पोलिसांना तात्काळ गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गोपनीय माहितीच्या आधारावरून पोलिसांनी आरोपी अंकुश पवार व त्यांच्या साथीदारास ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली.अंकुश पवार हाच या काटातील मुख्य सूत्रधार आहे आणि त्यानेच कट रचला आणि ही चोरी केली असे पोलिसांनी सांगितले.
ढेबेवाडी पोलिसांचे कौतुक
सदर आरोपींकडून चोरून नेलेल्या मुद्देमाल एक लाख 20 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.सदर आरोपींवर भादवि कलम 392, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पथकात पो.आ.श्री खराडे, प्रशांत चव्हाण,चंद्रकांत पाटील,श्री।कपिल आगलावे सामील झाले होते.सदर आरोपींना अवघ्या चोवीस तासात जेरबंद करून गुन्हा उघडकीस आणल्याने ढेबेवाडी पोलिसांचे परिसरात कौतुक केले जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा