मंगळवार, ८ डिसेंबर, २०२०

काळगाव ; सासरहून गेली माहेरी आणि विषारी औषध खाऊन संपवले जीवन

काळगाव ; सासरहून गेली माहेरी आणि विषारी औषध खाऊन संपवले जीवन

 काळगाव, ता. पाटण : कोळगेवाडी येथील विवाहितेने माहेरी मस्करवाडी कसणी, ता. पाटण येथे  विषारी औषध खाऊन आत्महत्या केली. मनीषा जयेश कोळगे (वय 20) असे विवाहितेचे नाव आहे. स्थानिक पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी, मनीषा यांचा विवाह 15 जून 2019 रोजी कोळगेवाडी येथे झाला होता. काही दिवसांपासून त्या माहेरी मस्करवाडी (कसणी) येथे राहण्यास होत्या. शुक्रवारी (ता.4 ) दुपारी त्यांनी घरात विषारी औषध खाल्ले. त्यांना त्रास होऊ लागल्यानंतर घरातील लोकांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी तातडीने त्यांना कऱ्हाड येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.तेथे उपचार सुरू असताना काल रात्री त्यांचा मृत्यू झाला. उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर मनीषा यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दुपारी कोळगेवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. ढेबेवाडी पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. सहायक पोलिस निरीक्षक उत्तमराव भजनावळे यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. सहायक फौजदार रवींद्र पानवळ पुढील तपास करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मंद्रूळकोळे खुर्द येथे नविन ट्रान्सफॉर्मर बसविलाविकासाठी झुकते माप देणाऱ्या ना. शंभूराज देसाई यांचे आभार

ढेबेवाडी प्रतिनिधी            सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून मिळालेले मंद्रूळकोळे खुर्द येथे ...