तळमावले/वार्ताहर
भांडूप येथे वास्तव्यास असलेल्या सौ.सुमन विठ्ठल डाकवे यांना स्पंदन-नारीरत्न पुरस्कार-2021 देवून स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट च्यावतीने सन्मानित करण्यात आले. सदर पुरस्कार वितरणप्रसंगी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डाॅ.संदीप डाकवे, सचिव सौ.रेश्मा डाकवे, सौ.गयाबाई डाकवे, राजाराम डाकवे, विठ्ठल डाकवे, चि.स्पंदन डाकवे व अन्य मान्यवर उपस्थित होते. आकर्षक सन्मानपत्र, स्पंदन दिनदर्शिका, शाल असे या पुरस्काराचे स्वरुप होते.
सौ.सुमन डाकवे यांनी अंगणवाडी च्या माध्यमातून कोरोना काळात उल्लेखनीय स्वरुपाची कामगिरी केली होती. तसेच अनेक विधायक उपक्रमदेखील राबवले होते. या कामामुळे त्यांनी भांडूप मध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे त्यांना पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट च्यावतीने ‘स्पंदन-नारीरत्न पुरस्कार 2021’ देवून सन्मानित करण्यात आले. नावीण्यपूर्ण उपक्रमासाठी स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट नेहमीच अग्रेसर आहे.
सौ.सुमन डाकवे यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा