मका पिकावरील अमेरिकन लष्करी आळीच्या नियंत्रणासाठी कृषी संजीवनी कार्यक्रमा अंतर्गत रामिष्टेवाडी (ता.पाटण ) येथे चर्चा सत्र घेऊन प्रबोधन.
ढेबेवाडी : प्रतिनिधी
पाटण तालुक्यातील रामिष्टेवाडी येथील शेतकरी बांधवांना शेतात मका पिकावरील अमेरिकन लष्करी आळी या विषयावरील तंत्र अधिकारी कराड श्री.खरात यांनी चर्चासत्र /प्रशिक्षण घेण्यात आले. सदर प्रशिक्षणात सुरुवातीला सर्व शेतकरी बांधवांना प्रत्यक्ष मका पिकाच्या प्लॉटवर घेऊन पिकाचे निरीक्षण घेण्यात आले, या प्रशिक्षणात मंडळ कृषी अधिकारी ढेबेवाडी श्री अगवणे यांनी कृषी विभागाच्या विविध योजना व पिक विमा या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले, तसेच मका पिकावर येणाऱ्या लष्करी आळीचा जीवनक्रम अंडी ,अळी,कोश व पतंग या चार अवस्था असतात, नुकसान पातळी बरोबर या किडीची माहिती मादी ,पतंग मका, पिकात पोंग्यामध्ये एक हजार ते पंधराशे अंडी देते हे अंडी 100-150 च्या पुंजक्याच्या स्वरूपात देते, या अंड्यामधून तीन दिवसांनी अळी बाहेर पडते, मका पिकांच्या कोवळ्या पोंग्यावर आपली उपजीविका करते, त्यामुळे पानांवर पांढरे चट्टे पडतात ,नंतरच्या अवस्थेत मका मोठी होऊन मका पिकाची पाने मोठ्या प्रमाणात खाऊन त्यावर विस्टा टाकते ,यानंतर आळी चे नियंत्रण न झाल्यास ती आपली उपजीविका मक्याच्या तुऱ्यावर करून मक्याचे कणीस कोवळा भाग खाते त्यामुळे उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर घट येते.
अमेरिकन लष्करी आळी चा नियंत्रण एक नंबर बियाण्यास पेरणीपूर्वी रासायनिक औषधे व जैविक बीज प्रक्रिया करावयाची उपायोजना यावर माहिती दिली तसेच मका उगवणीनंतर निंबोळी अर्क ची फवारणी याबाबत माहिती दिली तसेच रासायनिक फवारणी साठी औषधांची माहिती दिली आणि शेतकऱ्यांना कीटकनाशकांचे वाटप करण्यात आले. यावेळी रामिष्टेवाडीचे सरपंच मारुती शिखरे व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खूप चांगली बातमी तयार केली
उत्तर द्याहटवा