शनिवार, ४ जुलै, २०२०

सातारा ; जिल्ह्यातील 56 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित तरदोन बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु

जिल्ह्यातील 56 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित तर
दोन बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु
सातारा दि. 4  : काल रात्री उशीरा प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील विविध रुग्णालये व कोरोना केअर सेंटर मध्ये येथे उपचार घेत असलेल्यामध्ये निकट सहवासित 51, प्रवास करुन आलेले 4, आय.एल.आय (श्वसनाचा सौम्य जंतू संसर्ग ) 1  असे एकूण  56 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आले असून यामध्ये 36 पुरुष व 20 महिलांचा समावेश आहे. तसेच खटाव  तालुक्यातील पडळ येथील 55 वर्षीय पुरुष व वाई तालुक्यातील ब्राम्हणशाही येथील 60 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. 
यामध्ये  महाबळेश्वर तालुक्यातील लाखवड येथील 28 वर्षीय महिला.
कराड तालुक्यातील  उंब्रज येथील 23 वर्षीय पुरुष, मुंढे येथील 41 वर्षीय पुरुष. 
फलटण तालुक्यातील अलगुडेवाडी येथील 14 वर्षीय महिला, रविवार पेठ येथील 7,12,16,38,68,42,40,32,20 वर्षीय पुरुष व 14 वर्षीय दोन युवती व 25 वर्षीय महिला मलठण येथील 39 वर्षीय महिला.
खंडाळा तालुक्यातील पळशी रोड शिरवळ येथील 24 वर्षीय पुरुष, न्यू कॉलनी येथील 30 व 23 वर्षीय पुरुष, देशमुख आळी येथील 35 व 45 वर्षीय महिला, लोणंद मधील मऱ्याची  वाडी येथील 34 वर्षीय पुरुष. 
सातारा तालुक्यातील जिहे येथील 49,36,20,8,6843,61,81,62 वर्षीय पुरुष व 42,57,4,30,19,3,10,32,70, 55 वर्षीय महिला, श्रीनाथ कॉलनी, फलटण रोड येथील 20 वर्षीय पुरुष. 
माण तालुक्यातील कुळकजाई येथील 25 वर्षीय पुरुष, धावली येथील 17 वर्षीय पुरुष, पानमळेवाळी येथील 43 वर्षीय महिला. 
पाटण तालुक्यातील मलवडी येथील 24 वर्षीय पुरुष, मोरगीरी येथील 33 वर्षीय पुरुष, कासरुंड येथील 35 वर्षीय पुरुष, चोपडी येथील 16 व 24 वर्षीय महिला, बेलवडे येथील 36 वर्षीय पुरुष, सूर्यवंशीवाडी येथील 28 वर्षीय पुरुष, गोकूळ येथील 18 वर्षीय युवक, मारुल येथील 35 वर्षीय पुरुष.
वाई तालुक्यातील धर्मपूरी येथील 46 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

दोन बाधितांचा मृत्यु

        क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे काल खटाव  तालुक्यातील मुंबई वरून प्रवास करून आलेला  पडळ येथील 55 वर्षीय पुरुष व वाई तालुक्यातील ब्राम्हणशाही येथील 60 वर्षीय ( सारीची रुग्ण ) महिला या 2 कोराना बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती डॉ. गडीकर यांनी दिली आहे.

घेतलेले एकुण नमुने
14330
एकूण बाधित 1245
घरी सोडण्यात आलेले 779
मृत्यु 53
उपचारार्थ रुग्ण 413

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

*घणसोलीच्या 'आप्पां'चा सुवर्ण महोत्सवी वाढदिवस थाटात; मान्यवरांची हजेरी* *शिवसेना शाखाप्रमुख चंद्रकांत मानेंच्या कार्याचा रमेश मोरे बापूंसह मान्यवरांकडून गौरव*

*घणसोलीच्या 'आप्पां'चा सुवर्ण महोत्सवी वाढदिवस थाटात; मान्यवरांची हजेरी*   *शिवसेना शाखाप्रमुख चंद्रकांत मानेंच्या कार्याचा रमेश मोर...